श्री_नवनाथ ग्रंथ पारायण_पुजा_विधी navnath granth parayan dhananjay maharaj more

Uncategorized धार्मिक वारकरी ग्रंथ
Pocket

💐 #श्री_नवनाथ ग्रंथ पारायण_पुजा_विधी💐

#तयारी:-
श्री फल,सपारी12नग,नागिली पाने७नग,हलद,कुंकुं,अक्षदा, अष्टगंध, भस्म,अत्तर, गुलाब पाणी, गोमूत्र,दुध,दही,मध,तुप गावरान, तैल,कापुसवात,फुलवात, कापुर, खडिसाखर,समई,सुट्टेपैसे,लाल कपडा२.५मिटर ,चौरंग, आसन,श्री नवनाथ फोटो,ताब्या१नग,माचिस,फुले हार,फले,रुमाल,निरंजन, अगरबत्ती,धुप,ऊद,श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ ,सोहले किंवा भगवी लुंगी .

सकाली लवकर उठावे गोमुत्र टाकुन स्नान करावे . सुर्यांस अर्ध द्यावे तुलशीस पाणी टाकावे देवपुजा करावी मोठ्या मंडलीनां नमस्कार करावा.नियोजीत जागेवर चौरंग ठेवावा त्यावर लालकपडा टाकावा फोटो ठेवावा समोर तांदलाची रास माडावी राशि त एक नाने ठेवावे त्यावर रिकामा ताब्या ठेवावा ताब्यात पाणी टाकावे पाण्यात हलद ,कुंकुं, अक्षदा, एक नाने,एक सुपारी टाकावी ५ नागिली ची पाने लावावी श्री फल ठेवावा ताब्यास अष्टगंधाची ५ बोटे ओढावी स्वात्तिक , त्रिसुल काढावे श्री फलावर ओम काढावा .कलशाच्या उजव्या बाजुस नागिलीची २पाने एक मेकावर ठेवावी त्यावर तांदलाची रास माडावी रासीत एक नाने ठेवावे एक सुपारी पंच अमृत,गुलाब पाणी शुध्दपाण्याने धुऊन पुसुन त्यावर ठेवावी (गनपतीचे नामस्मरन ११वेला करुन )हलद कुंकुं अक्षदा अत्तर गंध फुले वाहावी .

मागे एका सरल रेशेत तादलाच्या ३ राशी माडाव्या अशा ३ लाईन माडाव्या समोर एक राश माडावी प्रत्येक राशीत एक एक नाने ठेवावे . एक एक सुपारी घेऊन पंचअमृत गुलाब पाणीवशुध्द पाण्याने स्वछं धुऊन पुसुन घ्यावे प्रत्येक राशीवर थोडा भस्म टाकावा व एक एक सुपारी राशीवर ठेवत जावी सर्व सुपारी ठेऊन झाल्यावर अत्तर लावावे .प्रत्येक सुपारीस गंधफुल वाहावे एक एक सुपारीस स्पर्श करुन गायत्री मंत्राचा ११ वेला जप करावा फुले वाहावी व परत समोरिल सुपारीस फुले तुलशपाने किंवा बेलपाने वाहत ११ वेला
ओम चैतन्य दत्तात्रयाय नम: जप करावा व प्रत्येक सुपारीस अशीच पुजा करावी नउनाथाच्या नावाचा जप करा फुले तुलश,बेलपाने वाहावी.

ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम:
ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम:
ओम चैतन्य गहिनीनाथाय नम:
ओम चैतन्य जालिंदरनाथाय नम:
ओम चैतन्य कानिफनाथाय नमः
ओम चैतन्य भर्तरीनाथाय नम:
ओम चैतन्य रेवननाथाय नम:
ओम चैतन्य वटसिध्द नागनाथाय नम:
ओम चैतन्य चर्पटीनाथाय नम:

अशा प्रकारे मंत्र म्हनत फुले अक्षदा तुलश ,बेलपाने वाहावी .अशी २१ अर्वतने करावी , गुरुनीं दिलेल्या मंत्राचा एक माल जप करावा . या चौरंगा समोर दुसरा चौरंग माडावा त्यावर लाल वस्त्र टाकावे श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ ठेवावा ग्रंथाचे पुजन करावे फुले वाहावी चौरंगा भोवती रागोली काढावी. उजव्या बाजुस समई ठेउन पेटवावी समई कायम तेवत ठेवावी ऊद जालावा अगरबत्ती धुप पेटवावा नमस्कार करावा.
महाराजांच्या फोटोला हार घालावा .
हातात पाणी घेऊन ३ , ५ , ७ , ९ , ४१ दिवसांचा संकल्प करावा हातातील पाणी जमीनीवर सोडावे. कापुर पेटउन
श्री दत्त महाराजांची आरती करावी .
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा……हा जप करावा हलूवार पने व ग्रंथवाचण्यास सुरवात करावी.
अगदी शांतिपूर्वक वाचन करावे वाचन झाल्यावर निरंजन पेटउन श्री नवनाथ महाराजांची आरती करावी . सर्वांना प्रसाद द्यावा .

#प्रसाद:-
खोबर्याचा किस अन्यथा सुंठ , खसखस , पिठी साखर ऐकत्र करुन दररोज वाटत जावा.
दररोज घरातील स्वयंपाकाचे एक पात्र भरुन सकाल सद्याकाल नैवद्य दाखवावा. घरात शांतता राखावी अथिथींचा आदर करावा .कुत्रास, गोमातेस नैवद्य द्यावा. भिक्षा मागण्यास कुनि आल्यास यथाशक्ती भिक्षा द्यावी .
श्री नवनाथ महाराज घरात असल्यामुले घराला मंगल दिवस येतिल अशा भावपूर्ण श्र्रध्देने राहिल्यास पुजकास व ऐकणार्यास फारच अलौकिक अनुभव येतिल त्यांच्या मनो कामना पुर्ण होउन संसार सुखाचा होईल .आपल्या कामना अकल्पित रीतीने पुर्ण होतील. साधकाने व सर्व परिवाराने पुर्ण शाकाहारी व निरव्यसनी असने आवश्यक आहे .
ईतर ठिकानी किंवा परअंन्न ग्रहण करु नये शक्य असल्यास उपवास करावा फलहारी असावे ..
सांगतेच्या दिवशी ९ + ३ लहान मुले व एक जोडीस भोजन द्यावे . शक्य असल्यास सर्वांना भगवी वस्त्र अर्णन करावी . सर्वांचे पाद्य पुजन करावे भस्म गंध फुले हार घालावे नमस्कार करावा आरती करावी .पात्र वाढुन दक्षना ठेवावी .

#भोजनास_नैवद्य :-
मुगाची खिचड़ी , घेवड्याची भाजी, उडदाचे वडे , कडी, पातोड्या, आलुपान वडी, जोधल्याची खिर, पुरी, मेथी भाजी, डांगर,चक्की,गवार,भेडी,वाल,कारले,काकडी,बटाटे, टमाटर ईतर यांची मिक्स भाजी करने सार ( आमटी ) भजे पापड ताक ईत्यादीचा नैवद्य असावा. सर्वांना पोटभर भोजन द्यावे व आपन हि करावे …
दुसर्या दिवशी सकाली सर्व पुजा उचलुन घ्यावी ग्रंथ पुजेच्या जागेवर ठेवावा फोटो देवघरात ठेवावा बाकी सर्व साहित्य पाण्यात विसरजीत करावे .
दर गुरुवारी शक्य असल्यास उपवास करावा .
पुरुष व महिला कुनीही श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ पारायन ( वाचन मनन ) करु शकतात.
नाथांची सेवा कुनीही करण्यास हरकत नाही .
नाथ जात पात धर्म पंथ या लिंग भेद मानत नाहीं .
सर्वांनी आनंदाने नाथांची सेवा करावी व अल्लंख निरंजन पदाची प्राप्ति करावी……

ओम नमो आदेश….आदेश…..आदेश……

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

15 − 11 =