प्राण प्रतिष्ठा मूर्ती स्थापना अभंग वारकरी संतांचे धनंजय महाराज मोरे

अभंग धार्मिक
Pocket

प्राण प्रतिष्ठा मूर्ती

मूर्ती स्थापना अभंग

उभारीला हात

उभारीला हात । जगी जाणवली मत ॥१।१

देव बैसले सिंहासनी । आल्या याचकासी पुरे धनी ॥२॥

एकाच्या कैवाडे । उगवी बहुतांचे कोडे ॥३॥

दोही ठाई तुका । नाही पडो देत चुका ॥४॥

धन्य भावशीळ

धन्य भावशीळ । ज्यांचे हृदय निर्मळ ॥१॥

पूजी प्रतिमेचे देव । संत म्हणती तेथे भाव ॥२॥

विधी निषेध नेणती । एक निष्ठा धरुनी चित्ती ॥३॥

तुका म्हणे तैसे देवा । होणे लागे त्यांचा भावा ॥४॥

मी तेची माझी प्रतिमा

मी तेची माझी प्रतिमा । तेथे नाही आन धर्मा ॥१॥

तेथे असे माझा वास । नको भेद आणि सायास ॥२॥

कलियुगी प्रतिमेपरते । आन साधन नाही निरुते ॥३॥

एका जनार्धनी शरण । दोन्ही रूपे देव आपण ॥४॥


कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

4 − three =