महाराष्ट्र पोलिस आणि माणुसकी सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

ईतर लेख
Pocket

*॥ सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ॥*
     दोन दिवसाआधी सोलापूरहून जालन्याला जाण्यासाठी रात्री १२ वाजताच्या ट्रॅव्हल्स मध्ये बसलो, गाडी पूर्ण भरलेली असल्यामुळे काही किलोमीटरचा प्रवास चालकाच्या केबिन मध्ये बसून करावा लागला, चालकाने आमची बसण्याची व्यवस्थित सोय व्हावी या साठी दुसऱ्या गाडीच्या चालकाला फोन करून विचारपूस केली तर फोन वर समजल की, तुळजापूर मध्ये रात्री १ च्या सुमारास काही युवक वाहनांवर दगडफेक करत आहेत, वाहनांची तोडफोड करत आहेत,
मी चालकाच्या शेजारी बसलेलो असल्यामुळे लगेच घटनेची पूर्ण चौकशी केली, अन चालकाला आमची गाडी तुळजापूर मध्ये न वळवता थेट बायपास ने धाराशिव (उस्मानाबाद) ला घेण्याचा सल्ला दिला.
     या मधल्या काळात twitter वर tweet करून संबंधित घटनेची माहिती महाराष्ट्र पोलीस व मुंबई पोलीस यांना कळवली , काही वेळातच मुंबई पोलीसांचा रिप्लाय आला,
आम्ही तुम्हाला follow करतोय,
तुम्हाला संपर्क कसा करावा हे कळवा,
मी लगेच माझा संपर्क क्रमांक पाठवला, काही क्षणात मुंबई क्राईम ब्रांच च्या अधिकाऱ्याचा कॉल आला, त्यांनी संबंधित घटनेची परिपूर्ण माहिती घेतली, अन लगेच धाराशिव (उस्मानाबाद) पोलिसांन कडे ही तक्रार वर्ग केली,
१० मिनिटात पुन्हा फोन वाजला, फोन उचलल्यावर तिकडून आवाज आला, चेतन शर्मा बोलताय?
होय बोलतोय,
साहेब PSI शिंदे बोलतोय, आत्ताच आम्हाला मुंबई ऑफिस मधून तक्रार आलीय,
कृपया घटनेविषयी संपूर्ण माहिती मिळेल का?
संपूर्ण माहिती दिल्यानंतर मी त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे इतक्यात त्यांनीच धन्यवाद म्हणून फोन ठेवला.
पुन्हा 15 मिनिटांनी आणखी एक कॉल आला, साहेब हवालदार सय्यद बोलतोय मी घटनास्थळी आलोय, तुम्ही कुठे आहात? मी म्हणालो आम्ही बायपासने पुढे निघालोय,
त्यांच्या कडून उत्तर आल,
बंदोबस्त लावलाय,
घटना स्थळी आता शांतता आहे.
मी सुटकेचा निश्वास सोडला,
रात्रीच्या १.३० वाजता हे खाकी वर्दी वाले एका tweet ची दखल घेऊन बंदोबस्त लावतात, कारण समाजात शांतता प्रस्थापित व्हावी, तेढ निर्माण होऊ नये, प्रत्येकजण गुण्यागोविंदाने नांदावा,
हेच ते वर्दीवाले ज्यांना आपण वेगवेगळ्या नावाने संबोधून, कंमेंट पास करून त्यांचा अपमान करतो, मित्रांनो त्या खाकी वर्दी मधल्या माणसाला जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जाणून घ्याल, तेव्हा तुम्हाला त्यांच्यातील माणुसकी दिसेल.
सलाम त्या महाराष्ट्र पोलिसांना ज्यांनी मागील काही दिवसात शांतता रहावी, या साठी अहोरात्र कार्य बजावून एक नवा आदर्श प्रस्थापित केला.
सलाम त्या मुंबई पोलिसांना ज्यांनी मध्यरात्री देखील tweet ची दखल घेतली.
सलाम त्या हवालदाराला ज्यानी बंदोबस्त लावल्याची माहिती देण्यासाठी रात्री १.३० वाजता कॉल केला.
सलाम अश्या अनेक पोलिसांना ज्यांनी स्वतःच्या कुटूंबाकडे दुर्लक्ष करून, दुसऱ्याचे कुटूंब सुरक्षित ठेवले.
सलाम माझ्या त्या सर्व पोलीस मित्रांना ज्यांनी स्वतःची परवाह न करता, दुसऱ्यांच्या रक्षणासाठी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली.
     त्या रात्री खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पोलिसांच्या तत्परतेचे दर्शन झाले.
© चेतन शर्मा
-८०८७५३५७६७
Twitter – SChetan_
कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

twelve + 7 =