हरिकथेचे (किर्तन) आठ फायदे धनंजय महाराज मोरे

ईतर लेख धार्मिक वारकरी संत
Pocket

👉हरिकथेचे (किर्तन) आठ फायदे

🌹१.गेय-:-गायन (नादब्रम्ह) नारदाचे, व्याख्यान व्यासांचे, नाचणे हनुमंताचे येते.

नारायण नामें होऊं जिवन्मुक्त। किर्तनी अनंत गाऊं गीती॥

🌹२.पेय-:-किर्तनात रस, आनंद, सुख मिळते.

सुखाची समाधी हरिकथा माऊली। विश्रांती साऊली शिणलियाची॥

🌹३.ज्ञेय-:-किर्तनामुळे ज्ञान प्राप्त होते.

नाचू किर्तनाचे रंगी। ज्ञानदिप लाऊ जगी॥

🌹४.श्रेय-:-किर्तनामुळे सर्वाचे कल्याण होते.

कथा हे भूषण जनामध्ये सार। तरले अपार बहु येणे॥

🌹५.सेव्य-:-किर्तनातुन देवाची सेवा होते.

कोणीतरी कांही केलें आचरणे। मज या किर्तनेविण नाही॥

🌹६.प्रेय-:-किर्तन देवास फार आवडते.

तुका म्हणे यासी किर्तनाची गोडी। प्रेमे घाली उडी नामासाठी॥

🌹७.ध्येय-:-किर्तनामुळे देव प्राप्त होतो.

कोठे नका पाहों करा हरिकथा। तेथे अवचिता सापडेल॥

🌹८.ब्रम्हमय-:-किर्तनामुळे देव मिळतो नव्हे किर्तनकारच देव होतो.

किर्तन चांग किर्तन चांग। होय अंग हरिरुप॥

👏🏾👏🏾👏🏾👏🏾💐

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

fifteen − four =