संख्या ० शून्य sankhya शून्य ZERO

Uncategorized
1 Comment
Pocket

संख्या ०

शून्य-आकाशवाचक शब्द, पूर्ण. हें जगत् ‌‍ असत् ‌‍ आहे म्हणून तें शून्य आहे. या असत् ‌‍ जगाच्या बुडाशीं कूटस्थ अधिकारी असें जें एक सत्तत्त्व वा परमात्मतत्त्व आहे त्यास शून्य, शून्याचा निष्कर्ष व शून्य विशेष अशा संज्ञा आहेत. सर्व संसाराची उत्पत्ति शून्यापासूनच झाली आहे. हें सर्व चराचर विश्व शून्यांतून निघालें आहे. ” शून्यांतील सारें चराचर ” हें शून्य़ ” अ-गणित ” ब ” अ-क्षय्य ” आहे. (ज्ञा. अभंग) शून्याला वृद्धि क्षय होतच नाहींत म्हणून अक्षय्य.

शून्यकान-कान नाहीं असा प्राणी– सर्व (प्राकृत ग्रंथांत त्यास चक्षु :-श्रवा म्हणतात.)

शून्यचरण-चरण नाहीं असा प्राणी-सर्प (प्राकृत ग्रंथांत त्यास पादोदर किंवा उरग म्हणतात.

शून्य जिव्हा-जिव्हा नाहीं असा प्राणी-बेडूक (दु. श. कोश)

शून्यवाद-जग हें केवळ शून्यापासून-अभावापासून उत्पन्न झालें. त्यास बौद्धांचा शून्यवाद म्हणतात. (बौद्धदर्शन)

शून्यशिर-शिर नाहीं असा प्राणी-खेंकडा.

मागील संख्या पहा                                     मुख्य अनुक्रमणिका पहा                           पुढील संख्या पहा

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

1 comment

Leave a Reply

*

1 × two =