दृष्टांत संग्रह समोरच्या माणसाबद्दल खात्री असल्याशिवाय आपले मत बनवू नये

ईतर लेख दृष्टांत संग्रह धार्मिक
Pocket

1 समोरच्या माणसाबद्दल खात्री असल्याशिवाय आपले मत बनवू नये.*

रेल्वेच्या खिडकीत बसून. प्रवास करणाऱा 22 वर्षाच्या मुलगा मोठ्याने ओरडून आपल्या वडिलांना म्हणाला,…… पप्पा बघा झाड मागे पळत आहेत. वडील त्याच्याकडे पाहून हसले. त्यांच्या समोर एक जोडप बसले होते. त्यांना तो मुलगा अबनार्मल वाटला. इतक्यात तो मुलगा परत ओरडला,….. पप्पा ढग आपल्या बरोबर पळत आहेत. समोर बसलेले जोडपे त्या मुलांच्या वडिलांना म्हणाले, तुम्ही मुलाला चांगल्या डॉक्टरकडे का नाही दाखवत. वडील हसले आम्ही आता हास्पीटल मधूनच येत आहोत. माझा मुलगा जन्मतःच अंध आहे. त्याला आजच डोळे मिळाले……

या जगातील प्रत्येक माणसाची एक वेगळी कथा असते. *समोरच्या माणसाबद्दल खात्री असल्याशिवाय आपले मत बनवू नये.* कारण सत्य हे कदाचित आश्चर्यकारक असू शकते .

प्रेम *”माणसावर”* करा त्याच्या “सवयीवर” नाही… . “नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण *”त्याच्यावर”* नाही… . “विसरा” त्याच्या “चुका” पण *त्याला* नाही…….I

*कारण कुणाला कमी करून आपल्याला कधीच मोठं होता येत नसतं……!!*🙏🙏

संकलक : धनंजय महाराज मोरे 9422938199//9823334438

2 *॥ भिक्षापात्र ॥*

—————s—————-

“राजमहालाच्या दारात मोठा गदारोळ उडाला होता.

जवळपास सगळी नगरी तिथे लोटली होती.

प्रसंगच तसा होता.

त्या दिवशी भल्या सकाळी एक भिक्षुक राजाच्या महाली भिक्षा मागण्यासाठी आला होता.

राजा म्हणाला, तू पहिला याचक आहेस आजच्या दिवसातला. काय हवं ते माग. मिळेल.

भिक्षुक म्हणाला, माझ्याकडचं भिक्षापात्र फारच छोटं आहे. त्यात बसेल एवढीच भिक्षा मला पुरेशी आहे.

पण, वचन देण्याआधी विचार कर. जमेल का?

भिक्षुकाच्या हातातलं अतिशय छोटं भिक्षापात्र पाहून राजा हसून म्हणाला, अरे याचका, माझ्याकडच्या संपत्तीची गणती नाही,

माझ्या राज्याला सीमा नाही. हे छोटंसं भिक्षापात्र भरण्यात काय अडचण.

राजाने नोकरांकरवी आपल्या खजिन्यातले उत्तमोत्तम जडजवाहीर मागवले

आणि त्यांनी ते भिक्षापात्र भरायला सांगितलं…

…संध्याकाळ उजाडली तरी ते भरणं सुरूच होतं……राजाचा सगळा खजिना रिता झाला होता, आपल्या लाडक्या राजावर खजील होण्याची पाळी यायला नको,

म्हणून प्रजाजनांनी आणलेली त्यांच्या घरची संपत्तीही त्यात गायब झाली होती.

रात्र झाली तसा राजा भिक्षुकाच्या पायावर कोसळला आणि म्हणाला,

महाराज, माझ्याकडे हे पात्र भरण्याइतकी संपत्ती नाही.

भिक्षुक म्हणाला, अरेरे, उगाच माझा दिवस वाया गेला.

सकाळीच सांगितलं असतं तर पुढे गेलो असतो. पात्र उलटे करून सगळी संपत्ती ओतून तो पुढे निघाला.

राजा धावत त्याच्या मागे गेला आणि हात जोडून त्याने विचारलं, भगवन्, मला फक्त एक सांगा. या इतक्याशा भिक्षापात्रात

माझा सगळा खजिना रिता झाला, तरी ते भरलं नाही. असं काय आहे या भिक्षापात्राचं वैशिष्ट्य? भिकारी म्हणाला, ते मलाही माहिती नाही.

हे भिक्षापात्र मी माणसाच्या कवटीपासून तयार केलं आहे.

त्यातच माणसाचं मन असतं म्हणतात. आणि ते *कशानेही भरत नाही!!”*

संकलक : धनंजय महाराज मोरे 9422938199//9823334438

3 अहंकार आला की, दुःख आले !

एका गावात रथोत्सव चालू असतो. भाविक तो रथ एका गावातून दुसर्‍या गावात वाजत-गाजत नेत असतात. मध्येच रथाचे एक चाक तुटून जाते, त्यामुळे भाविक चिंतित होतात.
 त्यांना प्रश्‍न पडतो, रथातील देवाला दुसर्‍या गावाला कसे पोहोचवायचे ?
भाविक पर्याय म्हणून बैलगाडी, घोडागाडी शोधतात; पण काहीही उपलब्ध होत नाही.
मार्गात मध्येच भाविकांना एक बैल दिसतोे.
सर्व जण त्याला चंदनतैलादी लावून आंघोळ घालतात. रेशमी वस्त्र घालून सजवतात आणि त्यावर देवाला बसवतात. उत्सव पुन्हा चालू होतो अन् सर्व जण दुसर्‍या गावाकडे प्रयाण करतात. काही भाविक देवाला हार घालू लागतात. काही वेळाने देवाला हार घालायला जागा रहात नाही; म्हणून लोक बैलालाही भक्ती-भावाने हार घालू लागतात.
मार्गाने जातांना बैल विचार करतो आतापर्यंत कधी मिळाले नाही, ते राजवैभव मला आज कसे काय मिळत आहे ?
 भाविक देवाला ओवाळत असलेली आरती आपल्यासाठी आहे, असे बैल मानू लागला आणि त्यामुळे तो अधिकच आनंदी झाला. काही क्षणांनंतर त्याच्या मनात विचार आला,
 मला हे राजवैभव मान्य आहे; पण माझ्या पाठीवर काहीतरी ओझे आहे. हा विचार आल्यावर तो स्वतःचे अंग झाडतो.
त्यामुळे त्याच्या पाठीवरील देव खाली पडतो. हे पाहून भाविक भडकतात आणि बैलाला धोपटतात.
तात्पर्य :
 जोपर्यंत आपल्यावर देवाची किंवा गुरूंची कृपा आहे, आपल्याजवळ त्यांचा वास आहे,
तोपर्यंतच आपल्याला मानसन्मान आणि समाजाकडून लाभणारे प्रेम मिळणार आहे.
ज्या क्षणी अहंकार बळावतो आणि हे सर्व माझ्यामुळे आहे, माझ्यासाठी आहे, असे विचार येऊ लागतात, त्या वेळी आपली स्थिती त्या बैलापेक्षा वेगळी रहात नाही; म्हणून देवाला आणी गुरूला  विसरू नये.अहंकार विरहित रहावे.
 सर्व मानसन्मान आणि कर्तेपणा देवाच्या आणी गुरूच्या चरणी अर्पण करावे. तसेच नेहमी कृतज्ञता अन् शरणागत भावात रहावे..

संकलक : धनंजय महाराज मोरे 9422938199//9823334438

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

nineteen + 20 =