विठ्ठलाची आरती

Uncategorized

श्री विठ्ठलाची आरती

श्री विठ्ठलाची आरती
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥

जयदेव जयदेव हरी पांडुरंगा रखुमाई वल्लभा
राही च्या वल्लभा पावे जिवलगा जयदेव जयदेव ॥धृ.॥
तुलसीमाळा गळा कर ठेवुनी कटी कांसे पितांबर कस्तुरी लल्लाटी
देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥२॥
जयदेव जयदेव….
आषाढी कार्तिकी भक्त जन येती चंद्रभागे मधे स्नान जे करिती
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥  जयदेव जयदेव….

Leave a Reply

*

2 + 11 =

%d bloggers like this: