संख्या सहा ६ sankhya saha six

संख्या
Pocket

संख्या ६

सहा राष्ट्रीय दुर्घटना – १ अतिवृष्टि , ३ अनावृष्टि , ३ टोळधाड ४ उंदीर फार होणें , ५ पोपट वगैरे प्राण्यांचा उपद्र्व व ६ परकीय सत्तेचे आक्रमण .

अतिवृष्टिः शलभाःमूषकाःशुकाः ।

प्रत्यासन्नाश्च राजानः षडेता ईतयःअ स्मृताः ॥ ( सु . )

सहा लाभ ( प्रवासापासूनच मिळणारे )- १ तीर्थावलोकन , २ सर्वत्र परिचय , ३ वित्तर्जन , ४ नानाश्रर्यनिरीक्षण , ५ चतुरता आणि ६ संभाषणकुशलता . ( सु . )

सहा विघ्नें विद्येला येणारीं – ( अ ) १ द्यूत , पुस्तकशुश्रूषा , ३ नाटकाची आसक्ति , ४ स्त्रीचा ध्यास , ५ सुस्ती आणि ६ झोपाळूपणा .

द्यूतं पुस्तकशुश्रूषा नाटकासक्तिरेव च ।

स्त्रियस्तन्द्री च निद्रा च विद्याविघ्नकराणि षट् ‌‍ ॥ ( सु . ) ( आ ) १ स्वच्छंदीपणा , २ द्र्व्य , मिळविण्याचा मोह , ३ प्रेमसंबंधांत पडणें , ४ चैन , ५ उद्धटपणा आणि ६ आळस .

स्वच्छंन्दत्वं धनार्थित्वं प्रेमभावोऽथ भोगिता ।

अविनीतत्वमालस्यं विद्याविघ्नकराणि षट् ‌‍ ॥ ( सु . )

सहा विघ्नें योगाभ्यासाच्या आड येणारीं – १ अति आहार , २ विशेषश्रम , ३ फार बोलणें , ४ उपोषन ( आवश्यक उपोषणाव्यतिरिक्त ), ५ योगाम्यासी नव्हेत अशांची संगत व ६ मनाची अस्थिरता .

अत्याहारः प्रयासश्च प्रजल्पो नियमग्रहः ।

जनसंगश्च लोल्यं च षड्‌‌भिर्योगो विनश्यति ॥ ( ह . प्र . )

सहा विकार देहाचे – १ शोक , २ मोह , ३ क्षुधा , ४ तृष्णा , ५ जरा व ६ मरण .

सहा विषय ( शिक्षेचे – उच्चार शास्त्र )- १ वर्ण , २ स्वर , ३ मात्रा , ४ बल . ५ साम व ६ संतान ( संहिता ) ( ऋग्वेददर्शन )

सहा वीरांचे सहा सर्वप्रसिद्ध शंख – १ श्रीकृष्ण – पांचजन्य , २ अर्जुन – देवदत्त , ३ भीमसेन – पौंड्र , ४ युधिष्ठर – अनंतविजय , ५ नकुल – सुघोष व ६ सहदेव – मणिपुष्पक , महाभारतकालीं अनेक प्रसिद्ध बीरांचे निरनिराळे शंख असत आणि सैन्याचे उत्साहवर्धनार्थ ते प्रस्फुरले जात . ( भ . गी . १ – १५ ) या व्यतिरिक्त परशुरामाचा ” अमित्रजित् ‌‍ ” नामक शंख होता असें वर्णन आढळतें . ( प्रा . च . को . )

सहा विकुंठ लोक – १ नित्यवैकुंठ , २ पादविभूतिवैकुंठ , ३ विश्वक्‌‍सेन वैकुंठ , ४ ब्रह्मविद्यावैकुंठ , ५ तुलसीवैकुंठ व ६ बोधानंदवैकुंठ , ( ईशादि विंशोत्तरशतोपनिषदः )

सहा विष्णव ( प्रातःस्मरणीय )- १ बलि , २ बिभीषण , ३ भीष्म , ४ प्रह्लाद , ५ नारद आणि ६ धरुव .

बलिर्बिभीषणो भीष्मः प्रह्लादो नारदो धरुवः

षडेते वैष्णवा ज्ञेयाः स्मरणं पापनाशनम् ‌‍ ॥ ( भा . रा . युद्धकांड )

सहा वाईट गोष्टी – १ चांगलें काम न करणारा – शहाणा मनुष्य , २ धर्म नसलेला – म्हातारा , ३ आज्ञाधारक नसलेला – तरुण , ४ दातृत्वहीन – श्रीमंत , ५ विनय नसलेली – स्त्री आणि ६ कोणताहि गुण नसलेला – धनी .

सहा शककर्ते – १ युधिष्ठिर , २ विक्रम , ३ शालिवाहन , ४ विजया – भिनन्दन ( वैतरणी – सिंधुसंगमीं ), ५ नागार्जुन व ६ कल्की ( करवीर ). हे सहा सककर्ते म्हणून पुराणांत वर्णिले आहेत . पांच यापूर्वी होऊन गेले व सहावा होणार आहे .

युधिष्ठिरो विक्रमशालिवाहनौ । ततो नृपस्थो विजयाभिनंदनः ॥

ततस्तु नागार्जुनकल्किभूपती । कलौ षडेते शककारका नृपाः ॥ ( दर्शनप्रकाश )

आधुनिक कालांत छत्रपति शिवाजीमहाराज हे एक शककर्ते होत .

सहा शत्रुरूपी रोग वृद्धापकालाची वाट पाहणारे ( मनुष्य शरिराच्या डाव्या बाजूला )- १ संभोगाचे रोग , २ चाळपुळी

( कॅन्सर ), ३ रक्ताशयाचे रोग , ( उजव्या बाजूला )- ४ वेडेपणाचे रोग , ५ नाडयांचा लवचिकपणा जाऊन जाड व बरड होणें व ६ मूत्रपिंडाचे रोग .

सहा शास्त्रें जगताचा चरितार्थ चालविणारीं – १ शिल्पशास्त्र , २ वैद्यशास्त्र , ३ सिद्धान्त ( गणित ) शास्त्र , ४ ज्योतिषशास्त्र , ५ कामशास्त्र आणि ६ ज्ञानशास्त्र . या सहा शास्त्रांच्या आधारानें लोक आपला निर्वाह करून घेतात .

सहा षाड्‌‍गुण्यसंपन्न सत्पुरुष – १ वसिष्ठ , २ वामदेव , ३ नारद , ४ व्यास , ५ वाल्मीकि आणि ६ प्रह्लाद . हे सहा षाड्‌‍गुण्यसंपन्न पुरुष म्हणून पुराणांतरी प्रसिद्ध आहेत .

सहा संन्यासधर्माला दूशणें – १ पलंग , २ शुभ्रवस्त्र , ३ स्त्रीकथा , ४ जिह्लालौल्य , ५ दिवसा निद्रा आणि ६ वाहनांत बसणें . या सहा गोष्टी यतिधर्माला बाधक आहेत . ( अ . स्मृ . )

सहा साधनांनीं कर्माला धर्मत्व प्राप्त होतें – १ सद‌‍गुरूपदेश , २ ईश्वरार्पित कर्म , ३ शुद्ध काल , ४ पवित्र स्थळ , ५ मंगलद्र्व्य आणि ६ वेदोक्त कर्म .

सहा सद्‌‍भ्रम – १ कुल , २ गोत्र , ३ जाति , ४ वर्ण , ५ आश्रम आणि ६ नाम . हे सहा सद‌‌भ्रम होत . ( मो . प्र . )

सहा स्वभावधर्म ( देहाचे )- १ आच्छादन , २ भोजन , ३ मैथुन , ४ भय , ५ निद्रा आणि ६ मोह . हे सहा देहाचे स्वभावधर्म मानले आहेत . ( तत्त्व – निजबोधक – विवेक )

सहा सर्व प्रसिद्ध अशा सार्थप्रतिज्ञा – १ भीष्मप्रतिज्ञा , २ भीमप्रतिज्ञा , ३ राणाप्रतापप्रतिज्ञा , ४ शिवरायप्रतिज्ञा , ५ लोकमान्य ’ स्वराज्यप्रतिज्ञा , आणि ६ महात्मा गांधी -’ चलेजाव ’ प्रतिज्ञा .

सहा सूत्र ग्रंथ व त्यांचे कर्ते – १ जैमिनीयसूत्र – जैमिनि , २ आश्रलायन सूत्र – अश्वलायन , ३ आपस्तम्ब सूत्र – आपस्तंब , ४ बौधायनसूत्र – बौधायनं . ५ कात्यायनसूत्र – कात्यायन आणि ६ वैखानसीयसूत्र – कणाद . ( तत्त्व – निज – विवेक )

सहा संस्कार गुण – १ वैराग्य , २ ज्ञान , ३ ब्रह्मचर्य , ४ तप , ५ करुणा व ६ सदाचार ( सूक्ष्मागम )

सहा सूत्र लक्षणें – १ अल्पाक्षरत्व , २ असंदि‌‌ग्धता , ३ सारग्रहण , ४ विश्वतोमुखम् ‌‍ म्हणजे सामान्य सिद्धान्त सांगणें , ५ अस्तोभम् ‌‍ म्हणजे निरर्थक शब्दांचा अभाव आणि ६ दोषराहित्य . हीं सहा म्हणजे त्या त्या शास्त्राच्या आचार्यांनीं लिहिलेले मूलग्रंथ – लक्षणें होत .

अल्पाक्षरमसंदिग्धं सारवद्विश्वतोमुखम् ‌‍ ।

अस्तोभमनवद्यं च सूत्रं सूत्रविदो विदुः ॥ ( वेदान्त )

सहा स्त्रीचे आदर्शगुण – १ कार्यप्रसंगीं मंत्री अथवा सल्लागार , २ गृहकृत्यांत दासी , ३ भोजनसमयीं माता , ४ रतिप्रसंगीं रंभा , ५ धर्माला अनुकूल आणि ६ धरित्रीप्रमाणें क्षमायुक्त , हे सहा स्त्रीचे आदर्श गुण होत .

कार्येषु मंत्री करणेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा ।

धर्मानुकूला क्षमया धरित्री , भार्या च षाड्‌‌गुण्यवतीह दुर्लभा ॥ ( सु . )

सहा स्थानीं क्षौर विहित आहे – १ गंगेच्या कांठीं , २ भास्कर – क्षेत्रांत , ३ माता – निधनप्रसंगीं , ४ पिता – निधनप्रसंगीं , ५ यज्ञ आणि ६ सोमपान . या सहा स्थलीं व काळी क्षौर विहित मानलें आहे .

गंगायां भास्करे क्षेत्रे मातृपित्रोर्मृतेऽहनि ।

आधाने सोमपाने च षट्‌‍सु क्षौरं विधीयते ॥ ( सु . )

सहाजण आततायी – १ घर जाळण्यास आलेला . २ विष घलणारा , ३ शस्त्र घेऊन वध करावयास आलेला , ४ धन लुटून नेणारा , ५ स्त्री अपहर्ता ६ शेत हरण करणारा .

अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणिर्धनापहः ।

क्षेत्रदारापहर्ता च षडेते ह्माततायिनः ॥ ( व . स्मृ . ३ – १६ )

सहाजण आत्मघातकी – १ आळशी , २ गर्विष्ठ , ३ झोपाळू , ४ दुसर्‍याकडून लिहून घेणारा , ५ अल्पविद्या असलेला आणि ६ वितंडवादी .

सालस्यो गर्वितो निद्रः परहस्तेन लेखकः ।

अल्पविद्यो विवादो च षडेते चात्मघातकाः ॥ ( भा . रा . युद्धकांड ५८ – ५ )

सहाजणांना कन्या देणें अनुचित – १ निकट असलेला , २ अति दूर असलेला , ज ३ अत्यंत धनवान् ‌‍ ४ अति दरिद्री , ५ उपजीविकेचें साधन नसलेला असा आणि ६ मूर्ख .

अत्यासन्ने चातिदूर अत्याढये धनवर्जिते ।

वृत्तिहीने च सूर्खे च कन्यादांन न शस्यते ॥ ( स्कंद माहेश्वर २३ – ८ )

सहाजण कार्य झाल्यानंतर अवमानित होतात – १ शिक्षण संपल्यानंतर आचार्य , २ बायको आल्यानंतर आई , ३ कार्य झाल्यानंतर नियोजक , ४ प्रौढा नारी , ५ नदीपार गेल्यावर नाव आणि ६ रोगपरि – हारानंतर वैद्य . सहाजण तें तें कार्य झाल्यानतंर अवमानित होतात . म्हणजे त्यांचा आदर राखला जात नाहीं . ( म . भा . उद्योग . ३३ – ८७ – ८८ )

सहा जण गुरुसमान – १ प्रेरणा करणार , २ सुचविणारा , ३ तोंडानें सांगणारा , ४ दाखवून देणारा , ५ शिकविणारा व ६ उपदेश करणारा . हे सहाजण गुरुसमान होत .

प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा ।

शिक्षको बोधकश्वैव षडेते गुरवः स्मृताःअ ॥ ( कुलागम )

सहाजण त्याज्य होत – ( अ ) १ मृदु अंतःकरणाचा शासनाधिकारी , २ खादाड ब्राह्मण , ३ दुष्ट मनाचा सोवती , ४ आज्ञा मोडणारा नोकर , ५ कामांत गाफिल राहणारा अधिकार व ६ केलेलें न स्मरणारा ( पंचतंत्र ); ( आ ) १ विवरण न करणारा आचार्य , २ अध्ययनहीन ऋत्विज , ३ रक्षण न करणारा राजा अथवा शासनाधिकारी , ४ अप्रियभाषिणी भार्या , ५ गांवांत राहूं इच्छिणारा गोपाळ ( गुराखी ) व ६ वनांतच राहूं इच्छिणारा नापित . हे सहा त्यागार्ह होत . ( म . भा . उद्योग ३३ – ८० )

सहाजण दुसर्‍यादर उपजीविका करणारे – १ चोर – बेसावध मनुष्यावर , २ चिकित्सक – व्याधिग्रस्तावर , ३ कुमार्गी

स्त्रिया – विषयलंपटावर , ४ याजक – यज्ञ अथवा हव्यकव्य करणारांवर , ५ शासनसंस्था – परस्पर कलह करणारावर आणि ६ पंडित ( विद्वान ‌‍ )- मुर्खावर . ( म . भा . उद्योग . ३३ – ८५ )

सहाजण धर्मभिक्षुक होत – १ पांथस्थ ( प्रवासी ), २ उपजीविकेचें साधन नष्ट झालेला , ३ विद्यार्थी , ४ गुरूचें पालनपोषण करणारा , ५ संन्यासी आणि ६ ब्रह्मचारी .

अध्वगः क्षीणवृत्तिश्च विद्याथीं गुरुपोषकः ।

यतिश्च ब्रह्मचारी च षडेते धर्मभिक्षुकाः ॥ ( स्कंद ब्राह्मखंड )

सहाजण महान ‌‍ परोपकारी – १ सूर्य , २ चंद्र , ३ घनदाट वृक्ष , ४ नदी , ५ गाय आणि ६ सज्जन .

रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जनाःअ ।

एते परोपकाराय युगे देवेन निर्मिताः ॥ ( सु . )

सहाजण मदनाचे अवतार – १ सुदर्शन , २ भरत , ३ प्रद्युम्न , ४ सांब , ५ सनत्कुमार व ६ स्कंद .

सुदर्शनश्च भरतः प्रद्युम्नः सांब एव च ।

सनत्कुमारः स्कंदश्च षडेते काम एव च ॥ ( गुरुड ब्रह्म . २९ – ३६ )

सहाजणांकडे रिकाम्या हातानें जाऊं नये – १ राजा ( अधिकारी ), देवता , ३ गुरु , ४ ज्योतिषी , ५ लहान मूल आणि ६ मित्र . ( सु . )

सहाजण श्राद्धास वर्ज्य – ( अ ) १ फलज्योतिषी , २ वैद्य , ३ पुराणिक , ४ कृषीवल , ५ गायक आणि ६ राजसेवक .

ज्योतिर्गण्यं तथा वैद्यं पुराणं कृषिकारिकाःअ ।

गायको राज्यसेवाश्च षडेते श्राद्धघातकाः ॥ ( सु . ) ( आ ) १ मेहुणा , २ गोत्रज , ३ अतिवृद्ध , ४ व्यभिचारी व व्यभिचारी स्त्रीचा पति , ५ ज्ञानहीन आणि ६ मूर्ख .

शालाकश्च स्वगोत्रश्च अतिवृद्धश्च वृषलीपतिः ।

ज्ञानहीनश्च मूर्खश्च षडेते श्राद्धघातकाः ॥ ( सु . )

सहाजण सर्वत्र ( संगतीला ) वर्ज्य – १ निंदक , २ लबाड , ३ धूर्त , ४ दुष्ट , ५ दुष्कर्में करणारा व ६ तामसी .

निंदको वंदको धूर्गः खलो दुष्कृतितामसौ ।

एते नाटकिनः प्रोक्ताःअ सर्वतः परिवर्जयेत् ‌‍ ॥ ( सु . )

सहाजणांच्या सहा सर्वप्रसिद्ध वीणा – १ श्रीशिव – नालंबी , २ सरस्वती – कच्छपी , ३ नारद – महती , ४ गणपति – प्रभावती ( गणानां तु प्रभावती ) ५ विश्वावसु – बृहती आणि तुम्बर – कलावती . ( अमिधान चिंतामणि )

सहाजणांच्या स्मरणानें प्रवास सुखकर होतो – १ वैन्य , २ पृथु , ३ हैहय , ४ अर्जुन , ५ भरत आणि ६ नल .

एतान् ‌‍ नृपान् ‌‍ यः पठति प्रयाणे ।

तस्यार्थसिद्धिः फलदागमश्च ( सु . )

सहाजणी मातेसमान – १ राजपत्नी , २ गुरुपत्नी , ३ मित्रपत्नी , ४ सती स्त्री , ५ सासू आणि ६ स्वमाता .

राजपत्नी गुरोः पत्नी मित्रपत्नी सती तथा ।

पत्नीमाता स्वमाता च सर्वास्ताः मातरः स्मृताः ( सु . )

T
कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

3 + 7 =