वारकरी सांप्रदायिक शुद्ध (काकडा) काकड आरती चे अभंग

ग्रंथ
Pocket

‘ 🚩🌷🌹 श्री काकड आरती.🙏🚩

(प्रारंभ – – मिती आश्र्विन शुध्द पौर्णिमा – ते –🌷 कार्तिक शुद्ध पौर्णिमा )

🌹 श्रीगणेशायनमः

🌻 भजन — जय जय राम कृष्ण हरी | जय जय राम कृष्णहरी — –
श्री पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

🚩🌹 ऊठा ऊठा हो सकळीक |
वाचें स्मरावा गजमुख ||
रिध्दि सिध्दीचा नायक !
सुखदायक भक्तांशी ||
अंगी शेंदुराची उटी |
माथां शोभतसे किरीटी ||
केशर कस्तुरी लल्लाटी |
हार कंठी साजिरा ||
कानीं कुंडलाची प्रभा |
चंद्र — सुर्य जैसे नभा ||
माजी नागबंदी शोभा |
स्मरतां ऊभा जवळी तो ||
कांसे पितांबराची कटी |
हाती मोदकाची वाटी ||
रामानंद स्मरता कंठी |
तो संकटी पावतो || 🙏

🌷🌻 रुप पहातां लोचनी |
सुख झाले हो साजणी ||
तोहा विठ्ठल बरवा |
तोहा माधव बरवा ||
बहुत सुकृताची जोडी |
म्हणोनी विठ्ठली आवडी||
सर्व सुखाचे आगर |
बाप रखुमा देवीवर ||

🌷🌻 आरंभी आवडी आदरे आले नाम |
तेणे सकळ सिध्दी जगी झाले पुर्ण काम ||
राम कृष्ण गोविंद गोपाळा |
तु माय माऊली |
जिव्हीचा जिव्हाळा ||
तुझीयेनें नामें सकल संदेह फिटला |
बाप रखुमादेवी वरु श्री विठ्ठला ||

🌷🌻 राहो आतां हेची ध्यान |
डोळां मन लंपट ||
कोंडुन कोंडुन धरीन जीवे |
देहभावे पुजीन ||
होईल येणे कळसां आले |
स्थिरावले अंतरी ||
तुका म्हणे गोजिरीया |
विठोबा पायां पडुं द्या ||

🌷🌻 वचन ऐका कमळापती |
माझी रंकाची विनंती ||
कर जोडितो कथेकाळी |
आपण असावे जवळी ||
ध्यावी घ्यावी माझी भाक |
जरी कां मागेन आणिक ||
तुकया बंधु म्हणे देवा |
शब्द इतुकाची राखावा ||

🌷🌻 तुज पाहातां सामोरी |
दृष्टी न फिरे माघारी ||
माझे चित्त तुझे पाया |
मिठी पडली पंढरीराया ||
नोहे सारितां निराळे |
लवण मेळवितां जळे ||
तुका म्हणे बळी |
जीव दिला पाया तळी ||

🌷🌻 तुम्ही सनकादिक संत |
म्हणवितां कृपावंत ||
एव्हढा करा उपकार |
सांगा देवा नमस्कार ||
माझी भाकावी करुणा |
विनवा पंढरीचा राणा ||
तुका म्हणे मज आठवा |
मुळ लवकरी पाठवा ||

🌷🌻 आता तुम्ही कृपावंत |
साधुसंत जीवलग ||
गोमटे ते करा माझे |
भार ओझे तुम्हांसी ||
वंछीले ते पायापाशी |
नाही यासी वेगळे ||
तुका म्हणे सोडिल्या गाठी |
दिली मिठी पायापाशी ||

🌷🌻 लेकुराचे हित |
वाहे माऊलीचे चित्त ||
ऐसी कळवळ्याची जाती |
करी लाभाविण प्रिती ||
पोटी भार वाहे |
त्याचे सर्वस्वही साहे ||
तुचा म्हणे माझे |
तुम्हा संतांवरी ओझे ||

🌷🌻 करोनी ऊचीत |
प्रेम घाली ह्लदयात ||
आलो दान मागायास |
थोर करोनिया आस ||
चिंतन समयी सेवा |
आपुलीच देई ||
तुकया बंधु म्हणे भावा|
मज निरवावे देवा||

🌷🌻 न धरी उदास |
माझी पुरवावी आस ||
ऐका ऐका नारायणा |
माझी पुरवा विज्ञापना ||
मायबाप बंधुजन |
तुची सोयरा सज्जन ||
तुका म्हणे तुज विरहीत |
कोण करील माझे हित ||

🌷🌻 गरुडाचे पायी |
ठेवी वेळोवेळां डोई ||
वेगे आणावा तो हरी |
मज दिनाते उध्दरी ||
पाय लक्ष्मीच्या हाती |
तिशी यावे काकुळती ||
तुका म्हणे शेषा |
जागे करा ह्रषीकेषा ||

🌷🌻 ये ग ये ग विठाबाई |
माझे पंढरीचे आई ||
भीमा आणि चंद्रभागा |
तुझे चरणाची गंगा ||
इतुक्या सहीत त्वा बा यावे |
माझे रंगणी नाचावें ||
माझा रंग तुझे गुणी |
म्हणे नामयाची जनी ||

🌷🌻 भजन – – विठोबा – रखुमाई 🙏

🌷 ऊठा ऊठा प्रभात जाहली |
चित्ता )श्री विठ्ठल माऊली ||
दिन जनांची साऊली |
येई धावोनी स्मरताची ||
पंढरपुरीचे भीमातटी |
सुंदर मनोहर गोमटी ||
दोन्ही कर ठेवोनिया कटी |
भेटीसाठी तिष्टतसे ||
किरीट कुंडले मंडीत |
श्रीमुख अती सुंदर शोभत ||
गळा वैजयंती डुल्लत |
हार मिरवीत तुळसीचा ||
सुरेख मुर्ती सगुण सावळी |
कंठी कौस्तुभ एकावळी ||
केशरऊटी परीमळ आगळी |
बुक्का भाळी विलसतसे ||
पित पितांबर कसला कटी |
अक्षय वीट चरण तळवटी ||
सकळ सौंदर्य सुखाची पेटी |
ह्रदय संपुष्टी आठवा ते ||
अती प्रिय आवडे तुळसी बुक्का |
तैसीच प्रिती करी भोळ्या भाविका ||
नामा पद पंकज पादुका ||
शिरी मस्तकी वंदीतसे ||

🌷🌻 ऊठा जागे व्हा रे आतां |
स्मरण करा पंढरीनाथा ||
भावे चरणी ठेवी माथां |
चुकवी व्यथा जन्मीच्या ||
धन , दारा ,पुत्र ,जन ,|
बंधु ,सोयरे ,पिशुन ||
सर्व मिथ्या हे जाणुन |
शरण रिघा देवाशी ||
माया विघ्ने भ्रमला खरे |
म्हणता मीं माझेनीं घरे ||
हे तो संपत्तीचे वारे |
साचोकारे जाईल ||
आयुष्य जात आहे पहा |
काळ जपतसे महा ||
स्वहिताचा घोर वहा |
ध्यानीं रहा श्री हरीच्या||
संत चरणी भाव धरा |
क्षणक्षणा नाम स्मरा ||
मुक्ती सायुज्यता वरा |
हेची करा बापानों ||
विष्णुदास विनवी नामा |
भुलु नका भव कामा ||
धरा अंतरी नीज प्रेमा |
न चुका नेम हरिभक्ती ||

🌷🌻 ऊठा ऊठा साधुसंत |
साधा आपुलाले हित ||
गेला गेला हा नरदेह |
मग कैसा भगवंत ||
ऊठोनी वेगेसी |
चला जाऊ राऊळाशी ||
जळतील पातकांच्या राशी |
काकड आरती देखलिया ||
ऊठोनिया पहाटे |
विठ्ठल पहा ऊभा वीटे ||
चरण तयाचे गोमटे |
अमृतद्रुष्टी देखलिया ||
जागे करा रुख्मिणीवरा |
देव आहे निदसुरा ||
वेगे लिंब लोण करा |
दृष्ट होइ तयासी ||
पुढे वाजंत्री वाजती |
ढोल धमामे गर्जती ||
होते काकड आरती |
पांडुरंग रायाची ||
सिंहनाद शंख भेरी |
गजर होतो महाद्वारी ||
केशवराज विटेवरी |
नामा चरण वंदितो..

🌷🌻अवघे हरिजन मिळोनी |
आले राऊळा ||
दोन्ही कर जोडोनी |
विनविती गोपाळा ||
ऊठा पांडुरंगा |
हरिजन सांभाळी ||
पाहुं द्या वदन |
वंदु पायाची धुळी ||
ऊगवला दिनकर |
झाल्या निवळस दिशा ||
कोठवर निद्रा आतां |
ऊठा परेशा ||
तुका म्हणे आम्ही ऊभे |
तिष्ठत द्वाराशी ||
दोन्ही कर जोडोनी |
गाई गोपाळ सेवेसी ||

🌷🌻 कांहो तुम्ही निश्र्चिंतीनें |
निजलाती हरी ||
मानियेले सुख आम्ही |
वाचुं कैशापरी ||
ऊठा सावध व्हावे |
क्षेम सकला द्यावे ||
जयाजी वासना |
तया तैसे पुरवावे ||
जन्मोजन्मी सांभाळीले |
क्षमा करा अन्याय ||
कृपा करी देवा आम्हां |
तुची मायबाप ||
तुका म्हणे करा |
वडीलपण दानासी ||
तेणे सुख होय |
सकलही जनांसी ||

🌷🌻 ऊठा पांडुरंगा आतां |
दर्शन द्या सकला ||
झाला अरुणोदय |
सरली निद्रेची वेळां ||
संत ,साधु ,मुनी अवघे |
झालेती गोळा ||
सोडा शेजसुख आतां |
पाहुं द्या मुखकमळा ||
रंगमंडपी महाद्वारी |
झालीसे दाटी ||
मन उताविळ |
रुप पहावया द्रुष्टी ||
राही रखुमाई तुम्हा |
येऊद्या दया ||
शेजे हलवुनी जागे |
करा देवराया ||
गरुड हनुमंत पुढे|
पहाती वाट ||
स्वर्गीचे सुरवर|
घेवोनी आले बोभाट ||
झाले मुक्तद्वार |
लाभ झाला रोकडा ||
विष्णुदास नामा |
ऊभा घेवुन काकडा ||

🌷🌻 ऊठा अरुणोदय |
प्रकाश झाला ||
घंटा गजर |
गर्जीनला ||
हरी चौघडा सुरु झाला |
काकड आरती समयाचा ||
महाद्वारी वैष्णवजन |
पुजा सामुग्री घेवुन ||
आले द्यावे तयांशी दर्शन |
बंदीजन गर्जती ||
सभा मंडपी किर्तन घोष |
मृदुंग टाळ विणे सुरस ||
आनंदे गाती हरीचे दास |
परम उल्हासे करोनिया ||
चंद्रभागे वाळवंटी |
प्राःतस्नानाची जनदाटी ||
आता येतील आपुले भेटी |
ऊठी ऊठी बा गोविंदा ||
ऐसे विनवी रुख्मिणी |
जागृत झाले चक्रपाणी ||
नामा बध्दांजुली जोडोनीं |
चरणी माथा वंदीतसे ||

🌷🌻 ऊठा पांडुरंगा
प्रभात समयो पातला
वैष्णवांचा मेळा
गरुड पारी पातला
वाळवंटा पासुनी
महाद्वारा पर्यंत
सुरवरांची दाटी
ऊभे जोडुनी हात
शुक सनकादिक
नारद तुंबर
भक्तांच्या कोटी
कवाडा आडुनी
पाहताती जगजेठी
सुरवरांची विमाने
गगनी दाटली सकळ
रखुमाबाई माते
वेगी ऊठवा घननीळ
रंभादिक नाचती
उभ्या जोडोनी हात
त्रिशुळ डमरु घेऊनी आला
गिरीजेचा कांत
पंचप्राण आरत्या घेवोनिया
देवस्रिया येती
भावे ओवाळती
राही रखुमाईचा पती
अनंत अवतार घेसी
भक्ता कारणे
कनवाळु कृपाळु
दीनालागी ऊध्दरणे
चौ युगांचा भक्त नामा
ऊभा किर्तनी
पाठीमागे डोळे झांकुनी
उभी ते जनी ||

🌷🌻 भजन : विठोबा – रखुमाई 🙏🙏

🌷🌻 ऊठा सकलजन
ऊठीले नारायण
आनंदले मुनीजन
तिही लोक
करा जयजयकार
वाद्यांचा गजर
मृदुंग विणे अपार
टाळ घोष
जोडोनिया कर
मुख पहा सादर
पायावरी शिर ठेवोनिया
तुका म्हणे काय
पढीयंते ते मागा
आपुलाले सांगा
सुख दुःख

🌷🌻सहस्त्र दिपे दिप
कैसी प्रकाशली प्रभा
ऊजळल्या दशदिशा
गगना आलीसे शोभा
काकड आरती माझी
कृष्ण सभागिया
चराचर मोहरले
तुझी मुर्ती पहावया
कोंदलेसे तेज
प्रभा झालीसे एक
नित्य नवा आनंद
ओवाळिता श्रीमुख
आरती करितां तेज
प्रकाशले नयनी
तेणे तेजे मीनला
एका एकी जनार्दनी

🌷🌻 भक्तीचिया पोटी
बोध काकडा ज्योती
पंचप्राण जीवेभावे
ओवाळु आरती
माझ्या पंढरीनाथा
दोन्ही कर जोडोनी
चरणी ठेवीला माथा
काय महिमा वर्णु
आता सांगणे किती
कोटी ब्रम्हहत्या मुख
पाहता जाती
राही ,रखुमाई
ऊभ्या दोही दो बाही
मयुर पिच्छे , चामरे
ढाळिती ठाईचे ठाई
तुका म्हणे दिप घेवोनी
उन्मन ती शोभा
विटेवरी ऊभा दिसे
लावण्याचा गाभा

🌷🌻 लाजले गे माये
आता कोणा ओवाळुं
जिकडे पाहे तिकडे
चतुर्भुज गोपाळु
ओवाळु मीं गेले माये
गेले द्वारके
जिकडे पाहे तिकडे
चतुर्भुज सारिखे
ओवाळु मीं गेले माये
सखीया माझारी
जिकडे पाहे तिकडे
चतुर्भुज नरनारी
वैजयंती माळ गळां
श्रीवत्सलांच्छन
विष्णुदास नामा
येणे दाविली खुण

🌷🌻 तुझिये निढळे कोटी चंद्र प्रकाशे
कमलनयन हास्य वदन हांसे
हाल कां रे कृष्णा डोल कां रे
घडीये घडीये घडीये
गुज बोल कां रे
उभा राहोनिया कैसा
हालवितो बाहो
बापरखुमादेवीवरु विठ्ठलु ना हो

🌷🌻 अवताराच्या राशी
तो हा ऊभा विटेवरी
शंख ,चक्र, गदा ,पद्म
सहित करी
देखीला देखीला देव
आदि देव बरवा
समाधान जीवा पहातां
वाटे गे माये
सगुण चतुर्भुज रुपडे
तेज पुंजाळिती
वंदु चरणरज नामा
विनवितसे पुढती

🌷🌻 योगिया दुर्लभ
तो म्या देखीला साजणी
पहातां पहातां मना
न पुरे धणी
देखीला देखीला माये
देवांचा देव
फिटला निःसंदेह
निमाले दुजेपण
अनंतरुपे ,अनंतवेषे
देखिले म्या त्यासी
बापरखुमा देवीवरदा
खुण बाणली कैसी

🌷🌻 जोडोनिया कर
चरणी ठेविला माथा
परिसावी विनंती
माझी पंढरीनाथा
असो नसो भाव
आलो तुझीया ठाया
परिसावी विनंती
माझी पंढरीराया
अखंडीत असावे
ऐसे वाटते पायी
साहोनी संकोच
ठाव थोडासा देई
तुका म्हणे तुझी आम्ही
वेडीवाकुडी
नामे भव पाश हाते
आपुल्या तोडी

🌷 🌻माझे चित्त तुझे पायी
राहे ऐसे करी कांही
धरोनिया बाही
भव हा तारी दातारा
चतुरा तु शिरोमणी
गुण लावण्याची खाणी
मुकुट शिरोमणी
धन्य तुची विठोबा
करी या तिमीरांचा नाश
उदय होऊनीं प्रकाश
तोडी आशा पाश
करी वास ह्रदयी
पाहे गुंतलो नेणता
माझी असो तुम्हा चिंता
तुका ठेवी माथा
पायी आतां राखावे

🌷🌻आता कोठे धावे मन
तुमचे चरण देखलिया
भाग गेला शिण गेला
अवघा झालासे आनंद
प्रेमरस बैसली मिठी
आवडी लाठी मुखासी
तुका म्हणे आम्हा जोगे
विठ्ठल घोगे खरे माप

🌻🌷 भजन : जय जय वासुदेव हरी 🙏

🌷🌻सुखे सेऊं ब्रम्हानंदा
गाऊं रामनाम सदा
नोहे मग बाधा
काळदुत यमाची
करुं वासुदेव स्मरण
तेणे तुटे रे बंधन
खंडेल कर्मांचे वदन
वासुदेव जपताची
तीर्थयात्रे सुखे जाऊं
वाचे विठ्ठल नाम घेऊ
संतासंगे सेऊं
वासुदेव धणीवरी
लोभ ममता दवडुं आशा
उदरव्यथेचा ओळसा
न करुं आणिक सायासा
वासुदेवा वांचुनी
मुख्य वर्माचे हे वर्म
येणे साधे सकल धर्म
एका जनार्दनी नाम
वासुदेव आवडी

🌷 🌻घुळघुळा वाजती टाळ
झणझणा नाद रसाळ
उदो झाला पाहाली वेळ
उठा वाचे वदावा गोपाळ गा
कैसा वासुदेव बोलतो बोल
बाळा पोटी माय रिघेल
मेले माणस जिते उठविल
वेळकाळाते ग्रासील गा
आतां ऐसेची अवघे जन
येते जाते तयापासुन
जगी जग झाले जनार्दन
उदो प्रगटला
बिंबले भान गा
टाळा टाळी लोपला नाद
अंगोअंगी मुरला छंद
भोग भोगताची आटला भेद
ज्ञान गिळुनी गांवा गोविंदु गा
गांवा आंत बाहेर हिंडे आळी
देवोदेवीची केली चिपुळी
चरण नसता वाजे धुमाळी
ज्ञानदेवाची कांती सावळी गां

🌷🌻 बाबा अहंकार निशी घनदाट
गुरुवचने फुटली पहाट
माता भक्ती भेटली बरवंट
तीने मार्ग दाविला चोखट गा
नरहरी रामा गोविंदा वासुदेवा
एक बोल सुस्पस्ट बोलावा
वाचे हरि हरि म्हणावा
संत समागमु धरावा
तेणे ब्रम्हानंद होय आघवा गा
आला सितल शांतीचा वारा
तेणे सुख झाले या शरीरा
फिटला पातकांचा वारा
कळीकाळासी धाक दरारा गा
अनुहात वाजती टाळ
अनुक्षिर नाद रसाळ
अनुभव तन्मय सकळ
नामा म्हणे केशव कृपाळु गा

🌷🌻 पुर्व जन्मी पाप केले
ते हे बहु विस्तारिले
विषय सुख नाशिवंत
सेविता तिमीर कोंदले
चौरयांशी लक्ष योनी
फिरतां दुःख भोगिले
ज्ञानदृष्टी हारपली
दोन्ही नेत्र आंधळे
धर्म जागो सदैवांचा
जे बा पर ऊपकारी
आंधळ्या दृष्टी देतो
त्याचे नांव मीं उच्चारी
संसार दुःख मुळ
चहुकडे इंगळ
विश्रांती नाही कोठे
रात्र॔दिवस तळमळ
काम ,क्रोध ,लोभ, शुनी
पाठी लागली ओढाळ
कवणा मीं शरण जाऊं
आता दृष्टी देईल निर्मळ
माता, पिता, बंधु ,बहिणी
कोणी न पवती निर्वाणी
इष्टमित्र सजन सखे
हे तो सुखाची मांडणी
एकला मीं दुःख भोगी
कुंभपाक जांचणी
तेथे कोणी सोडविना
एका सद् गुरु वाचोनी
साधुसंत मायबाप
तिही केले कृपादान
पंढरीये यात्रे नेले
घडले चंद्रभागे स्नान
पुंडलिक वैद्यराजे
पुर्वी साधिले साधन
वैकुठीचे मुळपीठ
डोळां घातिले अंजन
कृष्णांजन एकवेळा
डोळां घालितां अढळ
तिमीर दुःख गेले
फिटले भ्रातो पडळ
श्री गुरु निवृत्तीराये
मार्ग दाविला सोज्वळ
बापरखुमा देवीवरु
विठ्ठल दिनाचा दयाळ

🌷🌻 मुका झालो वाचा गेली
होतो पंडीत महाज्ञानी
दशग्रंथ षडशास्त्र पुराणी
चारी वेद मुखोद् गत वाणी
गर्वामध्ये झाली सर्व हानी
जिव्हां लांचावली भोजना
दुग्ध ,धृत ,शर्करा, पक्वान्ना
निंदीले उपान्ना
तेणे पातलो मुख बंधना
साधुसंतांची निंदा केली
हरिभक्तांची स्तुती नाही केली
तेणे वाचां पंगु झाली
एका जनार्दनी कृपा लाधली

🌷🌻 सुंदर माझे जाते गे
फिरे बहुकौतुके
ओव्या गाऊं कौतुके
तु ये रे बा विठ्ठला
जीव -शिव दोन्ही खुंटेगे
प्रपंचाचे नेटे गे
लावुनीं पांची बोटे
तुं ये रे बा विठ्ठला
सासु आणि सासरा
दिर तो तिसरा
ओव्या गाऊं भ्रतारा
तुं ये रे बा विठ्ठला
बाळा सोळा गडणी
अवघ्या कामिनी
ओव्या गाऊं बैसुनीं
तु ये रे बा विठ्ठला
प्रपंच दळण दळीले
पीठ भरीले
सासु पुढे ठेवीले
तुं ये रे बा विठ्ठला
सत्वाचे आंधण ठेविले
पुण्य वैरीले
पाप ते उतुं गेले
तुं ये रे बा विठ्ठला
जनी जाते गाईल
किर्ती राहिल
थोडासा लाभ होइल
तुं ये रे बा विठ्ठला
🌷🌻 जग जोगी जगजोगी
जाग जाग बोलती
जागतां जगदेव
राखां कांही भाव
अवघा क्षेत्रपाळ
पुजावा सकळ
पुजा पत्र ,,कांही
फळ पुष्प तोय
बहतां दिसां फेरा
आला या नगरा
नका घेऊं भार
धर्म तोची सार
तुका मागे दान
द्यावे जी अनन्य

🌻 🌷हरिने माझे हरिले चित्त
भार ,वित्त विसरले
आता कैसीं जाऊ घरा
न्हवे बरा लौकिक
पारखियासी सांगता गोष्टी
घरची कुटी खातील
तुका म्हणे निवांत राही
पाहिले पाही परतोनी

🌷 🌻भुलविले वेणुनादे
वेणु वाजविला गोविंदे
पांगुळले यमुनाजळ
पक्षी राहिले निश्र्चळ
तृणचरे लुब्ध झाली
पुच्छे वाहुनियां ठेली
नाद न समाये त्रिभुवनी
एका भुलला जनार्दनी

🌷 🌻कशी जाऊ मीं वृंदावना
मुरली वाजवितो कान्हा
पैलतिरी हरी वाजवी मुरली
नदी भरली यमुना
कांसे पितांबर कस्तुरी तिलक
कुंडल शोभे काना
काय करुं बाई ,कोणाला सांगु
नामाची सांगड आणा
नंदाच्या हरिनें कौतुक केले,
जाणे अंतरीचे खुणा
एका जनार्दनी मनी म्हणा ,
देव महात्य कळेना कोणा

🌻 पुंडलिक वरदेव
हरि विठ्ठल
श्रीज्ञानदेव तुकाराम

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

nineteen + twelve =