मांगवाडी गावांत मातंग समाजाला 2018 सालातही मंदिर प्रवेश नाही.

Uncategorized

मांगवाडी गावांत मातंग समाजाला 2018 सालातही मंदिर प्रवेश नाही.

मांगवाडी हे गांव ता. रिसोड जिल्हा वाशिम विदर्भात असून गावात प्रमुख मंदिर म्हणून ग्रामदैवत हनुमंताचे मंदिर आहे, त्या मंदिरात हिंदू धर्मानुसार हिंदूंच्या सर्व जातीच्या लोकांना दर्शन, पूजा, आणि संबंधित धार्मिकविधी शास्त्रोक्त पद्धतीने किंवा भक्तिभावाने  करण्याचा त्या मातंग समाजाच्या लोकांना धार्मिक अधिकार पूर्णपणे आहे.

करण्याचा अधिकार असून सुद्धा त्यांना मंदीर प्रवेश दिला जात नाही हा एवढा मोठा अन्याय राऊत हा समाज अनेक पिढ्यांपासून सहन करत आहे परंतु आजपर्यंत याला कोणीही वाचा फोडली नाही म्हणून भारतीय संविधानाने दिलेला हक्क आणि शास्त्राने दिलेला अधिकार एवढा असून सुद्धा केवळ अज्ञानापोटी शंकराच्या जोरावर दलित समाजाला मंदिराच्या प्रवेश दिला जात नाही

 

वारकरी संप्रदायातील परंपरागत अखंड हरीनाम सप्ताह मांगवाडी गावांत  होत असतो या वारकरी संप्रदायामध्ये अनेक जातीतील संत झालेले आहेत त्यामध्ये

संत तुकाराम ९६ कुळी मराठा/कुणबी.

संत चोखोबा, संतचोखोबा   सोयराबाई, सोयराबाईंनी ९२ अभंग लिहिले . संत बंका महाराज. संत चोखोबांचा मुलगा कर्ममेळा. हे महार

एकनाथ, निळोबाराय, रामदासस्वामी, ज्ञानेश्वरादि भावंडे,  हे ब्राम्हण

संत भगवानबाबा , संत वामनभाऊ, संत भीमसिंग महाराज, हे संत वंजारी 

संत  संताजी महाराज जगनाडे  हे तेली

संत गोरोबाकाका हे कुंभार

संत सेना महाराज हे न्हावी (वारीक)

कान्होपात्रा ही तर वेश्येची मुलगी.

असे असूनही आजही मांगवाडी येथील मातंग समाजाला मंदिरात प्रवेश नाही.

मांगवाडी मध्ये दरवर्षी वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ आणि हनुमान संस्थान आणि गांवकरी मंडळी यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह होत असतो.

तसेच दर पंधरा दिवसाला एकादशी चे भजन सकाळी द्वादशी पारणे म्हणजे पंगत आणि वार्षिक कार्यक्रम सुरू आहेत तरी हनुमान मंदिरात दलितांना मंदिर प्रवेश नाही.

बरं मुसलमान चालतो

पण हिंदू धर्मातील एक असलेले मांग मात्र चालत नाही ही माझ्या गावातील शोकांतिका आहे.

वारकरी संप्रदायातील संत मात्र वेगळे सांगतात,

याता याती धर्म नाही विष्णुदासा| निर्णय हा ऐसा वेदशास्त्री

४२५ वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी म्हटले होते "याता याती धर्म नाही विष्णुदासा .निर्णय हा ऐसा वेदशात्री "तुकाराम महाराज म्हणतात कोणत्याही माणसाला जात, धर्म, नसते.हे एक वेधशात्राचा निर्णय आहे ४०० वर्षांपूर्वी तुकाराम महाराजाला ते समजले होते परंतु या आधुनिक युगात सुशिक्षित तरुणानं देखील समजले नाही कारण येथील तरुणानं जातीमध्ये गुंतीले आहे एखाद्या महापुरुषांचा इतिहास चुकीचा सांगून त्या तरुणाला भडकवले जाते .

संत तुकाराम

यारे यारे लहान थोर

याती भलते नारी नर

 

संतांच्या मध्ये जवळ सर्वच जातीमध्ये समावेश आहे

खरे तर जातीबदल दहाव्या शतकापर्यंत मुक्त तर नंतरही, अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत तरी, तुरळक प्रमाणात का होईना होत होता याचीही प्रमाणे आहेत. मग जातीव्यवस्था बंदिस्त होती हे मिथक कोठून आले?

अस्पृश्यतेबाबतही असेच आहे.

अस्पृश्यता वैदिक साहित्यात दिसते ती फक्त दोन जातींबद्दल (श्वपच व चांडाळ) व त्या जातीही नष्ट होऊन किमान दोनेक हजार वर्ष झालीत. मध्ययुगात ज्या जाती अस्पृष्य मानल्या जात होत्या त्यांची नांवे कोठेही आणि कोणत्याही , अगदी मध्ययुगीन वैदिक स्मृतींतही येत नाही.  शिवाय इतिहास पहावा तर त्या अस्पृश्यतेचे मानदंडही गोंधळात टाकनारे आहेत. उदा. महार हे किल्लेदार, पाटील व वतनदारही होते. मातंग, महार, बेरड या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींची छोटी का होईना राज्येही होती याचेही पुरावे आहेत. महर्षि वि. रा. शिंदेंनीही यावर प्रकाश टाकला होता. एका प्रांतात जी जात अस्पृश्य आहे तीच जात दुस-या प्रांतात स्पृश्य आहे हाही विचित्र प्रकार दिसतो. धोबी जात हे याचे एक उदाहरण आहे. असे का याचे समाधानकारक उत्तर नाही. ही सारी प्रत्यक्ष उदाहरणे घेतली तर एक ग्रंथ होईल. ही उदाहरणे इतिहासकारांना माहित नाहीत असेही नाही. पण असे असुनही जातीसंस्थेची निर्मिती व वर्तमानातील जातीव्यवस्था, अस्पृश्यता यांच्य मुळांबाबत प्रचंड संभ्रम आहे. हा संभ्रम निर्माण केला गेलेला आहे. म्हणजे ती सामाजिक वास्तवे असुनही त्याची मुळे नेमके काय आहेत याचे वास्तवदर्शी आकलन अस्तित्वात नसणे ही मोठी समस्या आहे. आणि गंमत म्हणजे हा संभ्रम सर्वांना हवाच आहे. नवीन प्रकाश कोणत्याही गटाला सहन होत नाही हे माझे व्यक्तीगत निरिक्षण आहे. कारण या भ्रमांत अनेकांचे स्वार्थ लपलेले आहेत.

मांग

 मातंग किंवा मांग ही महाराष्ट्रातील जात आहे. केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मांगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज झाडू बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे हे देखील त्यांचे पारंपरिक व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात पारंपरिक व्यवसाय बंद पडून मांगांचे रोजगार बंद झाले. मातंग भारतीय संविधानाच्या कायद्याप्रमाणे अनुसूचित जाती मध्ये मोडले जातात.

गुन्हेगाराला फाशी देण्याचे काम मांगाचे असे.संदर्भ हवा ]

अनुक्रमणिका

 [लपवा

 • स्थिती
 • इतिहास
  • २.१भूतकाळातील प्रथा
  • २.२छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ ते स्वातंत्र्यपूर्व काळ
  • २.३मातंगांची हलगीवादनाची कला
 • सद्यस्थिती
 • पोटजाती
 • मांग जातीतील उल्लेखनीय व्यक्ती
 • मांग जातीची माहिती देणारी पुस्तके

स्थिती

मांग जातीत किमान १२ पोटजाती असून हा समाज बारा बलुतेदारांपैकी एक समजला जातो. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार २० लाख लोकसंख्या मातंगांची होती. मातंग समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळते. मातंग समाज हा हिंदुत्ववादी असून तो आपली कुलदैवत असलेल्या खंडोबाची आराधना करतो.

इतिहास

भूतकाळातील प्रथा

ग्रहणाच्या वेळी मांग लोक ‘दे दान सुटे गिराण’ अशी साद घालत गावातून दान मागायचे. सूर्य-चंद्रांना गिळणारे राहू-केतू मांगांचे पूर्वज आहेत अशी यामागची लोककथा आहे. राहू-केतू यांच्यापासून सूर्य-चंद्रांचे ग्रहण सुटावे म्हणून मांगांना ग्रहणकाळात ग्रामस्थांकडून दान दिले जात असे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ ते स्वातंत्र्यपूर्व काळ

मातंग समाज हा मुळचा रांगडा, आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षणकर्ता समाज. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे घेरे, चौक्या, पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदारीची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. शिवकाळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे ‘सर्जेराव मांग’ व बाजी पासलकर या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी ‘येल्या मांग’ हे आहेत. शिवकालीन बखरीत व पोवाड्यात यांचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी मातंग, रामोशी अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरवलं. त्यांना गावांतून तडीपार केले, त्यांच्यावर खोटे आरोप लावले, तेव्हा मातंग समाजाने इंग्रजांच्या विरोधात गांवागांवातून संघर्ष केला. मातंग समाजातील आद्यगुरू श्री. लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर, वि. दा. सावरकर, महात्मा फुले, वासुदॆव बळवंत फडके इत्यादींना दिले. या मंडळींच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले.

मातंगांची हलगीवादनाची कला

वर्षानुवर्षांपासून गावातील वाद्यवृंद म्हणूनदेखील मातंग समाजाची वेगळी ओळख आहे. ‘कुणब्याघरी दाणं अन मांगाघरी गाणं’ म्हणजे कुणब्यांकडे धान्य व मातंगांकडे गाणे,अशी ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे. गावातील यात्रा, मिरवणुका, हर्षसोहळे यात वादन व त्यातही हलगीवादन मातंगांकडूनच केले जाते. हलगीवादनाचे सादरीकरण आजही गावागावांत मातंगांकडून होते. ही कला आता सातासमुद्रापारही गेली आहे. हलगी, संबळ, दिमडी, डफ ही विशेषेकरून मातंगांची पारंपारिक लोकवाद्ये आता प्रसिद्धीच्या झोतात आली आहेत.मातंग समाजातील स्त्रिया ह्या दयीनीचे काम करत होत्या.

सद्यस्थिती

मातंग समाजातील बांधव आज त्यांचा परंपरागत दोरखंड तयार करणे, झाडू तयार करणे इत्यादी. व्यवसायांपासून अलिप्त होऊन शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला आहे. परंपरागत शेतजमीन असलेली मातंग मंडळी आपली शेती सांभाळत आहेत. याखेरीज सरकारी, खाजगी नोकऱ्यांमध्ये तसेच उद्योजकतेकडे मातंग समाज बांधव वाटचाल करू लागला आहे. एकेकाळी बेडर आणि रांगडा असलेला हा समाज इतर क्षेत्रांतही आपले रांगडेपण सिद्ध करतोय.

पोटजाती

मातंग समाजातील उपजाती/पोटजाती:-

उचले, ककरकाढे, खानदेशी, गारुडी, घोडके, डफळे, दखने, पिंढारी, मदारी, मांगेला, वऱ्हाडे,, वगैरे.

मांग जातीतील उल्लेखनीय व्यक्ती

 • लहुजी वस्ताद साळवे
 • अण्णा भाऊ साठे
कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

1 × 2 =