नवनाथांची आरती नवनाथ ग्रंथाची आरती दत्तात्रय आरती

आरती
Pocket

नवनाथांची आरती

नवनाथ ग्रंथाची आरती

दत्तात्रय आरती

 

जयदेव जयदेव जय नवनाथा | भक्तगण देवूनी सिद्ध करा || धृ ||

मच्छिंद्र गोरख तैसे जालींद्र्नाथ | कानिफ गहिनीनाथ नागेशासहित |

चर्पटि भर्तरी रेवण मिळूनी नवनाथ | नवनारायण अवतारा संत ||१||

भक्ती शक्ती बोध वैराग्यहित | तापत्रय ते हरिती स्मरा एकचित्त |

नमने चरित्र पठणे दुरितांचा अंत | भक्त जनांसी तारी नवनाथ खचित ||२||

इह्पर साधुनी देती समस्त नवनाथ | भूत समंधा प्रेता घालवीती सत्य |

भक्त जणांचे पूर्वा तुम्हीच संकल्प | कृपार्थ होता दावा सदानंद रूप ||३||

दु:खी दिन दरिद्री लोकांना तारा | देउनि सुख संपत्ती मुक्ती दोहि करा|

स्मरण करावे आता नित्य नवनाथा | शरणागत मी तुमच्या पायी मम माथा||४||

नवनाथची आधार सकलांचा आता | आरती ओवाळीता हरली भवचिंता |

ब्रम्ह सनातन शांती देई मम चित्ता | शरण विनायक लोटांगण आता ||५||

 

आरती नवनाथांची
जयदेव जयदेव जय श्रीनवनाथाहो, स्वामी नवनाथा ।
भावार्ते आरती ओवाळू आरती श्रीगुरुदेवदत्ता ॥ जयदेव ॥ धृ ॥
कलियुगी अवतार नवनाथांचा ।
केलासे उद्धार भक्तजनांचा ।
दावीला मूळमार्ग शाबरी विद्येचा ।
आगळा महिमा न कळे स्वामी सिद्धांचा ॥ १ ॥
मच्छीपासूनि झाले स्वामी मच्छिंद्र ।
गोरक्ष जन्मले गोवर भस्मात ।
जालंदर उत्पत्ति यज्ञकुण्डात ।
कानिफ पैदास गजकर्णात ॥ २ ॥
जयाचे चरणापासूनी झाले चर्पटीनाथ ।
गहिनी गोपीचंद अडबंगनाथ ।
हरिणीने रक्षिले भर्तरीनाथ ।
पुढे चौर्‍यांशी सिद्धांचे गणित ॥ ३ ॥
कलीमध्ये नवनाथ प्रकटले ।
शाबरीविद्या देऊनि जग उद्धरिले ।
विद्येच्या प्रतापे सुरवर जिंकिले ।
नाथांच्या सेवेशी शरणागत आले ॥ ४ ॥
कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

fifteen + 6 =