नामपर अभंग नाम पर अभंग वारकरी किर्तन साठी धनंजय महाराज मोरे

अभंग धार्मिक

नामपर अभंग

1

समचरणदृष्टि विटेवरी

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥

आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त नको देवा ॥ध्रु.॥

ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥

तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३

अनुक्रमणिके वर परत जा

4344

स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा

स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आम्हा ॥1॥

नारायणनामें होऊं जिवनमुक्त । किर्तनी अनंत गाऊं गीती ॥ध्रु.॥

वैकुंठींचे जन सदा चिंतिताति । कइं येथें येती हरिचे दास ॥2॥

यमधर्म वाट पाहे निरंतर । जोडोनियां कर तिष्ठतसे ॥3॥

तुका म्हणे पावावया पैल पार । नामंत्र सार भाविकासि॥4॥

अनुक्रमणिके वर परत जा

सदा नाम घोष करुं

सदा नाम घोष करुं हरिकथा । तेणें सदा चित्ता समाधान ॥१॥

सर्व सुख ल्यालों सर्व अलंकार । आनंदें निर्भर डुलतसों ॥२॥

असो ऎसा कोठें आठवचि नाहीं । देहींच विदेही भोगुं दशा ॥३॥

तुका म्हणॆ आम्ही झालों अग्निरुप । लागों नेदूं पापपुण्य अंगा ॥४॥

4067

सारासार विचार करा उठाउठी

सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठीं विठोबाचें ॥1॥

तयाच्या चिंतनें निरसलें संकट । तरलों दुर्घट भवसिंधु ॥ध्रु.॥

जन्मोनियां कुळीं वाचे स्मरे राम । धरी हा चि नेम अहिनिऩशीं ॥2॥

तुका ह्मणे कोटी कुळें तीं पुनीत । भावें गातां गीत विठोबाचे ॥3॥

येणें बोधें आम्ही असों सर्वकाळ

येणें बोधें आम्ही असों सर्वकाळ । करुं हे निर्मळ हरिकथा ॥१॥

आम्ही भूमीवरी एक पै दैवाचें । निधान हें वाचे सांपडलें ॥२॥

तरतील कुळें दोन्ही उभयतां । गातां आइकता सुखरुप ॥३॥

न चळे हा मंत्र न म्हणें यातीकुळ । नलगे काळ वेळ विचारावी ॥४॥

तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । सांठविन हांवा ह्रदयांत ॥५॥


कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

twelve − seven =