आरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More

ईतर लेख धार्मिक सण
Pocket

 *🔯आरतीचे महत्त्व*🔯*

*आरती म्हणजे देवतेला आर्ततेने (आतून) हाक मारणे. एखाद्या मानवाने आरतीद्वारे जर अशी हाक मारली,* *तर देवता त्या मानवाला स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये दर्शन देतील.*’
उपासकाला हृदयातील भक्तीदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे ‘आरती’. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निःसंशय सफल होतात, पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून, म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य रीतीने म्हटली जाते.
एखादी गोष्ट आपल्याकडून आर्ततेने, म्हणजे अंतःकरणपूर्वक तेव्हाच होते, जेव्हा तिचे महत्त्व आपल्या मनावर बिंबते. त्या गोष्टीमागील शास्त्र वा सिद्धान्त सांगितल्यास तिचे महत्त्व लवकर पटते. याच उद्देशाने या लेखात आरती करतांना करावयाच्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र दिले आहे.
उपासना करतांना कोणतीही कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य करणे अत्यावश्यक असते; कारण अशा कृतीचेच परिपूर्ण फळ मिळते.
*आरती कशी म्हणावी, कशी ओवाळावी, आरती पूर्वी अन् नंतर काय करावे आदींविषयी बहुतेकांना ज्ञान नसते किंवा त्यांच्याकडून अयोग्यरित्या कृती होत असतात.*
 *🔯आरती कशी म्हणावी🔯*
*आरती करताना जोरजोराने ओरडणे, टाळ, घंटी वाजविणे म्हणजे आरती नव्हे. आरती म्हणण्याचे काही नियम आहेत. भक्ताच्या हृदयातील भक्तिदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे ‘आरती’. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश नि:संशय सफल होतो,*
पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून, म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य रीतीने म्हटली जाते. एखादी गोष्ट आपल्याकडून आर्ततेने म्हणजे अंत:करणपूर्वक तेव्हाच होते, जेव्हा तिचे महत्त्व आपल्या मनावर बिंबते.
त्यासाठी आरती कशी म्हणावी, कशी ओवाळावी, आरतीपूर्वी आणि नंतर काय करावे, काय आवश्यक आहे?
देव प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहोत या भावाने आरती म्हणावी.
आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी.
आरती म्हणताना शब्दोच्चार स्पष्ट आणि योग्य असावा.
आरती म्हणत असताना टाळ्या वाजवाव्यात. ताल धरण्यासाठी त्या हळुवारपणे वाजवाव्यात.
टाळ्यांच्या जोडीला घंटा मंजूळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे. असल्यास टाळ, झांज, पेटी आणि तबला या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावी.
आरती म्हणत असताना देवाला ओवाळताना तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वतरुळाकृती फिरवावे.
आरती ओवाळताना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये.
आरती झाल्यानंतर ‘घालीन लोटांगण..’ ही प्रार्थना म्हणावी.
*१. ‘भगवंत प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहे’, या भावाने आरती म्हणावी.*
*२. आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी.*
*३. आरती म्हणतांना शब्दोच्चार अध्यात्मशास्त्र-दृष्ट्या योग्य असावा*
.
*आरती म्हणत असतांना टाळ्या वाजवाव्यात.*
*१. प्राथमिक अवस्थेतील साधक : ताल धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवाव्यात.*
*२. पुढच्या अवस्थेतील साधक : टाळ्या न वाजवता अंतर्मुखता साधण्याचा प्रयत्न करावा.*
*३. आरती म्हणत असतांना टाळ्यांच्या जोडीला वाद्ये वाजवावीत.*
१. घंटा मंजुळ ध्वनीत वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे.
२. टाळ, झांज, पेटी आणि तबला या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावी.
*आरती म्हणत असतांना देवाला ओवाळावे.*
१. तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे.
२. आरती ओवाळतांना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाच्या अनाहत ते आज्ञा चक्रापर्यंत ओवाळावी.
ऊ. ‘घालीन लोटांगण’ ही प्रार्थना म्हणावी.
ए. यानंतर ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी.
ऐ. कापूर-आरती ग्रहण करावी.
कापूर-आरती ग्रहण करावी, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा. (काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी.)
ओ. देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा.
औ. त्यानंतर देवाला प्रदक्षिणा घालावी. ते सोयीचे नसल्यास स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात.
 अं . यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी.
क. मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर देवतेच्या चरणांवर फूल आणि अक्षता वहाव्यात.
ख. नंतर पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी.
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।
अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ।।
अर्थ : मला तुझे आवाहन आणि अर्चन, तसेच तुझी पूजा कशी करावी, हेही ज्ञात नाही. पूजा करतांना काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर. हे देवा, मी मंत्रहीन, क्रियाहीन आणि भक्तीहीन आहे. मी तुझी आरती / पूजा केली आहे, ती तू परिपूर्ण करवून घे. दिवस-रात्र माझ्याकडून कळत नकळत सहस्रो अपराध घडतात. ‘मी तुझा दास आहे’, असे समजून मला क्षमा कर.
ग. नंतर देवतांच्या नावांचा जयघोष करावा.
घ. त्यानंतर तीर्थ प्राशन करून विभूती (उदबत्तीची राख) भ्रूमध्यावर लावावी.
 *आरती झाल्यावर स्वत:भोवतीच का फिरायचे?*
एकतर त्यात आत्मसन्मान आहे. पूजनाचे, दर्शनाचे, श्रीसेवेचे हे भाग्य आपल्याला लाभले
यासाठी स्वत:चाच तो गौरव आहे.
दुसरी अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आत्मप्रदक्षिणा आरतीनंतर केली जाते.
पूजा, आरती झाल्यावर श्रींचे मूतींत झालेले दर्शनच आता सर्वत्र पाहण्याकरिता गोल फिरणे आहे. सगळीकडे तोच नटला आहे, हे जाणणे आहे.
श्रींच्या सर्वांगीण आणि सर्वत्र विद्यमान रूपाच्या दर्शनाचा सोहळा आहे प्रदक्षिणा.
*काय वैशिष्ट्य आहे या प्रदक्षिणेचे?*
प्रदक्षिणा म्हणजे श्रीविग्रहाच्या भोवती केवळ गोल फेरी मारणे इतकाच सामान्य अर्थ नाही. ती झाली कृती. पण, कोणतीही कृती नेमकी समजून घ्यायची असेल, तर अनिवार्य असते त्यामागील हेतू समजून घेणे, हेतू खरा महत्त्वाचा असतो. त्यासाठी कृती असते.
 *प्रदक्षिणेचा हेतू काय?*
प्रदक्षिणा ही सगळ्या पूजेच्या नंतर केली जाते. पूजा नेहमी श्रींच्या त्या विलोभनीय रूपाकडे पाहत पाहत केली जाते. यात श्रींचे फक्त सन्मुख दर्शन घडत आहे. श्रीतत्त्वाच्या सर्वांगीण आकलनाचा परिपूर्ण रसास्वाद त्यात नाही. तो घेण्याचा मार्ग आहे प्रदक्षिणा.सर्वांगपरिपूर्ण दर्शनाची रीती आहे प्रदक्षिणा.
प्रदक्षिणा शब्दात दक्षिण शब्द आहे. दक्षिण म्हणजे उजवा. श्रीमूर्तीला कायम उजवीकडे ठेवत प्रदक्षिणा केली जाते.उजवीकडे ठेवणे हा सन्मान देण्याचा एक शास्त्रीय प्रकार आहे. श्रींना सातत्यपूर्ण सन्मान देण्याची पद्धती आहे प्रदक्षिणा.
प्रदक्षिणा करताना श्रींचे वेगवेगळ्या अंगाने दर्शन घडते आणि ही सगळीच रूपे ‘उजवीच’ आहेत, हे मनोमन निश्चित करण्याचा मार्ग आहे प्रदक्षिणा.
कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

fourteen + 17 =