भर्तृहरीची सात शल्ये

भर्तृहरीची सात शल्ये

दृष्टांत संग्रह धार्मिक पौराणिक पौराणिक व्यक्ती
Pocket

भर्तृहरीची सात शल्ये

या जगातील प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री असो वा पुरुष, त्या व्यक्तीच्या मनात कुठले ना कुठले तरी शल्य असते. अशा सात शल्यांविषयीचा भर्तृहरीचा एक श्लोक आहे.

शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी

सरो विगतवारिजं मुखमनक्षरंस्वाकृते:

प्रभुर्धनपरायण: सततदुर्गत: सज्जन:

नृपाड्गणगत: खलो, मनसि सप्तशल्यानि मे ।

  1. चंद्राला दिवसा प्रकाश नसणे हे पहिले शल्य.
  2. सुंदर स्त्रीला वृद्धत्व येणे हे दुसरे शल्य,
  3. एखाद्या स्वच्छ पाण्याचे सरोवर कमळाच्या फुलाशिवाय असणे हे तिसरे शल्य,
  4. एखादा मनुष्य चांगला असावा पण तो निरक्षर किंवा मूर्ख असावा हे चौथे शल्य,
  5. एखादा मनुष्य दानशूर असावा पण तो धनलोभी असावा हे पाचवे शल्य,
  6. विद्वान माणसे दरिद्री असावीत हे सहावे शल्य आणि,
  7. देशाच्या राज्यकारभारावर दुष्ट, नीच लोकांचा पगडा असावा हे भर्तृहरीचे सातवे शल्य आहे.

संकलक : धनंजय महाराज मोरे

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

twelve + 10 =