उपदेश पर अभंग वारकरी किर्तन साठी धनंजय महाराज मोरे

Uncategorized

उपदेश पर अभंग

1533

ऐसी जोडी करा राम कंठीं धरा

ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥1॥
नासिवंत आटी प्रियापुत्रधन । बीज ज्याचा सीण तें चि फळ ॥ध्रु.॥
नाव धड करा सहजरा नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥2॥
तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरि रामबाणीं ॥3॥

अनुक्रमणिके वर परत जा

२३६०

कळे ना कळे ज्या धर्म

कळे ना कळे ज्या धर्म । ऎका सांगतों रे वर्म ।

माझ्या विठोबाचें नाम । अट्टाहासें उच्चारा ॥१॥

तो या दाखवील वाटा । जया पाहिजे त्या निटा ।

कृपावंत मोठा । पाहिजे तो कळवळा ॥२॥

पुसतां चुका होतो वाटा । सवें बोळावा गोमटा ।

मोडों नेदी कांटा । घेऊं सांटा चोरासी ॥३॥

तुका म्हणे मोल । नलगे द्यावे वेचा बोल ।

विठ्ठल विठ्ठल । ऎसा छंद मनासी ॥४॥

सार्थ गाथा अ. २३६० पान. ५०६

 

अर्थ:  ज्यांना धर्म कळत असेल किंवा ज्यांना कळत नसेल त्यांना एक गुपित सांगतो,विठोबाच्या नामाचा उच्चार स्वरात करा ॥१॥ आपल्या अंत करनाता तयाच्याविषयी जिव्हाळा पाहिजे म्हणजे तो साधकाला पाहिजे तो भक्तीचा मार्ग सरळपने दाखवितो कारण तो फार कृपाळू ॥२॥ वाटेत इतर कोणाला वाट विचारली तर ती चुकण्याची शक्यता असते. परंतु परमार्थाच्या मार्गावरील विठ्ठल वाटाड्या मुक्कामापर्यंत सरळ मार्गाने नेतो वाटेत भक्ताला नरकाचा काटादेखील मोडू देत नाही. आणि कामक्रोधादी चोरापासून संरक्षण करतो ।।3।। तुकाराम महाराज म्हणतात परंतु त्याचे काही सुद्धा मोल द्यावे लागत नाही मुखाने विठ्ठल नामाचे भजन करून मनासही त्याचा छंद लागावा. ।।४।।

अनुक्रमणिके वर परत जा

2064

ब्रम्ह रस घेई काढा

ब्रम्ह रस  घेई काढा । जेणें पीडा वारेल ॥1॥

पथ्य नाम विठोबाचें । अणीक वाचे न सेवीं ॥ध्रु.॥

भवरोगा ऐसें जाय । आणीक काय क्षुल्लकें ॥2॥

तुका म्हणे नव्हे बाधा । अणीक कदा भूतांची ॥3॥

अर्थ :

आतां तरी पुढे हाचि उपदेश

आतां तरी पुढे हाचि उपदेश । नका करुं नाश आयुष्याचा ॥१॥

सकळांच्या पाया माझे दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥२॥

हित तें करावें देवाचे चिंत्तन । करुनियां मन शुद्ध भावें ॥३॥

तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फ़ार शिकवावें ॥४॥

अर्थ :

अनुक्रमणिके वर परत जा

आतां उघडी डोळे

आतां उघडी डोळे । जरि अद्यापि न कळे ।

तरी मातेचिया खोळे । दगड आला पोटासी ॥१॥

मनुष्य देहा ऎसा निध । साधील ते साधा सिद्ध ।

करुनि प्रबोध । संत पार उतरले ॥२॥

नाव चंद्रभागेतीरीं । उभी पुंडलीकाचें द्वारीं ।

कट धरुनियां करीं । उभाउभी पालवी ॥३॥

तुका म्हणे फ़ुकासाठी । पायीं घातलीया मिठी ।

होतो उठाउठी । लवकरीच उतार ॥४॥

अनुक्रमणिके वर परत जा

अ. नं. ३०५८  पान.नं. ६४५

आलिया संसारा उठा वेग करा

आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडूरंगा ॥१॥

देह हे काळाचे धन कुबेराचे । येथें मनुष्याचे काय आहे ॥२॥

देता देवविता नेता नेवविता । तेथे याची सत्ता काय आहे ॥३॥

निमित्ताचा धणी केला असे प्राणा । माझे माझें म्हणॊनि व्यर्थ गेला ॥४॥

तुका म्हणे कां रे नाशिवंतासाठीं । देवासवें आटी पाडितोसी ॥५॥

अर्थ :

अनुक्रमणिके वर परत जा

पुण्य पर‍उपकार पाप ते परपीडा

पुण्य पर‍उपकार पाप ते परपीडा । आणिक नाहीं जोडा दुजा यासी ॥१॥

सत्य तोचि धर्म असत्य तें कर्म । आणिक हें वर्म नाहीं दुजें ॥२॥

गति तेचि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखता ॥३॥

संतांचा संग तोचि स्वर्गवास । नरक तो उदास अनर्गळ ॥४॥

तुका म्हणे उघडे आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥५॥

1688

हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा
हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥1॥
आवडी विठ्ठल गाईजे जे एकांतीं । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥
आणीकां अंतरीं न द्दयावी वसति । करावी हे शांती वासनेची ॥2॥
तुका म्हणे बाण हा चि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचूं नये ॥3॥

अनुक्रमणिके वर परत जा

४६

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥१॥

आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥

कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचें ॥२॥

तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥

अनुक्रमणिके वर परत जा

५०९

ये सातें आलिया वोळंगा सारंगधरु ।

ये सातें आलिया वोळंगा सारंगधरु ।

नाहीं तरि संसारु वायां जाईल रया ॥१॥

कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत ।

मृगजळवत जाईल रया ॥२॥

विषयाचें सम सुख बेगडाची बाहुली ।

अभ्राची सावुली वायां जाईल रया ॥३॥

ज्ञानदेव म्हणे पाहातां पाहलें ।

स्वप्नींचे चेईलें तैसें होईल रया ॥४॥

 

सेवितों हा रस वाटितों आणिकां

सेवितों हा रस वाटितों आणिकां । घ्यारे होऊं नका रानभरी ॥१॥

विटेवरी ज्याची पाऊलें समान । तोचि एक दानशुर दाता ॥२॥

मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥३॥

तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरुप ॥४॥

अनुक्रमणिके वर परत जा

3139

आपुला तो एक देव करुनि घ्यावा

आपुला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥1॥

तें तीं माइकें दुःखाचीं जनितीं । नाहीं आदि अंतीं अवसान ॥ध्रु.॥

अविनाश करी आपुलिया ऐसें । लावीं मना पिसें गोविंदाच्या ॥2॥

तुका म्हणे एका मरणें चि सरें । उत्तम चि उरे किर्ती मागें ॥3॥

1021

पुण्य परउपकार पाप ते परपीडा

पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥1॥

सत्य तो चि धर्म असत्य तें कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥ध्रु.॥

गति ते चि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखते ॥2॥

संतांचा संग तो चि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥3॥

तुका ह्मणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥4॥

४८३

चोराचियासंगे क्रमितां पैं पंथ

चोराचियासंगे क्रमितां पैं पंथ । ठकूनियां घात करितील ॥१॥

काम क्रोध लोभ घेऊनियां संगें । परमार्थासि रिघे तोची मूर्ख ॥२॥

बांधोनियां शिळा पोहूं जातां सिंधू । पावें मतिमंदु मृत्यु शीघ्र ॥३॥

देहगेहभ्रांती सोडुनीया द्यावें । साधन करावें शुध्द मार्गे ॥४॥

ज्ञानदेव ह्मणे तरीच साधेल । नाहीं तरी चळेल मध्यभागीं ॥५॥

अनुक्रमणिके वर परत जा

2475

सुख नाहीं कोठें आलिया संसारीं

सुख नाहीं कोठें आलिया संसारीं । वांया हांवभरी होऊं नका ॥1॥

दुःखबांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥ध्रु.॥

चवदा कल्पेंवरी आयुष्य जयाला । परी तो राहिला ताटीखालीं ॥2॥

तुका ह्मणे वेगीं जाय सुटोनियां । धरूनि हृदयामाजी हरि ॥3॥

2798

नको नको मना गुंतूं मायाजाळीं

नको नको मना गुंतूं मायाजाळीं । काळ आला जवळी ग्रासावया ॥1॥

काळाची हे उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ॥ध्रु.॥

सोडवीना राजा देशींचा चौधरी । आणीक सोइरीं भलीं भलीं ॥2॥

तुका ह्मणे तुला सोडवीना कोणी । एका चक्रपाणी वांचूनियां ॥3॥


परदारा परधन परनिंदा परपीडण  १९१८

परदारा परधन परनिंदा परपीडण । सांडोनिया भजन हरीचे करा ।।१।।

सर्वांभूती कृपा संताची संगती । मग नाही पुनरावृत्ती जन्म मरण ।।२।।

शास्त्रांचे हे सार वेदांचे गव्हार । ते नाम परिकर विठोबाचे ।।४।।

नामा म्हणे न लगे साधन आणिक । दिधली मज भाक पांडुरंगे ।।५।।

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

13 − twelve =