अवदसा अलक्ष्मी कुठे राहते

धार्मिक
Pocket

अलक्ष्मी/अवदसा/अवदसा
अलक्ष्मी/अवदसा/अवदसा ही लक्ष्मीची मोठी बहीण असून ती दुर्भाग्याची देवता मानलेली आहे.
जन्म
           पद्मपुराणामध्ये हिच्या विषयीची कथा सांगितली आहे ती अशीदेवासुरांनी केलेल्या समुद्रमंथनातून कालकूटानंतर पण लक्ष्मीच्या आधी वर आली म्हणून हिला लक्ष्मीची मोठी बहीण किंवा ज्येष्ठा लक्ष्मी म्हटली आहे. तिच्याविषयीच्या श्‍लोकाचा अर्थ असा- कालकूटानंतर अलक्ष्मी/अवदसा/अवदसा वर आली, तिचे तोंड काळे, डोळे लाल आणि केस पिंगट होते. तिच्या शरीरावर म्हातारपणाच्या खुणा होत्या
 .                           अलक्ष्मी/अवदसा/अवदसा समुद्रातून वर आल्यावर ती देवांना म्हणाली मी काय करु? त्यावर देवांनी तिला सांगितले की तू कोळसे, केस, कोंडा (केर) अस्थी यामध्ये राहा. ज्या घरात कलह असेल तिथे तू राहा. जिथे असत्य, कठोर भाषण चालते, सायंकाळी अभक्ष्य भक्षण केले जाते, गुरु, देव, अतिथी यांचा समादर होत नाही. वेदमंत्रांचा घोष जिथे नसतो, जिथे परद्रव्यापहरण परदारागमन, सज्जन निंदा इ. गोष्टी चालतात तिथे तू राहा. त्याप्रमाणे ती राहली.
विवाह
समुद्रमंथनातून लक्ष्मी वर आली. तिचा विष्णूबरोबर विवाह ठरला परंतु ज्येष्ठेच्या आधी कनिष्ठेचे लग्न कसे करायचे असा प्रश्‍न लक्ष्मीने उपस्थित केला तेव्हा विष्णूने अलक्ष्मी/अवदसा/अवदसाचे उद्दालक नावाच्या दीर्घ तपस्या करणार्‍या ऋषीबरोबर लग्न लावून दिले.
त्याग
परंतु उद्दालकाचा वैदिक आचार पाहून तिला तो आवडेनासा झाला आणि उद्दालकालाही तिचा स्वभाव आवडला नाही. अखेर उद्दालकाने अलक्ष्मी/अवदसा/अवदसाला पिंपळाखाली बसायला सांगितले आणि तो निघून गेला. उद्दालक परत येत नाही हे पाहून अलक्ष्मी/अवदसा/अवदसा रडू लागली.
वरप्राप्ती
तिचा तो आक्रोश  ऐकून लक्ष्मी विष्णूसह तिला भेटायला आली विष्णूने तिचे सांत्वन केले व तिथेच राहायला सांगितले तो म्हणाला, दर शनिवारी लक्ष्मी तुला भेटायला येईल व त्यामुळे शनिवारी एशस्थ पूज्य मानला जाईल आणि जे तुझी पूजा करतील, त्यांच्या ठिकाणी लक्ष्मी निश्चल राहील.
वर्णन
अलक्ष्मी/अवदसा/अवदसाच्या मूर्तीचे वर्णन काश्यप शिल्प, अशुमद्भेदागम, सुप्रेभदायम, पूर्व कारणागम इ. ग्रंथामध्ये आढळले आहे. ते वर्णन असे ही द्विभूजा, कृष्णवर्णाची, मोठ्या ओठांची, लांब नाकाची, लोंबणार्‍या स्तनांची, निळे वा लाल रंगाचे वस्त्र नेसलेली, उजव्या हातात कमळ आणि डाव्या हातात कर्‍हा धारण करणारी व भद्रपीठावर पाय सोडून सुखाने बसलेली असून तिने विविध अलंकार धारण केलेले असून वेणी घातलेली आहे. तिच्या रथावर, काक चिन्हांकीत ध्वज असतो. ती कन्यापुत्रासहीत असते. तिच्या उजव्या बाजूला मागे बैलाचे तोंड असलेला मुलगा असतो. लक्ष्मीच्या आधी अलक्ष्मी/अवदसा/अवदसाला पूजले जाते

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

19 − 2 =