योग वयात लग्न का करावे.

मुला मुलींचे योग्य वयातच लग्न करा

96 कुळी मराठा आरोग्य ईतर लेख परिचय पौराणिक

*मुलामुलींचे योग्य वयातच लग्न करा*

             एका २२  वर्षीय उपवर मुलीच्या बापाला मध्यस्थाने एक स्थळ सुचविले .
मुलगा मोठ्या सिटीमधे नोकरीला आहे . सुस्वरुप आहे . चांगल्या संस्कारातला आहे . आई बाप पण सुस्थितीत आहेत . मुलाचे वय २४ वर्षे  आहे . सगळे अनुरुप आहे .
मुलीचा बाप : ते सगळे ठिक आहे . पण मुलाला पगार किती ?
मध्यस्थ : आहे की चांगला ३० हज्जार रुपये .
मुलीचा बाप : ह्या !! शहरामधे ३० हजारने काय होते .
मध्यस्थ : दुसरा एक मुलगा आहे .दिसायला ठिक आहे , पण पगार चांगला ५० हज्जार आहे . फक्त त्याचे वय थोडे जास्त आहे ३१ वर्षाचा आहे .
मुलीचा बाप : ५० हजार ? शहरात 1BHK तरी परवडेल कां त्याला ? कसा माझ्या पोरीला सुखात ठेवेल तो .
मध्यस्थ : अजुन एक स्थळ आहे . मुलगा दिसायला ठिकठाक आहे . अंगाने थोडा सुटलाय आता . थोडेसे टक्कलपण पडलेय ( बुद्धीचे काम करुन करुन ) ,पगारही चांगला १ लाख आहे ,  पण वय मात्र ३५ आहे हों !!
बघा तुम्हाला चालत असेल तर .
*मुलीचा बाप : काय चाटायचाय एक लाख पगार . मुलगा माझ्या सुंदर मुलीला अनुरुप नको ??*
*एखादे चांगले स्थळ सुचवा बुवा . मुलगा वयातही बसायला हवा , चांगला पगारही हवा ,घरची परिस्थिती पण चांगली हवी ,दिसायला स्मार्ट हवा.*
*याच्यापुढे याल तेव्हा अगदी अनुरुप स्थळ घेवुन या.*
     असेच वात्रट पणा करत ७/ ८ वर्ष निघून गेल्यावर  मध्यस्थाला बोलावणे पाठविले……
*मध्यस्थ : आता आपल्या मुलीला अनुरुप वर शोधणे माझ्या आवाक्या बाहेरचे आहे.*
*आता माझ्याकडे तुमच्या मुलीला अनुरुप असे पस्तिशीचीच स्थळे शिल्लक आहेत, सुचवू ते सांगा.*
मुलीचा बाप : कोणतेही सुचवा. स्थळं आहेत हे काय कमी आहे !! आता माझी मुलगीच अनुरुप राहीली नाही तिथे मी काय अपेक्षा करणार !!
# टिप : अतिचावटपणा करुन मुला मुलींच्या आयुष्याचे वाटोळे करु नका .
सुरवातीला जरी कमी पगार वाटत असला तरी लग्न झाल्यावर मुलामुलींना नवीन उमेद येते . परिस्थिती सुधारण्यासाठी दोघे मिळुन जीवतोड मेहनत करतात . एकमेकांच्या साथीने आर्थिक अडचणींवर मात करतात . मुलांचे आई बापही त्यांच्या पाठीशी असतातच . मुलामुलींना कुणी त्रास सहन करण्यासाठी वाऱ्यावर सोडलेले नसते याची जाणीव मुलींच्या आई बापांनीही ठेवणे आवश्यक आहे . मुलगा मुलगी समानतेच्या युगात तुम्हीही थोडे जावई मुलीच्या पाठीशी रहा .
कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

eleven + seventeen =