अष्टावक्र गीता Ashtavakra Gita धनंजय महाराज मोरे : dhananjay maharaj more

Uncategorized

अष्टावक्र गीता

अनुक्रमाणिका

अध्यायवर थेट जाण्यासाठी क्लिक करा.टीप : कंसात श्लोकाचे नंबर.

 

अध्याय १

अध्याय २

अध्याय ३

अध्याय ४

अध्याय ५

अध्याय ६

अध्याय ७

अध्याय ८

अध्याय ९

अध्याय १०

अध्याय ११

अध्याय १२

अध्याय १३

अध्याय १४

अध्याय १५

अध्याय १६

अध्याय १७

अध्याय १८

अध्याय १९

अध्याय २०

 

संपादक : धनंजय महाराज मोरे

9422938199 / 9823334438

अधिक ग्रंथ आणि मोबईल सॉफ्टवेअर साठी : येथे क्लिक करा

आमच्या वेबसाईटवर जाण्यासाठी : येथे क्लिक करा

अष्टावक्र संक्षिप्त चरित्रप हा

अष्टावक्र गीता – अध्याय 1

 

अध्याय १

जनक म्हणाला,

हे प्रभो, ज्ञान कसें प्राप्त होईल, मुक्ति कशी मिळेल व वैराग्य कसें प्राप्त होईल हें मला समजावून सांगा. ॥१॥

अष्टावक्र म्हणाला

हे प्रिय, तुला जर मुक्तीची इच्छा असेल तर विषयांना विष समजून त्यांचा त्याग कर आणि क्षमा, आर्जव, दया, संतोष व सत्य यांना अमृत समजून त्यांचें सेवन कर. ॥२॥

तूं स्वतः पृथ्वी नाहींस, पाणी नाहींस, अग्नि नाहींस, वायु नाहींस किंवा आकाशही नाहींस. मुक्ति मिळविण्याकरितां, या सर्वांचा साक्षी जो चैतन्यरुप आत्मा तो तूं आहेस असें जाण. ॥३॥

जर तूं देहाला स्वतःपासून अलग करुन चैतन्यांत स्थिरावलास तर आत्तां-या क्षणींच–तूं सुखी, शान्त व बंधमुक्त होऊन जाशील. ॥४॥

तूं ब्राह्मणादि वर्ण असलेला नाहींस किंवा तूं चार आश्रमांतलाही नाहींस, तसाच तूं डोळे आदि इंद्रियांचा विषय नाहींस. तूं असंग, निराकार विश्वाचा साक्षी आहेस हें जाण व सुखी हो. ॥५॥

हे व्यापक, धर्म-अधर्म, सुख-दुःख हे सर्व मनाचे आहेत. तुला-आत्मरुपाला-ते लागू नाहींत. तूं कर्ता नाहींस आणि भोक्ताही नाहींस. तूं तर सदा सर्व काळ मुक्तच आहेस.॥६॥

हे राजन्‌, तूंच एक सर्वांचा द्रष्टा आहेस व सदैव सर्वार्थानें मुक्त आहेस. पण स्वतः स्वयंप्रकाश व सर्वांचा साक्षी असतांना, स्वतःला सोडून इतरांना तूं द्रष्टा मानतोस हेंच बंधन आहे. ॥७॥

’मी कर्ता आहें’ अशा अहंकाररुपी कृष्णसर्पानें दंश केलेला तूं, ’मी कर्ता नाहीं’ अशा विश्वासरुपी अमृताचें सेवन करुन सुखी हो. ॥८॥

’मी एक विशुद्ध बोध आहें’ या निश्चयरुपी अग्नीनें अज्ञानरुपी वनाला जाळून शोकरहित व सुखी हो. ॥९॥

दोरीवर जसा सापाचा आभास होतो तसा ’ज्या’ वर ह्या संसाराचा आभास होतो, ’तो’ बोध तूं आहेस हें जाण व सुखानें विहार कर. ॥१०॥

मुक्तीचा निर्धार (अभिमान) ठेवणारा मुक्तच होतो व बद्ध असण्याचा न्यूनगंड (अभिमान) बाळगणारा बद्धच होतो. कारण ’जशी मति तशी गति’ ही लोकोक्ति खरीच आहे. ॥११॥

आत्मा साक्षी आहे, व्यापक आहे, पूर्ण आहे, एक आहे, मुक्त आहे, चैतन्यरुप आहे, क्रियारहित आहे, संगरहित आहे, इच्छारहित आहे, शांत आहे, पण श्रमामुळें संसाववान आहे असा भासतो. ॥१२॥

हे जनका, ’अहं’ च्या आभासानें सर्व बाह्य वस्तूंशीं ममत्व भाव निर्माण होतो, त्याचा त्याग करुन, मी कूटस्थ, असंग, ज्ञानस्वरुप, अद्वैत व व्यापक आत्मा आहें असा ध्यास घे-तीव्र भावना राहूं दे. ॥१३॥

हे पुत्रा, फार काळापासून ’मी देह आहें’ या-देहाच्या अध्यासपाशानें तूं बांधलेला आहेस पण मी बोधरुप आहें या ज्ञानाच्या तरवारीनें तो धारणापाश तोडून टाक व सुखी हो. ॥१४॥

तूं असंग, क्रियाशून्य, स्वयंप्रकाश आणि निर्दोष आहेस. पण समाधीचे प्रयत्‍न करण्याची क्रिया हेंच बंधन आहे. तूं फक्त मुक्त असल्याची घोषणा कर, क्रिया नको. ॥१५॥

हें सारेम विश्व तूंच व्यापलें आहेस, तें तुझ्यांतच सामावलें आहे, तूं यथार्थतः शुद्ध चैतन्यस्वरुप आहेस. म्हणून संकोचून क्षुद्र मनाचा-चित्ताचा होऊं नकोस. ॥१६॥

तूं अपेक्षारहित आहेस, निर्विकार आहेस, स्वनिर्भर (स्वतःपरिपूर्ण-चिद्‌घनरुप) आहेस, शांतीचें आणि मुक्तीचें स्थान आहेस, अगाध बुद्धि आहेस, क्षोभरहित आहेस, म्हणून चैतन्यमात्रावर श्रद्धा ठेवणारा हो. ॥१७॥

साकाराला मिथ्या समज, निराकाराला निश्चल-नित्य-ओळख. या यथार्थ (तत्त्व) उपदेशानें पुन्हा तुझी संसारांत उत्पत्ति होणार नाहीं. ॥१८॥

ज्याप्रमाणें आरशांत पडलेल्या प्रतिबिंबामध्यें आरसाच आंत व बाहेर असतो, त्याप्रमाणे या शरिराच्या आंत व बाहेर परमेश्वरच भरलेला आहे. ॥१९॥

ज्याप्रमाणें सर्वव्यापी आकाश घटाच्या आंत व बाहेर असतें, त्याप्रमाणेंच नित्य आणि निरंतर ब्रह्म सर्व भूतमात्राला व्यापून आहे. ॥२०॥

Translation – भाषांतर

 

अष्टावक्र गीता – अध्याय २

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय २

जनक म्हणाला

आश्चर्य ! आपण काय सांगत आहां ? मी निर्दोष आहें, शान्त आहें ! बोध आहें ! प्रकृतीच्या पलीकडचा आहें ! आश्चर्य आहे कीं इतके दिवस मी मोहानें फसलों होतों. ॥१॥

जसा या देहाला एकटा मी प्रकाशित करतों, तसाच सार्‍या संसारालाही प्रकाशित करतों. म्हणूनच एक तर हें सर्व जगत्‌ माझें आहे किंवा माझें कांहींच नाहीं. ॥२॥

आश्चर्य आहे कीं, शरीरासुद्धां सार्‍या जगाचा त्याग करुन कुठल्या तरी कौशल्यानें अर्थात्‌ अष्टावक्राच्या केवळ उपदेशानेंच मी परमात्मा पाहात आहें. ॥३॥

जशा पाण्यावर लाटा-लहरी उठतात, बुडबुडे व फेस उठतो पण ते पाण्यापेक्षां वेगळे नाहींत, त्यावरच उठतात व त्यांतच नाहींसे होतात. त्याप्रमाणेंच आत्म्याहून भिन्न इथें काहीं नाहीं. सर्व अभिन्न आहे. ॥४॥

विचार केला असतां वस्त्र म्हणजे तंतूंचा समुदाय-तंतूच; तसेंच, विचार केला असतां हा संसारही आत्मसत्ताच आहे. ॥५॥

उसाच्या रसापासून बनलेल्या साखरेंत जसा उसाचा रस असतोच, तसा माझ्यांतून निर्माण झालेल्या विश्वांत मी आहेंच.

॥६॥

आत्म्याबद्दलच्या अज्ञानानें संसार भासतो पण त्याचें ज्ञान झालें तर तो भासत नाहीं. जशी दोरी अज्ञानामुळें—-माहीत नसल्यानें—-सापासारखी भासते, पण ती दोरी आहे असें ज्ञान होतांच तशी वाटत किंवा भासत नाहीं. ॥७॥

प्रकाश माझें स्वरुप आहे. मी त्याहून वेगळा नाहीं. जेव्हां विश्वसंसार प्रकाशित होतो तेव्हां तो माझ्या प्रकाशानेंच प्रकाशित होतो. ॥८॥

आश्चर्य आहे कीं, कल्पित संसार अज्ञानामुळें मला असा भासतो-जशी शिंपल्यांत चांदी, दोरीवर साप व सूर्यकिरणांवर पाणी (मृगजळ) भासतें. ॥९॥

माझ्यापासून निर्माण झालेला हा संसार माझ्यांत तसाच लय पावेल. जसा मातींत घडा, पाण्यांत लहर (लाट) व सोन्यांत दागिना विलीन होतो. ॥१०॥

मी आश्चर्यमय आहें ! मला नमस्कार असो ! ब्रह्मयापासून ते तृणापर्यंतच्या सार्‍या जगाचा नाश झाला तरी मला नाश नाहीं. मी नित्य आहें. ॥११॥

मी आश्चर्यकारक आहें. मला नमस्कार असो. मी देहधारी असूनही अद्वैत आहें. न कुठें जातों, न येतों; आणि सार्‍या विश्वाला निराकार, साक्षीरुप, द्रष्टामात्र असा होऊन मी व्यापून उरतों. ॥१२॥

मी आश्चर्यमय आहें. मला नमस्कार असो. माझ्यासारखा निपुण कोणीच नाहीं. कारण शरीराला स्पर्श न होतां या विश्वाला कायम धारण करुन असतों. ॥१३॥

मी आश्चर्यमय आहें. मला नमस्कार असो. एका अर्थी माझें कांहींच नाहीं. कारण मीच नाहीं आहें. ’मी’ च शिल्लक उरलों नाहीं, मग माझें काय असणार ? तेव्हां एका अर्थानें माझें कांहींच नाहीं आणि एका अर्थानें सर्व कांहीं माझें आहे. कारण जेव्हां मी शिल्लक राहात नाहीं तेव्हां परमात्माच फक्त उरतो आणि याचें तर सर्व कांहीं आहे-जें वाणी आणि मनाचा विषय आहे. ॥१४॥

ज्ञान, ज्ञेया आणि ज्ञाता हे तीनही यथार्थ—-सत्य नाहींत. ज्याच्यावर हे तीन भासतात तो मी निरंजन-शुद्ध आहे. ॥१५॥

अहो, दुःखाचें मूळ द्वैत आहे, व त्यावर कांहीं औषध नाहीं. (कारण आजार खोटा आहे.) हीं सर्व दृश्यें खोटीं आहेत आणि मी एक अद्वैत शुद्ध चैतन्य रस आहें. ॥१६॥

मी शुद्ध बोध आहें. माझ्या अज्ञानामुळें उपाधीची कल्पना मीं केली आहे, असें नित्य मनन करुन मी निर्विकल्प स्थितींत आहें. ॥१७॥

मला बंध अथवा मोक्ष नाहीं. बंधन जर भ्रम आहे तर मोक्ष कुठें ? आश्रयरहित होऊन भ्रांति शांत झाली. आश्चर्याची गोष्ट आहे कीं, हें सर्व जग आहे तरी मी अकलुषित-निरंजन व सर्वांच्या पलीकडचा आहें. ॥१८॥

शरीरासहित हें जग कांहींच नाहीं-म्हणजे न खरें न खोटें आहे आणि आत्मा शुद्ध चैतन्यमात्र आहे. हें जाणल्यानंतर कल्पना कसली करायची ? ॥१९॥

हें शरीर, स्वर्ग, नरक, बन्ध, मोक्ष आणि भय या गोष्टी केवळ कल्पनाच आहेत. त्यांच्याशीं मला काय करायचें आहे ? मी तर शुद्ध चैतन्य आहें. ॥२०॥

आश्चर्य आहे कीं, मला द्वैत-दुजाभाव दिसतच नाहीं. एवढा जनसमूह पाहूनदेखील मला द्वैत न दिसतां तो एकजीव अरण्यासारखा झाला आहे. मग मी कसा, कसला, कशाचा मोह करुं ? ॥२१॥

मी शरीर नाहीं, मला शरीर नाहीं, मी जीव नाहीं. नक्कीच मी चैतन्य आहें. जगण्याची इच्छा हाच माझा बंध होता. ॥२२॥

आश्चर्य आहे कीं, हवेचे झोत जसे पाण्यावर तरंग उठवतात तसे अनंत समुद्ररुप अशा माझ्या शांत आत्म्यावर चित्ताच्या हवेनें हजार-हजार लहरी उठतात. त्या लहरी माझ्या नाहींत. त्या लाटा चित्ताच्या हवेमुळें उठतात. ॥२३॥

अनंत समुद्ररुप माझ्यांत चित्तरुपी हवा शांत झाल्यावर, जीवरुपी वणिकाच्या-व्यापार करणाराच्या-अभाग्यानें जगरुपी नौका नष्ट होऊन जाते. ॥२४॥

आश्चर्य आहे कीं, अनंत समुद्ररुप माझ्या आंत जीवरुपी तरंग आपल्या स्वभावधर्मानुसार उठतात, परस्परांशीं लढतात, खेळतात व लय पावतात. ॥२४॥

Translation – भाषांतर

 

अष्टावक्र गीता – अध्याय ३

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय ३

अष्टावक्र म्हणाला

अष्टावक्रानें जनकाला विचारलें कीं, आत्म्याला तत्त्वतः एक आणि अविनाशी जाणूनही तुझ्यासारख्या आत्मज्ञानी आणि धैर्यवंताला अजूनही धन कमावण्यांत रुचि आहे का ? ॥१॥

आश्चर्य आहे कीं, शिंपल्याच्या अज्ञानानें चांदी आहे असा भ्रम निर्माण होतो, तसाच आत्म्याच्या अज्ञानामुळें विषयभ्रम झाल्यानें लोभ निर्माण होतो. ॥२॥

ज्या आत्मरुपी सागरावर हा संसार तरंगाप्रमाणें स्फुरित होत असतो तो आत्मा मी आहें हें जाणूनही तूं दीनवाणा कां पळत आहेस ? ॥३॥

अत्यंत सुंदर आणि शुद्ध चैतन्यरुप आत्म्याबद्दल एवढें जाणूनही कोण कसा इंद्रियांच्या विषयांत अत्यंत आसक्त होऊन मलिनतेला प्राप्त होतो ते ध्यानांत घे. ॥४॥

सर्व भूतांत आत्मा आहे आणि सर्व भूतें आत्म्यांत आहेत असें ज्ञान असूनही मुनीला माया-ममता निर्माण होते हें आश्चर्यकारक आहे. ॥५॥

परम अद्वैतांत आश्रय घेतलेला आणि मोक्षांकरितां उद्युक्त झालेला पुरुषही कामातुर होऊन कामक्रीडेच्या विचारानें व्याकुळ होत असतो हें मोठें आश्चर्य आहे. ॥६॥

काम हा ज्ञानाचा शत्रु आहे हें माहीत असूनही एखादा अतिदुर्बल आणि मरण जवळ आलेला पुरुषही कामभोगाची इच्छा करतो हेंच मोठें आश्चर्य आहे. ॥७॥

जनका, जो इहलोकांतील व परलोकांतील भोगांबद्दल विरक्त आहे आणि जो नित्य व अनित्याचा विवेक ठेवतो व जो मोक्षाची इच्छा करणारा आहेअ तोही मोक्षाचें, मरणाचें भय बाळगतो हें एक आश्चर्यच आहे. ॥८॥

ज्ञानाला उपलब्ध झालेला धीर पुरुष भोग भोगतांना किंवा दुःख सहन करतांनाही नित्य केवल आत्म्याला पाहात असल्यानें प्रसन्नही होत नाहीं वा रागावतही नाहीं.॥९॥

जो आपल्या कार्यमग्न शरीराला, तें दुसर्‍याचें शरीर आहे अशा तटस्थ भावनेनें पाहातो, तो महाआशय असलेला पुरुष स्तुति अथवा निंदा यामुळें क्षोभाला कसा प्राप्त होईल ? ॥१०॥

जो या विश्वाला मायामात्र पाहातो आणि ज्याच्या मनांत आताम कसलेंही कुतूहल शिल्लक नाहीं-शंका-नाहीं-तो धीर पुरुष मरण आल्यावर भयभीत कां होईल ? ॥११॥

जो महात्मा मनांत मोक्षाचीही इच्छा करीत नाहीं व जो आत्मज्ञानानें तृप्त आहे, त्याची तुलना कोणाबरोबर करतां येईल ? ॥१२॥

जो खराखुरा धैर्यवान व शांत झाला आणि ज्यानें हें जाणलें कीं, दिसणारा हा संसार वस्तुतः नाहींच, त्याच्या मनांत मग हें घ्यावें व तें टाकावें, अशी वासनाच निर्माण होत नाहीं. ॥१३॥

ज्यानें अंतःकरणांतील कामक्रोधादि विषयांचा त्याग केला, ज्यानें साक्षी होऊन पाहिलें कीं, हे राग-लोभ माझे नाहींत, मी फक्त प्रकाश आहें आणि भेदबुद्धिरहित व आशारहित जो झाल आहे त्या पुरुषाला दैवयोगानें आलेल्या भोगांचा—-सुखाचें सुख व दुःखाचें दुःख वाटत नाहीं. ॥१४॥

Translation – भाषांतर

 

 

अष्टावक्र गीता – अध्याय ४

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय ४

जनक म्हणाला

ज्यांच्या आंत मी-अहंकार-शिल्लक उरला नाहीं, सहज वाटयाला आलेले सुखदुःखाचे भोग भोगणार्‍या आत्मज्ञानी धीर पुरुषांची बरोबरी संसाराचें ओझें डोक्यावर घेणार्‍या मूढ पुरुषांना कधींही करतां येणार नाहीं. ॥१॥

ज्या पदाच्या प्राप्तीच्या इच्छेनें सर्व देवताच काय पण इंद्रही दीनवाणा होतो, त्या पदावर, त्या परमोच्च पदावर पोहोंचूनही-त्या सिंहासनावर बसूनही-योगी हर्ष करीत नाहीं–तेथेंही तो साक्षी बनून राहातो. ॥२॥

जसा आकाशाशीं संबंध आहे असें भासवणार्‍या धुराशीं आकाशाचा संबंध नसतो, तसाच पापपुण्याचा त्या पदावर आरुढ झालेल्या पुरुषाच्या अंतःकरणाशीं संबंध नसतो. ॥३॥

ज्या महात्म्यानें या सर्व जगाला स्वतःच्या आत्म्याप्रमाणेंच जाणलें, त्या वर्तमान क्षणाच्या साक्षी बनलेल्या महात्म्याला जसें स्फुरेल तसें वागण्यापासून कोण रोखूं शकेल ? ॥४॥

ब्रह्यापासून मुंगीपर्यंतच्या चार प्रकारच्या जीवांच्या समूहापैकीं ज्ञान्यालाच इच्छा व अनिच्छा थांबण्याचें निश्चित सामर्थ्य आहे. तो दोन्हीपासून मुक्त आहे. ॥५॥

कधीं कुणी विरळाच आत्म्याला अद्वय आणि जगदीश्वररुपांत जाणत असतो-एकरुप होतो. मग त्याची मर्जी राहात नाहीं-मग तो तेंच करतो जें प्रभु करवून घेतो आणि मग विश्वाशीं एकरुप झालेल्या अशा अद्वय पुरुषाला कशाचें भय वाटणार ? कारण भय वाटायला त्याला पर कोणीच नाहीं.॥६॥

Translation – भाषांतर

 

अष्टावक्र गीता – अध्याय ५

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय ५

अष्टावक्र म्हणाला

तुझा कोणाशींही संबंध नाहीं, त्यामुळें तूं शुद्ध आहेस. तूं कशाचा त्याग करुं इच्छितोस ? अशा रीतीनें देहाभिमान नाहींसा करुन तूं मोक्षाला प्राप्त हो. ॥१॥

अशीच भावना कर कीं, माझ्यापासून संसार निर्माण झाला आहे; जसा समुद्राच्या पाण्यांत बुडबुडा उत्पन्न होतो–आणि स्वतःला व जगाला, स्वतःला व समष्टीला एक समजून, एक जाणून, तूं मोक्षाला प्राप्त हो. ॥२॥

दृश्यमान जगत् प्रत्यक्ष दिसत असलें तरी दोरीवर सापाचा आभास व्हावा तसें आभासरुप आहे. तुला शुद्धाला—-मलरहिताला तें नाहीं, असें जाणून तूं लयाला—-निर्वाणाला प्राप्त हो. ॥३॥

दुःख व सुख, आशा आणि निराशा, जीवन व मृत्यु जो समान मानतो असा पूर्ण होऊन तूं लयाला—-मोक्षाला प्राप्त हो.

Translation – भाषांतर

 

 

अष्टावक्र गीता – अध्याय ६

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय ६

जनक म्हणाला

मी आकाशाप्रमाणें आहें. संसार घडयाप्रमाणें प्रकृतिजन्य आहे (बनतो व पुष्ट होतो, आकाशावर याचा कांहीं परिणाम होत नाहीं. कारण साक्षी तर आकाशासारखा अलिप्त आहे.) यामुळें याचा न त्याग करायचा आहे, न स्वीकार करायचा आहे, न लय करायचा आहे असें मी जाणतों. ॥१॥

मी समुद्रासारखा आहें. हा संसार तरंगासारखा आहे. म्हणून याचा त्याग किंवा स्वीकार करायचा नाहीं असें मी जाणतों. ॥२॥

मी शिंपल्यासारखा आहें. विश्वाची कल्पना शिंपल्यावरच्या चांदीसारखी आहे, असें ज्ञान आहे. म्हणून न त्याचा त्याग आहे, न स्वीकार आहे, न लय आहे. ॥३॥

मी सर्व भूतांत आहें व सर्व भूतें माझ्यांत समाविष्ट आहेत त्यामुळें कशाचा न त्याग आहे, न ग्रहण आहे, न लय आहे. ॥४॥

Translation – भाषांतर

 

 

अष्टावक्र गीता – अध्याय ७

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय ७

जनक म्हणाला

मी अन्तहीन महासमुद्र आहें, त्यांत विश्वरुपी नाव आपल्या आपणच वायूनें डोलत आहे. मला त्याबद्दल असहिष्णुता नाहीं. ॥१॥

माझ्या अंतहीन महासमुद्रांत जगरुपी लाट स्वभावतः उठो वा नाहींशी होवो, त्यामुळें मी वाढतही नाहीं किंवा घटतही नाहीं. ॥२॥

माझ्या अंतहीन महासागरावर संसार हा कल्पनामात्र आहे. मी अत्यंत शांत आहें, निराकार आहें; आणि आतां हेंच माझें आश्रयस्थान आहे. ॥३॥

आत्मा विषयांत नाहीं आणि विषय त्या निरंजन आत्म्यांत नाहींत. अशा प्रकारें मी अनासक्त, स्पृहामुक्त आहें व त्यामुळेंच त्यांचें आश्रयस्थान आहें. ॥४॥

अहो, मी चैतन्यमात्र आहें. संसार इन्द्रजालाप्रमाणें आहे. त्यामुळें न कांहीं मिळविण्याजोगें आहे, न कांहीं टाकण्याजोगे आहे. ॥५॥

Translation – भाषांतर

 

 

अष्टावक्र गीता – अध्याय ८

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय ८

अष्टवक्र म्हणाला

जेव्हां मन कांहीं इच्छितें, कांहीं विचार करतें, कांहीं स्वीकारतें, कांहीं टाकतें, दुःखी होतें किंवा सुखी होतें, तेव्हां बंधन निर्माण होतें. ॥१॥

जेव्हां मन कशाची इच्छा करीत नाहीं, चिंता करीत नाहीं, सोडीत नाहीं किंवा हवें हवें असें करीत नाहीं, सुखी किंवा दुःखी होत नाहीं, तेव्हां मुक्तीच असते. ॥२॥

जेव्हां मन कुठल्याही दृष्टीनें विषयांत गुंततें तेव्हां बंध निर्माण होतो आणि जेव्हां मन सर्व विषयांपासून अनासक्त होतें तेव्हां मोक्ष असतो. ॥३॥

जेव्हां ’मी’ नसेल तेव्हां मोक्ष, जेव्हां ’मी’ असेल तेव्हां बंध; अशा मतीला जो उपलब्ध झाला—यांत स्थिरावला, त्याला मग ही इच्छा, हा स्वीकार, हा त्याग असें होत नाहीं.॥४॥

Translation – भाषांतर

 

अष्टावक्र गीता – अध्याय ९

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय ९

अष्टावक्र म्हणला

केलेलीं आणि न केलेलीं कर्में व सुख-दुःख द्वंद्व कुणाची कधीं शांत झालेलीं आहेत ? हें समजून घेऊन या संसारांत उदासीन-निर्वेद होऊन अव्रती (अनाग्रही) व त्यागपरायण हो. ॥१॥

हे प्रिय, लोकव्यवहार, उत्पत्ति आणि विनाश पाहून कुणा भाग्यशालीचीच जगण्याची कामना, भोगण्याची वासना व ज्ञानाची इच्छा शांत झाली आहे. ॥२॥

हें सारें अनित्य, तीन तापांनीं दूषित, सारहीन, निंदित व त्याज्य आहे, असा बोध अवलोकनानें होऊन निश्चय होतांच तो शांतीला प्राप्त होतो. ॥३॥

असा कोणचा काळ आहे, कोणचें वय-अवस्था आहे कीं, जेव्हां मनुष्याला द्वंद्व नव्हतें, सुखदुःख नव्हतें ? म्हणून त्यांची उपेक्षा कर. यथाप्राप्त—-जें मिळालें त्यांत—-परिस्थितींत संतोष मानणारा मनुष्य सिद्धीला प्राप्त होतो. ॥४॥

महर्षींचीं, साधूंचीं, योग्यांचीं अनेक भिन्नभिन्न मतें आहेत, हें पाहून बुद्धिमान मनुष्य त्यांच्या मतांची उपेक्षा करतो. त्यांच्या मातांच्या गुंत्यांत अडकत नाहीं व शांति मिळवितो. ॥५॥

जो उपेक्षा, समता आणि युक्तिद्वारा चैतन्याच्या सत्यस्वरुपाला जाणतो तो काय गुरु नाहीं ? (तोच स्वतःचा स्वतः गुरु आहे. गुरु आंत आहे. बाहेरचा गुरु केवळ प्रतीकरुप आहे.) ॥६॥

भूतमात्रांचे विकार (इंद्रियादिक) यथार्थरुपानें पाहा म्हणजे शरीरादिकांपासून अलग होऊन तूं आत्मस्वरुपांत स्थित होशील आणि साक्षीभूत आत्मा तुला प्रतीत होईल. ॥७॥

वासना हाच संसार आहे म्हणून वासना गेली कीं संसार गेला, असें जो जाणतो तो सर्वांपासून मुक्त झाला. मग आतां जें आहे, जसें आहे, त्या सर्वांचा स्वीकार आहे. ॥८॥

Translation – भाषांतर

 

 

अष्टावक्र गीता – अध्याय १०

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय १०

अष्टवक्र म्हणाला

वैरीरुप काम व अनर्थानें भरलेल्या अर्थांचा त्याग कर आणि त्या दोघांच्या कारणरुप धर्माचाही त्याग करुन तूं सर्वांची उपेक्षा कर. ॥१॥

मित्र, शेत, धन, घर, स्त्री, भाऊबंद इत्यादि सर्व संपत्तीला तूं स्वप्नाप्रमाणें किंवा इन्द्रजालाप्रमाणें समज, कारण ते सर्व तीन-पांच दिवसांचेच असतात. ॥२॥

जेथें जेथें वासना निर्माण होईल तेथें तेथें संसार आहेअ असें समज. परिपक्व वैराग्याचा आधार घेऊन तृष्णा-वासनाहीन हो. ॥३॥

तृष्णा हाच बंध आहे, व तिचा नाश हा मोक्ष आहे. संसारात अ-संग होण्यानेंच निरंतर आत्म्याची प्राप्ति व तुष्टि होते. ॥४॥

तूं एक शुद्ध चैतन्य आहेस, संसार जड व असत् आहे. अविद्याही असत् आहे—एवढें जाणल्यावर आणखी जाणून घ्यायची काय जरुरी आहे ? ॥५॥

तुझें राज्य, पुत्रपौत्र, शरीर आणि सुख जन्मोजन्मीं नष्ट होत आलीं आहेत—-जरी तूं त्यांच्यावर आसक्त बनला होतास. ॥६॥

अर्थ, काम, पुण्यकर्मसुद्धां तूं खूप करुन चुकला आहेस. तरीसुद्धां या संसाररुपी जंगलांत मनाला शांति मिळाली नाहीं. आतां तरी शांत बस. फक्त साक्षी हो. ॥७॥

किती जन्म तूं शरिरानें, मनानें व वाणीनें श्रमपूर्ण व दुःखपूर्ण कर्में केलींस ? (तरीसुद्धा उत्पातरुपी संसारांत मनाला थोडासुद्धां विश्रांतीचा क्षण मिळाला नाहीं–तेव्हां) आतां तरी निदान साक्षी राहा. कर्ता राहूं नकोस. ॥८॥

Translation – भाषांतर

 

 

अष्टावक्र गीता – अध्याय ११

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय ११

अष्टावक्र म्हणाला

हे जनक, एखाद्या गोष्टीचा अभाव असणें किंवा तिची प्राप्ति या गोष्टी स्वभावतः होत असतात. असें जाणून यांकडे साक्षीवृत्तीनें पाहाणारा विकाररहित व क्लेशरहित झालेला पुरुष सहज सुखानें शांत राहात असतो. ॥१॥

सर्वांना निर्माण करणारा या जगांत फक्त ईश्वर आहे. ही सर्व त्याचीच लीला आहे, असें निश्चयपूर्वक जाणून जो आशारहित होऊन, सर्वांचाच प्रभुकृपा म्हणून स्वीकार करतो तो कशांतच आसक्त न होतां शांत भावानें असतो. ॥२॥

कालेंकरुन दैवानें आपत्काल व संपदा येत असतात, हें ज्याला पक्कें ठाऊक आहे तो कशाचीही इच्छा किंवा कशाचेंही दुःख न करतां स्वस्थेंद्रिय व नित्य संतुष्ट असा राहातो. ॥३॥

सुख आणि दुःख, जन्म व मरण हीं दैवयोगानें प्राप्त होतात असें निश्चयानें जाणणारा पुरुष, सहजप्राप्त कर्मांचा बोजा न वाटूं देतां तीं करतो पण कशांतच आसक्त होत नाहीं. ॥४॥

चिंतेमुळें संसारदुःख निर्माण होतें हें ज्यानें स्वतःवर ठसवून घेतलें आहे त्याला कशाचीच इच्छा राहात नाहीं व तो चिंतारहित, सुखी व शांत असतो. ॥५॥

मी शरीर नाहीं, हा देह माझा नाहीं, मी ज्ञानस्वरुप बोधरुप-साक्षी आहें,असा बोध आत्मगत झालेला पुरुष केलेल्या व न केलेल्या कर्मांचें स्मरण करीत नाहीं—मनांत घोळवत नाहीं, त्यामुळें कैवल्यांतच त्याचा निवास असतो. ॥६॥

ब्रह्मापासून गवतापर्यंत सर्वत्र मीच आहें अशी अनुभूति प्राप्त केलेला व सर्व रुपांत सामावलेला संकल्परहित, शुद्धस्वरुप, शांत, लाभालाभरहित पुरुष आत्मानंदांत परिपूर्ण असतो. ॥७॥

या आश्चर्यमय विश्वाच्या ठिकाणीं वासनारहित, आत्मबोधास्वरुपांत वावरणार्‍या पुरुषाला, सर्वत्र हरिरुपाचीच अनुभूति येत असल्यानें, दुःखरुप अनुभवास न येतां तो शान्तिस्वरुपानेंच असतो. ॥८॥

Translation – भाषांतर

 

 

अष्टावक्र गीता – अध्याय १२

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय १२

जनक म्हणाला

हे श्रीगुरो ! मी सर्व शारीरिक कर्मांचा त्याग, जप-पाठादि वाणीच्या कर्मांचा त्याग करीत शेवटीं मनांत येणार्‍या विचारांचाही त्याग करुन साक्षीभावांत राहूं लागल्यानें मी आत्मस्वरुपांत लीन झालों आहें.॥१॥

अदृश्य अशा आत्म्याचें, तो ध्यानाचा विषय होऊं शकत नसतांनाही, शब्द, विचार व रुप यांच्या संवयीनें, त्यांच्या द्वारां ध्यानाची क्रिया करणें हाच विक्षेप-बाधा आहे. त्यामुळें ध्यान करण्याच्या क्रियेविरहित होऊन, मी स्व-रुपांत स्थिर आहे. ॥२॥

जड समाधी साधण्याकरितां मनानें संकल्पाची व इतर योगक्रिया करणें हा नियम, हाच अध्यास आहे व मनाच्या व्यापाराची सहजसमाधीला आवश्यकता नाहीं. त्यामुळें त्या समाधीशिवाय मी आत्मानंदांत आहें. ॥३॥

हे प्रभो, टाकण्यायोग्य आणि घेण्यायोग्य वस्तूंचा अभाव असल्यानें, अर्थात्‌ आत्मज्ञानाची प्राप्ति झाल्यानें मला टाकण्यासारखें किंवा घेण्यासारखें कांहीं राहिलें नाहीं व त्यामुळें हर्षविषादही गेले व आतां मी आपल्या स्वरुपांत स्थिर झालों आहें. ॥४॥

आश्रमधर्म व त्याचीं फळें, त्यागी संन्याशाचा अनाश्रमीचा दंडधारणादि धर्म व योग्याचा धारणध्यान इत्यादीचा धर्म या विरहित मी आहें. या सर्वांचा मी साक्षी चिद्रूप आहें. ॥५॥

कामनेमुळें कर्माचें अनुष्ठान करणें किंवा कामनापूर्ति होणार नाहीं हें जाणून तिचा त्याग अज्ञानामुळें होतो, हें नीट ठाऊक असल्यानें मी कर्म करण्याची वा टाकण्याची इच्छा करीत नाहीं व स्वतःच्या नित्यानंदस्वरुपांत स्थिर राहातों. ॥६॥

अचिंत्य अशा ब्रह्माचें चिंतन करतांना, मनानें चिंतनाची क्रिया केली जाते म्हणून मनाच्या त्या क्रियेचा -विचाराम्चा त्याग करुन, मी ’स्व’भावांत राहातों ॥७॥

ज्या पुरुषानें या प्रकारें शरिराच्या व मनाच्या सर्व सर्व क्रियांचा त्याग करुन आपल्या ’स्व’ रुपाला जाणलें तोच कृतार्थ म्हणजेच जीवन्मुक्त होतो. अशा क्रियारहित सहज अवस्थेंत जो राहातो तोच या देहांत असूनही विदेहमुक्ति अनुभवत असतो. ॥८॥

Translation – भाषांतर

 

अष्टावक्र गीता – अध्याय १३

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय १३

जनक म्हणाला

सर्व विषयांबद्दलच्या आसक्तीचा साक्षी वृत्तीनें जो सहजगत्या त्याग घडला व त्यामुळें चित्ताला जी स्थिरता आली ती भगवीं वस्त्रें धारण करणार्‍या संन्याशालाही दुर्लभ आहे. त्यामुळें साक्षी वृत्तींत राहून, गृहण व त्यागाची आसक्तीही संपली व मी आत्मानंदांतच उरलों. ॥१॥

कुठें कर्मकांडानें शरीर शिणलें आहे, कुठें पाठ-पाठांतरानें वाणीला शीण आला आहे, तर कुठें मनन-चिंतनानें मन मरगळून गेलें आहे हें पाहून या सर्वांचा त्याग करुन मी निर्धारानें आत्मानंदांत राहिलों आहें. ॥२॥

शरीरादींनीं होणारीं कर्में आत्मा करीत नसतो हें जाणून घेतल्यानें मी सहजप्राप्त कर्में अलिप्त राहून, साक्षीभावानें करुनही मी आपल्या सुख ’स्व’रुपांतच राहातों. ॥३॥

ज्याला देहासक्ति आहे त्यालाच कर्म करण्याची अथवा न करण्याचीं बंधनें असतात पण देह राहो किंवा जावो अशा माझ्या अवस्थेमुळें मी सहजसुखांत असतों. ॥४॥

लौकिक व्यवहार म्हणजे चालणें, फिरणें, बसणें, उठणें यांपासून अभिमानरहित झाल्यानें मला लाभ अथवा हानि नाहीं. त्यामुळें मी झोपलेला असो, बसलेला असो वा फिरत असो, या क्रियांमुळें माझी आत्मानंद अवस्था मोडत नाहीं. ॥५॥

सारीं कर्में सोडून मी झोपलों तरी माझी कांहीं हानि होत नाहीं, किंवा कर्मे करुन मला कांहीं प्राप्त करण्याची कामना नाहीं. त्यामुळें लाभहानीचा विचारच नसल्यानें मी सहजसुखांत असतों. ॥६॥

निरनिराळ्या परिस्थितींतील सुखांचीं आंदोलनें पाहून, मी सुख व दुःख यांत भेद मानीनासा झाल्यामुळें सुखी आहें. ॥७॥

Translation – भाषांतर

 

अष्टावक्र गीता – अध्याय १४

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय १४

जनक म्हणाला

जो पुरुष स्वभावानें शून्यचित्त आहे तो प्रारब्धकर्मानुसार आलेले विषय भोगतो. पण जसा गाढ झोपलेल्या माणसानें, उठवण्यांत आल्यानें, त्या झोपेचा पगडा असतांनाच सांगितलेलें काम करावें, त्याच प्रकारें हानिलाभाचा विचार न करतां अलिप्त व साक्षी राहून तीं कर्में करतो. ॥१॥

जनक म्हणतो कीं, शून्यचित्त झाल्यामुळें माझ्या विषयभावना मावळल्या आहेत. पूर्णात्मदर्शी अशा माझी विषयभोगांची इच्छा नष्ट झाल्यानें आतां माझें धन कुठलें ? मित्र कुठलें ? शास्त्रांचा अभ्यास कुठला ? आणि निदिध्यासनादिक कुठें उरलें ? माझी तर कशाबद्दलच आस्थाबुद्धि राहिली नाहीं. ॥२॥

साक्षी पुरुष व परब्रह्म पारमात्म्याचा बोध होऊन सार्‍या आशा मावळल्या, बंधनें गळून पडलीं व मोक्षाचीही कामना शिल्लक राहिली नाहीं. ॥३॥

विकल्पशून्य अंतःकरणाच्या निभ्रांत पुरुषाच्या अवस्थेंत स्वच्छंदानें वावरणार्‍या, त्या मुक्त पुरुषाला त्याच मुक्त अवस्थेला पोहोंचलेला मुक्तपुरुषच जाणतो. ॥४॥

Translation – भाषांतर

 

 

अष्टावक्र गीता – अध्याय १५

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय १५

अष्टावक्र म्हणाला

सात्त्विक बुद्धीचा पुरुष थोडयाशा उपदेशानेंच कृतार्थ होतो. पण संसारासक्त, असद्बुद्धीचा पुरुष आयुष्यभर जिज्ञासु असूनही पुन्हा पुन्हा मोह पावतो व मुक्तीला मुकतो. ॥१॥

विषयांबद्दल वैराग्य म्हणजे मोक्ष व विषयांविषयीं रस-आवड असणें हाच बन्ध आहे, एवढेंच ज्ञान आहे. जसें वाटेल तसें तूं कर. ॥२॥

तत्त्वबोधवादविवादकुशल, पंडितालाही मूक व जड, व आळशी वाटण्याइतका, कर्मापासून (शारीरिक व मानसिक) परावृत्त करतो व सहजावस्थेंत ठेवतो, त्यामुळें भोगाभिलाषी लोकांनीं या मार्गाचा त्याग केला आहे. ॥३॥

हे जनका ! तूं शरीर नाहींस, भोक्ता नाहींस, किंवा कर्ता नाहींस. तूं निखळ चैतन्य आहेस, यांचा साक्षी आहेस. त्याच निरपेक्ष, साक्षी वृत्तींत राहून तूं सुखानें राहा. ॥४॥

राग व द्वेष हे मनाचे धर्म आहेत. तें मन म्हणजे तूं नव्हेस तर विकल्परहित, निर्विकार असा बोधरुप आत्मा तूं आहेस, हें जाणून सुखानें राहा. ॥५॥

सर्व भूतांमध्यें तो चैतन्यरुप आत्मा आहे व भूतें त्यांत सामावलीं आहेत ह्या बोधानें निरहंकारी व ममतारहित असा तूं सुखी अस. ॥६॥

समुद्रावर उठणार्‍या तरंगाप्रमाणें हें विश्व ज्यावर स्फुरण पावतें तें तूंच आहेस याबद्दल संदेहच नाहीं म्हणून हे चिन्मय ! तूं विगतज्वर हो ॥७॥

हे सौम्य ! श्रद्धा ठेव, याबद्दल संशय ठेवूं नकोस. श्रद्धा ठेव कीं, तूं ज्ञानस्वरुप, भगवान्, परमात्मा, प्रकृतीहून वेगळा आहेस. ॥८॥

गुणांनीं लपेटलेलें शरीर जड आहे. तें येतें आणि जातें. आत्मा न जाणारा आहे न येणारा आहे, मग त्या शरीराबद्दल एवढा खेद करण्याचें काय कारण आहे ? ॥९॥

तुझा हा देह कल्पांतापर्यंत राहो अथवा या क्षणीं त्याचा नाश होवो, पण तूं चिन्मात्रस्वरुप असल्यानें तुला वृद्धि कुठली व नाश कुठला ? ॥१०॥

अनंत महासागरावर विश्वरुप तरंग स्वभावतः उत्पन्न होतात व अस्त पावतात. परंतु तुझी (चिन्मय आत्म्याची) न वृद्धि होते न नाश होतो. ॥११॥

हे तात, तूं चैतन्यस्वरुप आहेस, त्यामुळें तुला कुठल्याही वस्तूचा त्याग वा गृहण करणें शक्य नाहीं. कारण हें जगत्‌ तुझ्याहून वेगळें नाहीं. ॥१२॥

हे जनका ! भेदशून्य, अविनाशी, शांत, निर्मल अशा तुझ्या चैतन्याकाशांत न जन्म, न मृत्यु, न कुठलें कर्म, न अहंकार शिल्लक असूं शकेल. ॥१३॥

ज्याप्रमाणें एकाच सोन्यानें घडविलेली बांगडी, बाजूबंद व घुंगरु आकारानें वेगळे वाटले तरी एकाच सोन्याचे आहेत, त्याप्रमाणें तूं जें जें पाहात आहेस त्या त्या ठिकाणीं जरी बाह्य आकार वेगळा दिसला तरी तूंच आहेस : ॥१४॥

हे जनका ! हा तो (परका) आहे, हा मी (माझा) आहे, हा मी (माझा) नव्हे, या भेदबुद्धीचा त्याग करुन मी सर्वरुप आत्माच आहें या निश्चित बोधानें व कामनारहित होऊन सुखी हो. ॥१५॥

हे शिष्या ! तुझ्याच अज्ञानामुळे हें जग भासतें, व तुझ्याच आत्मज्ञानानें त्याचा नाश होतो. ज्ञानाचा उदय झाल्यावर तूंच एकटा एकच उरतोस; परमार्थंतः संसारी व असंसारी हे भेद तुला नाहींत. ॥१६॥

हें जगत् भ्रांतीमुळें दिसत आहे. त्याचें स्वतःचें त्याशिवाय अस्तित्व नाहीं, असा बोध ज्याच्या अनुभूतींत आला तो वासनारहित होऊन, स्फूर्तिमात्र उरुन, शान्तीला प्राप्त होतो. ॥१७॥

अष्टावक्र म्हणतो कीं, हे जनका, या संसाररुपी महासागरांत सदा एकटा एक तूंच असंग व साक्षीरुपानें होतास व राहाशील. आतां तुला न कुठला बंध आहे, न कुठला मोक्ष आहे. तूं आतां कृतकृत्य, धन्य झाला आहेस. ॥१८॥

हे चिन्मय ! संकल्पविकल्पानें तूं आपलें चित्त क्षोभित करुं नकोस तर संकल्पविकल्परहित होऊन आपल्या आनंदस्वरुपांत राहा. ॥१९॥

ध्यान करणें ही मनाची क्रिया आहे म्हणून ध्यानाचा व हृदयांत कांहींही प्रतिमा ठेवण्याची क्रिया हेंही ध्यान असल्यानें त्याचाही त्याग कर; आत्मा स्वयमेव मुक्तच असल्यानें तूं विचार करुन काय साधणार आहेस ? ॥२०॥

Translation – भाषांतर

 

 

अष्टावक्र गीता – अध्याय १६

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय १६

अष्टावक्र म्हणाला

हे प्रिय ! अनेक प्रकारांनीं नाना शास्त्रें ऐक वा सांग, परंतु तें सर्व ज्ञान विसरल्याशिवाय तुला शांति मिळणार नाहीं. ॥१॥

हे ज्ञानवान, वाटलें तर तूं भोग भोग, समाधींत राहा किंवा कर्म करीत राहा, पण आत्मज्ञानाच्या प्रभावानें ज्या वेळीं तूं सर्व आशांपासून दूर राहाशील तेव्हांच तुझें चित्त स्वस्थ होऊन तूं सुखावशील. ॥२॥

हे शिष्या ! शरीराच्या निर्वाहा(सुखा)करितां अतिसायास-श्रम केल्यानें सर्व जण दुःखी होतात हें कोणी जाणत नाहीं, म्हणून महापुरुष सहजप्राप्त असेल त्याचा स्वीकार करुन स्वस्थ राहातात. ॥३॥

जो ज्ञानवान जीवन्मुक्त पुरुष आहे त्याला डोळ्यांच्या पापण्या उघडणें मिटणेंही खेदकारक वाटतें. इतका जो प्रवृत्ति-क्रियांबद्दल आळशांतला आळशी आहे व सर्व व्यवहार-संसारवृत्तींपासून निवृत्त झाला, त्यालाच सुखाची प्राप्ति होते, इतर कुणाला नव्हे. ॥४॥

हें काम केलें, साधलें, तें केले नाहीं-यशस्वी झालें नाहीं, या मनाच्या वासनाद्वंद्वांतून जो मोकळा झाला त्याला मग धर्म, अर्थ, काम व मोक्षाच्याही इच्छांतून सुटतां येतें. ॥५॥

जो मुमुक्षु विषयांचा राग करुन त्याग करतो तो विरक्त व जो विषयांवर लोलुप झाला त्याला विषयासक्त म्हणतात, पण जो इच्छारहित होऊन विषयांचा त्याग व भोगाचा विचारच करीत नाहीं तो जीवन्मुक्त असतो. ॥६॥

जोंपर्यंत तृष्णा आहे तोंपर्यंत संसारवृक्षाला हें घ्यावें, तें टाकावें असे अंकुर सतत फुटतच राहातात. साक्षी वृत्तीनें राहाणार्‍या जीवन्मुक्ताला प्रारब्धवश जें काय होईल त्याचा व जें नष्ट होईल त्याचा हर्षखेद होत नाहीं. ॥७॥

मन विषयांकडे जाऊं लागतांच विषयांबद्दल मोह निर्माण होतो, विषयांचा वीट आल्यावर त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. परंतु मुक्त पुरुष रागद्वेषांचा त्याग करुन, जें दैवयोगानें प्राप्त होतें त्याचा साक्षीभावानें स्वीकार करीत असल्यानें विकाररहित असतो. ॥८॥

हे शिष्या ! दुःखांच्या अनुभवानें विषयी-संसारी मनुष्य संसाराचा त्याग करण्याची कामना ठेवतो, तसा प्रयत्‍न करतो. पण ज्याचे सर्व विकार शमले आहेत व त्यामुळें दुःखताप गेले आहेत तो संसारांत असूनही त्याचा खेद करीत नाहीं. ॥९॥

ज्याला मोक्षाची तीव्र हाव आहे, तो मिळवीनच अशी जिद्द आहे व देहाबद्दल तशीच तीव्र ममता आहे तो ज्ञानी व योगी होऊं शकत नाहीं. तो केवळ दुःखाचा वाटेकरी असतो. ॥१०॥

हे जनका ! तुला महादेव उपदेश करो कीं विष्णु उपदेश करो अथवा ब्रह्मा उपदेश करो ! जोंपर्यंत तुझ्या मनाच्या सर्व क्रिया थांबून, भूत व भविष्याचा विचार सुटून तूं वर्तमानकाळांत निर्विचार, साक्षी होऊन राहात नाहींस तोंपर्यंत तुला शांतता लाभणार नाहीं. ॥११॥

Translation – भाषांतर

 

 

अष्टावक्र गीता – अध्याय १७

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय १७

अष्टावक्र म्हणाला

आत्मज्ञानाचें फळ त्याच पुरुषाला मिळतें आणि त्याच पुरुषाचा योगाभ्यास सुफलित होतो, ज्यानें विषयवासनांचा त्याग करुन आपलीं इंद्रियें निर्मळ केलीं व ’स्व’ मध्येंच जो राहिला आहे. ॥१॥

हे जनका, या संसारांत तत्त्ववित् ज्ञानी कधीं खेदाला प्राप्त होत नाहीं. कारण तो जाणतो कीं, माझ्या एकटयानेंच हें सर्व विश्व व्यापलें आहे. खेद द्वैतानें होत असतो. अद्वैत असल्यावर खेद कसला ? ॥२॥

मधुर रसाच्या सल्लकी नांवाच्या वेलींचा चारा खायला मिळाल्यावर कडू असलेला कडुलिंबाचा पाला हत्ती खात नाहीं त्याप्रमाणें जो आत्मानंदांत रममाण झाला त्याला विषयांचा आनंद आनंदित करुं शकत नाहीं. ॥३॥

हे जनका, ज्या पुरुषाला गतकालांत भोगलेल्या भोगांबद्दल आसक्तिपूर्ण स्मरण होत नाहीं किंवा न भोगलेल्या भोगांबद्दल आकांक्षा निर्माण होत नाहीं, परंतु जो आपल्या आत्म्यांतच तृप्त आहे असा पुरुष संसारसागरांत विरळाच असतो. ॥४॥

या जगांत मुमुक्षु-आकांक्षा करणारे अनेक प्रकारचे पाहायला मिळतात परंतु भोग आणि मोक्ष यांच्या आकांक्षारहित आणि परब्रह्माच्या बाबतींत कामनारहित स्थित असा पुरुष क्वचितच सांपडतो. ॥५॥

हे शिष्या, जगांत असा पुरुष दुर्लभ आहे कीं जो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, तसाच जगणें आणि मरणें, या सर्वांबद्दल उदासीन—-कामनारहित असा आहे. ॥६॥

विश्वाचा लय व्हावा अशी इच्छा ज्या ज्ञानी पुरुषाला नाहीं किंवा विश्व स्थिर राहिल्याबद्दल ज्याला राग नाहीं, अर्थात् प्रपंच राहो वा नष्ट होवो, याबद्दल जो उदासीन आहे व यथाप्राप्त आजीविकेद्वारा संतुष्ट राहात असतो तो धन्य होय. ॥७॥

मी अद्वैत आत्मज्ञानानें कृतार्थ झालों आहें अशीही जाणीव ज्या पुरुषाला शिवत नाहीं व बाह्य इंद्रियांचें पाहाणें, ऐकणें, स्पर्श करणें, वास घेणें, खाणें इत्यादि व्यवहार तो सामान्य संसारी माणसाप्रमानें करीत असला तरी आत्मवृत्तीचा भंग—व साक्षी अवस्था सुटणें या गोष्टी होत नाहींत. ॥८॥

ज्या पुरुषाचा संसारसागर क्षीण झाला आहे, त्याला विषयांची इच्छाही होत नाहीं किंवा विरक्त होण्याचीही इच्छा होत नाहीं. त्या ज्ञानी पुरुषाचें मन, शरीर व इंद्रियें बालकाप्रमाणें किंवा उन्मत्ताप्रमाणें व्यापारशून्य होतात व त्याच्या शरिराची हालचालही उद्दशहीन व वृथाच होत असते. ॥९॥

ज्ञानी पुरुष सामान्य माणसाप्रमाणें बाह्य विषयांकडे डोळे उघडून जागा राहात नाहीं. कारण त्याला बाह्य विषय न दिसतां परब्रह्मच दिसतें. तसाच तो डोळे बंद करुन झोपतही नाहीं. कारण झोपलेल्याची बाह्य विषयांची जाणीव संपते पण ज्ञानी पुरुषाचें अनुसंधान झोपेंतही सुटत नाहीं, आणि त्यामुळें ज्ञानी पुरुष केवढी मुक्तदशा अनुभवतो तें आश्चर्यजनक आहे. ॥१०॥

सर्व वासना गळून पडल्यानें, निर्मळ , प्रसन्न व शांत झालेला जीवन्मुक्त सर्व अवस्थांत एकरस ब्रह्मरुपानें सर्वत्र प्रकाशमान होतो. ॥११॥

सर्वत्र पाहातांना, ऐकतांना, स्पर्श करतांना, वास घेतांना, खातांना, घेतांना, बोलतांना, चालतांनाही ज्ञानी इच्छाद्वेषरहित असतो. कारण त्याची ब्रह्मानंदीं टाळी लागलेली असते. ॥१२॥

मुक्त पुरुष कोणाची निंदा करीत नाहीं, कोणाची स्तुतीही करीत नाहीं, हर्षही पावत नाहीं व रागावतही नाहीं, कुणाला कांहीं देत नाहीं, कुणाकडून घेत नाहीं; तो सर्वत्र रसहीन-आसक्तिहीन वृत्तीनें असतो. ॥१३॥

कामुक स्त्रियांना पाहून वा मृत्यु जवळ उभा ठाकला असतां ज्याचें मन कासावीस होत नाहीं तोच मुक्त पुरुष होय. ॥१४॥

ज्याचें चित्त सुखांत आणि दुःखांत, संपर्कांत आलेल्या स्त्रीपुरुषाबद्दल, संपत् आणि विपत् कालांत समतोल राहातें त्या धीर पुरुषालाचा जीवन्मुक्त म्हणतात. ॥१५॥

जीवन्मुक्त पुरुष कोणाची हिंसा करीत नाहीं तसेंच कोणावर दया करण्याकरितां हपापत नाहीं. तो कुणाशीं उर्मटपणानें वागणार नाहीं तसाच कोणापुढें दीन होणार नाहीं. त्याला कशाचें आश्चर्य वाटत नाहीं तसाच कशानें त्याला क्षोभ-राग येत नाहीं. ॥१६॥

जीवन्मुक्त पुरुष विषयांचा द्वेष करीत नाहीं तसाच तो विषयलोलुपही असत नाहीं. प्रारब्धवशात् जें प्राप्त होतें वा अप्राप्त असतें त्या परिस्थितीचा तो आसक्तिरहित बिनतक्रार स्वीकार करतो. ॥१७॥

कुठल्या गोष्टीच्या प्राप्तीनें समाधान होणें, न मिळण्यानें असंतोष होणें, हें हिताचें आहे, हें नुकसानकारक आहे अशा विकल्पना शून्यचित्त पुरुष जाणत नाहीं. तो कैवल्यांत स्थित असतो. ॥१८॥

हे जनका ! अंतरंगांतील सर्व आशा-ममता-अहंकार गळून पडल्यानें जो केवळ अस्तित्वमात्र उरला आहे, तो सर्व करुनही त्यांत लिप्त होत नाहीं. ॥१९॥

हे जनका ! मनाच्या प्रकाशांत विचारलहरी उत्पन्न झाल्यानें निर्माण होणारा मोह, कल्पना-स्वप्नें, मनोराज्यें व जडता या सर्व गोष्टी-मनाचे सर्व व्यापारच गळून पडल्यानें व मनाचें अस्तित्वच गेल्यानें जीवन्मुक्त सदा अनिर्वचनीय अशा दशेंत राहात असतो. ॥२०॥

Translation – भाषांतर

 

अष्टावक्र गीता – अध्याय १८

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय १८

जो आत्मा शान्तरुप आहे, ज्याच्यांत संकल्प-विकल्प उत्पन्न होत नाहींत आणि जो सुखरुप आणि प्रकाशस्वरुप आहे, ज्याच्या स्वरुपाचें ज्ञान होतांच जगद्‌भ्रम स्वप्नाप्रमाणें मिथ्या होऊं लागतो, त्या आत्मस्वरुपाला नमस्कार असो. ॥१॥

सर्व तर्‍हेची व तर्‍हेनें संपत्ति मिळवून मनुष्याला खूप उपभोग मिळतात. पण या सर्वांचा त्याग केल्याशिवाय व त्यांच्याबद्दलची वासना नाहींशी झाल्याशिवाय मनुष्य सुखी होऊं शकत नाहीं. ॥२॥

कर्तव्यजन्य दुःखरुपी सूर्याच्या ज्वालांनीं ज्याचें मन भस्म झालें आहे त्याला शान्तिरुपी अमृतधारेच्या वृष्टीशिवाय सुख कसें मिळणार ? ॥३॥

हे जनक ! हें जगत् संकल्पमात्र आहे. परमार्थ दृष्टीनें आत्म्याशिवाय कुठलीच गोष्ट सत्यरुप नाहीं. संसार असत्य आहे. जो असत्यरुप संसार आहे तो कधींच सत्य होत नाहीं व जो आत्मा सत्यरुपच आहे तो कधीं असत्य-नश्वर होत नाहीं. ॥४॥

आत्मा सर्वांना सर्वांत जवळचा आहे. तो कुणापासूनही दूर नाहीं तो मनाच्या कल्पनेपलीकडचा, कल्पनेंत न मावणारा, आयासानें प्राप्त न होणारा —आयास सुटतांच प्राप्त होऊं शकणारा, निर्विकार व दुःखरहित आणि उपाधिरहित सदैव एकरस आहे. ॥५॥

जीवनांतील सारे मोह, आसक्ति विरुन गेलेला, दुःखरहित, विकारांच्या अभावानें दृष्टि निर्मळ झालेला ज्ञानी पुरुष ’स्व’ रुपानें जगांत शोभून दिसतो. ॥६॥।

सर्व जगत् कल्पनामात्र आहे. आत्मा हा सनातन व मुक्त आहे, असा प्रत्यक्ष अनुभव घेऊन ज्ञानी पुरुष लहान बालकाप्रमाणें बागडत असतो. ॥७॥

जीवात्मा ब्रह्म आहे, भाव-अभाव कल्पित आहेत हें पक्कें अनुभवाला आल्यानें कसलीच कामना उरली नाहीं. त्यामुळें कुणाला कांहीं सांगावें किंवा कांहीं करावें असें ज्ञानी पुरुषाला कांहीं उरत नाहीं. ॥८॥

सर्वत्र आत्मरुप कोंदाटलें आहे या अनुभूतीनें तें ब्रह्म मी आहें, हें जग मी नाहीं अशा विकल्पना गळून पडल्यानंतर ज्ञानी आंत भरलेल्या अपार आनंदानें व तो व्यक्त करणें शक्य नसल्यानें मौनावस्थेंत असतो. ॥९॥

संकल्परहित, समचित्त-साक्षीभावानें असलेल्या योग्याला संशय-विक्षेप, एखाद्याच विषयाची एकाग्रता, एखाद्या गोष्टीचा खोल विचार, मूर्खता, सुख या दुःख यांपैकीं कांहींच उरत नाहीं. तो आत्मानंदांतच मग्न असतो. ॥१०॥

राज्याधिकारी असण्यांत, भिक्षावृत्तीनें राहाण्यांत, लाभहानि होण्यांत, मनुष्यसमूहांत किंवा निर्जन वनांत राहाण्यांत विकल्परहित झालेल्या योग्याला कांहीं विशेषता वाटत नाहीं–सगळीकडे समतोल वृत्तीनें राहातो. ॥११॥

अष्टावक्र म्हणतो कीं, स्थिरचित्त झालेल्या योग्याला धर्म, काम, अर्थ यांचें कांही प्रयोजन राहात नाहीं; व हें काम मी केलें आहे किंवा हें करणार आहें अशा प्रकारचें द्वंद्व गेल्यानें जीवन्मुक्त योगी निरामय राहातो. ॥१२॥

जीवन्मुक्त पुरुषाची कुठलीच क्रिया स्वतःच्या संकल्पानें होत नाहीं आणि त्याला करण्यायोग्य कर्म शिल्लक नसतें; कारण त्याला कशाचाच मोह नसतो आणि हेतु व आसक्तीशिवाय कुठलेंच कर्म होऊं शकत नाहीं. त्याची शरीरयात्रा प्रारब्धवश चालू असते. ॥१३॥

जीवन्मुक्ताचे सर्व संकल्प नष्ट झालेले असतात. त्यामुळें त्याला कसला मोह नसतो. त्यामुळें त्याच्या दृष्टीला संसार अनुभवाला न येतां ब्रह्मच अनुभवाला येतें. त्याला ध्यानाची वा मुक्तीचीही इच्छा नसते. कारण त्याच्या मनाला कसलें स्फुरण होत नसल्यानें तो आत्मानंदांतच मग्न असतो. ॥१४॥

मुक्त पुरुषाला सर्वत्र ब्रह्मानुभव येत असल्यानें हें विश्व पाहूनही त्याला तें जग न दिसतां ब्रह्मरुपच दिसतें. त्यामुळें निर्वासन झालेला मुक्त पुरुष जग पाहात असूनही पाहात नाहीं. ॥१५॥

ज्यानें ब्रह्माला पाहिलें तो तें ब्रह्म मी आहें असें चिंतन करतो. पण जो स्वतःच ब्रह्म होऊन सर्वत्र ब्रह्मानुभव घेत आहे, जो ब्रह्माशिवाय कांहीं पाहात नाहीं, तो कशाचें चिंतन करणार ? ॥१६॥

जो स्वतःमध्यें विक्षेप-संशय पाहातो, तोच चित्ताचे हे संशय-विक्षेप जावेत म्हणून चित्तनिरोधाचा प्रयत्‍न करतो. पण ज्याचे सर्व संशय-विक्षेप आत्मानुभवानें मावळले आहेत, विक्षेप-संशय घ्यायला मनच शिल्लक उरलें नाहीं तो कशाचा निरोध करणार ? ॥१७॥

ज्ञानी पुरुष संशय-विक्षेपरहित होऊन इतर लोकांप्रमाणेंच त्यांच्यांत वावरत असतो. पण त्यांच्यांत अलिप्तपणें राहून तो स्वतःत कुठला विक्षेप-संशय, समाधि किंवा बंधन यांचा अनुभव घेत नाहीं. ॥१८॥

ज्ञानी मनुष्य स्वतः आत्मानंदांत तृप्त असतो. लोकदृष्टीनें तो कांहीं करतांना दिसला तरी त्या करण्यामागें कांहीं करावें किंवा कांहीं करुं नये अशी कामना नसल्यानें, वासना नसल्यानें, त्यानें कांहीं केलें तरी तें न केल्यासारखेंच असतें. ॥१९॥

जेव्हां एखादें कर्म करायला येऊन ठेपतें तेव्हां ज्ञानी मनुष्य तें कुरकुर न करतां संतोषानें करतो. सहजसमाधींत असणार्‍या ज्ञानी पुरुषाचा प्रवृत्ति वा निवृत्तीचा कसलाच आग्रह नसतो. ॥२०॥

वासनारहित, निरालंब, स्वच्छंद, बंधनरहित असा ज्ञानी पुरुष प्रारब्धानुसार, सुकलेलें पान जसें वार्‍यानें स्वतःच्या इच्छेशिवाय, प्रयत्‍नाशिवाय उडत जातें तसा संसारांत राहात असतो. ॥२१॥

ज्ञानी माणसाल कधीं हर्ष होत नाहीं, कधीं खेद वाटत नाहीं. तो शांत मनानें विदेह स्थितींत असतो. ॥२२॥

आत्म्यामध्यें रममाण झालेल्या, शांत व निर्मल चित्ताच्या ज्ञानी पुरुषाला कांहीं टाकण्यासारखें नसतें वा कसलीही आशा नसते. ॥२३॥

स्वभावतः ज्याचें चित्त शून्यावस्थेंत आहे तो सामान्य संसारी माणसासारखा वागतांना दिसला तरी त्याला कशानें मान वाटत नाहीं वा अपमान वाटत नाहीं. ॥२४॥

होणारी कर्मे देहाकडून होतात, शुद्धरुप अशा माझ्या आत्म्यानें तीं केलीं नाहींत असें जो अनुभवतो तो ज्ञानी पुरुष कर्में करुनही तीं करीत नाहीं. ॥२५॥

कुठलेंही कर्म करण्याचा आग्रह नसलेला जीवन्मुक्त सहजप्राप्त कर्मे करीत असतो पण त्यांत बालिशपणा नसतो. त्यामुळें सांसारिक कर्में करुनही त्यांत लिप्त न झाल्यानें त्याची वृत्ति सदा प्रसन्न राहाते. ॥२६॥

नाना विचाररहित ज्ञानी मनुष्य अंतरांत परम शांति अनुभवीत असतो. त्यामुळें संकल्पादि मनाचे व्यापार, बुद्धीचे व्यापार व इंद्रियांचे व्यापार तो करीत नाहीं. ॥२७॥

ज्ञानी माणसाला विक्षेपच नसल्यानें विक्षेपनिवृत्तीकरितां त्याला समाधीचा प्रयत्‍न करावा लागत नाहीं. द्वैतभ्रम नष्ट झाल्यानें त्याला कुठलाही बंध असत नाहीं. हें सर्व जगत् कल्पित आहे हें जाणून तो निर्विकार चित्तदशेंत असतो. ॥२८॥

जो मनुष्य अहंकाररहित झाला तो लोकदृष्टीनें कर्म करीत नाहीं किंवा करतो असें वाटलें तरी कर्तृत्वाचा अहंभावाच नाहींसा झाल्यानें, त्याला संकल्पविकल्पांचे स्फुरण होत नाहीं. ॥२९॥

जीवन्मुक्तांचें चित्त कर्तृत्वरहित, संकल्पविकल्पविरहित, आशारहित व संदेहमुक्त असल्यानें त्याला कशाचा खेद होत नाहीं किंवा कशानें तो संतोष पावत नाहीं. ॥३०॥

ज्ञान्याचें चित्त संकल्प-विकल्परुप चाळे (चेष्टितें) करण्यास प्रवृत्त होत नाहीं, कारण चित्ताची निर्मळ व निश्चल अवस्था झाल्यानें तें ’स्व’ रुपांत लीन होतें. ॥३१॥

मन्द पुरुष तत् आणि त्वं पदांचे कल्पितभेद श्रुतींच्या उपनिषद्‌ ग्रंथांतून ऐकून संशय आणि विपरीतपणामुळें मूढतेला प्राप्त होतो आणि तत् आणि त्वं पदांचा अभेद अर्थ समजण्याकरितां समाधी लावतो. परंतु हजारोंतला कुणी एखादाच अंतराम्त शांतचित्त व संशय-विकल्परहित होऊन बाहेरचा व्यवहार वेडयासारखा करतो. ॥३२॥

अज्ञानी माणसें चित्ताचा निरोध करुन एकाग्रतेचा खूप अभ्यास करतात परंतु ज्ञानी पुरुष गतकालांतील कर्मांचा अथवा भविष्यकाळांतील संकल्पांचा विचार न करतां वर्तमानकाळांत राहून आपल्या ’स्व’ रुपांत लीन असतात. ॥३३॥

अज्ञानी पुरुश चित्तनिरोधानें अथवा कर्मानुष्ठानानें परमानंदाला प्राप्त होत नाहीं. ज्ञानी पुरुष तत्त्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन निश्चिंत असल्यानें असा कांहीं प्रयत्‍न न करतांच कृतार्थ होतो. ॥३४॥

संसारपरायण सामान्यजन त्या शुद्ध, बोधरुप, प्रिय, पूर्ण असलेल्या, क्रियारहित व दुःखरहित अशा आत्मरुपाला जाणत नाहींत. ॥३५॥

अज्ञानी अभ्यासरुपी कर्मांनीं मोक्ष मिळूं शकत नाहीं. मनाच्या व शरीराच्या क्रियारहित होऊन भाग्यवान सत्पुरुष आत्म्याच्या प्रत्यक्ष अनुभवानेंच मुक्तावस्थेंत राहातो. ॥३६॥

अज्ञानी ब्रह्म होण्याची इच्छा करतो. पण कसलीही इच्छा-आशा करणें हेंच त्याच्या ब्रह्म होण्याच्या आड येतें. पण ज्ञानी पुरुष इच्छारहित झाल्यानें, प्रयत्‍न-क्रियारहित झाल्यानें ब्रह्म होण्याचा प्रयत्‍न न करतांही ब्रह्मस्वरुप होतो. ॥३७॥

’स्व’चा अनुभव अथवा अनुभवी गुरुचा आधार नसलेला अज्ञानी स्वतःचे पूर्वग्रह, समजुती यांत गुरफटून जें कर्मकाण्ड करुं जातो त्यानें संसारालाच पोषण मिळतें. पण ज्ञानी पुरुष या अनर्थाचें मूळ असलेल्या पूर्वग्रहांच्या समजुतींच्या जाळ्यांत न अडकतां, साक्षीवृत्तीनें असल्यामुळें, सर्वांपासून अलिप्त राहून ब्रह्म अनुभवतो. ॥३८॥

मन शांत व्हावें या इच्छेनें अज्ञानी मनुष्य नाना प्रयत्‍न, विचार व कर्मे करतो. इच्छा व प्रयत्‍न हींच निर्विचार अवस्थेला बाधक झाल्यानें त्याला शांति मिळत नाहीं. पण ज्ञानी पुरुष सर्व प्रयत्‍न व विचार सोडून साक्षी व तटस्थ भावानें वागत असल्यानें त्याला शांतता सहज प्राप्त होते. ॥३९॥

दृश्य वस्तूंशीं समरस होऊन जो विचारधारेंत अडकतो व ’स्व’ ला विसरुन विषय-विकारांत गुंतत जातो त्याला आत्मदर्शन कुठलें ? परंतु ज्ञानी पुरुष आत्मस्वरुपांत रममाण होऊन आत्मस्वरुपाचें अखंड दर्शन घेत असल्यानें त्याला बाह्य जगांतील गोष्टी न दिसतां सर्वत्र हरीच दिसूं लागतो. ॥४०॥

जो मनावर नाना बंधनें टाकून मनाचा निरोध करण्याचा यत्‍न करतो, तो प्रयत्‍नच त्याच्या मनाला भरकटवून टाकीत असल्यानें त्याला चित्ताची समता प्राप्त होत नाहीं. पण ज्ञानी मनुष्य चित्ताच्या निरोधाचा प्रयत्‍नच न करतां जें जसें आहे तें तसें-लिप्त न होतां पाहातो, त्यामुळें त्याचें चित्त अडोल राहातें. ॥४१॥

कुणी प्रपंचाला भावरुप असल्यानें सत्य समजतो तर कुणी प्रपंचाला शून्यरुप मानतो. पण संसाराला भाव-अभावरुप न पाहातां जो सर्वत्र फक्त आत्मरुपच पाहातो तो शांतचित्त असतो. ॥४२॥

कुबुद्धीचा पुरुष शुद्ध, अद्वैत आत्म्याला विकारी विचारांच्या द्वारां पाहूं बघतो पण मनाचे मोहमत्सरादि विकार व चलनवलन गेलेलें नसल्यानें जन्मभराच्या प्रयत्‍नानेंही त्याला आत्मरुपाचा अनुभव येत नाही. ॥४३॥

मुमुक्षु पुरुषाची बुद्धि सतत कशांत ना कशांत गुंतविल्याशिवाय, वासनेशिवाय राहूं शकत नाहीं. पण मुक्त पुरुषाची बुद्धि कशाचीच इच्छा करीत नसल्यानें मोकळी व स्वच्छ राहाते. ॥४४॥

मुमुक्षु मनुष्य विषयरुपी वाघाला पाहून भयभीत होतो व चित्तवृत्ति एकाग्र व्हावी म्हणून पर्वतगुहांत जाऊन राहातो. त्यानें त्याच्या चित्तवृत्ति एकान्तांत असूनही सर्वत्र फिरत असतात. पण मुक्त पुरुष विषयरुपी वाघ हे खोटे आहेत हें जाणून त्यांना भीत नाहीं. ॥४५॥

मुक्तपुरुषरुपी सिंहाला पाहून वासनाग्रस्त, चूपचाप पळून जातात. संसारी माणसें अशा ईश्वरी कृपा लाभलेल्या, वासनारहित सत्पुरुषाची स्वतः येऊन सेवा करतात. ॥४६॥

संशयरहित समतोल मनाचा ज्ञानी, यमनियमादिकांच्या कर्मकाण्डाचा आग्रह न धरतां सहजप्राप्त पाहाणें, ऐकणें, स्पर्श करणें, वास घेणें, खाणें इत्यादि कर्मे अलिप्तपणें करतो. ॥४७॥

चिदात्म्याच्या नुसत्या श्रवनानेंच, चिदात्म्याचें नांव ऐकतांच, ज्याची अखंडित शुद्धबुद्धि झाली आहे तो ज्ञानी आत्मरुपांतच स्थिर राहातो. तो मुक्त पुरुष मग आचार-अनाचार, शुभ-अशुभ यांच्या जंजाळांत पडत नाहीं. ॥४८॥

जेव्हां जें कुठलें शुभ अथवा अशुभ कर्म, ज्ञानी पुरुषाच्या दैववशात् वाटयाला येतें तेव्हां कसलाही आग्रह-तक्रा-न करतां तें तो सहज करतो. कारण त्याचे सर्व व्यवहार एखाद्या बालकाप्रमाणें कुठल्याही हेतूनें होत नाहींत. ॥४९॥

मनाचीं सर्व बंधनें तुटून मन पूर्ण विकार व विचाररहित झाल्यानें स्वतंत्र झालें. त्यामुळें ज्ञानी माणसाला आपोआप सुख मिळतें. कारण दुःख निर्माण करायला मनावर कसलाही ताण नसतो. त्यामुळें तो परम अनुभवाला प्राप्त होतो. प्रत्यक्ष ज्ञान अनुभवाला येतें, नित्य सुख वाटयाला येतें व तो परमपदाला पोहोंचतो. ॥५०॥

जेव्हां पुरुषाला आपल्या आत्म्याचें अकर्तेपण, अभोक्तेपण प्रत्यक्ष आत्मदर्शनानें अनुभवास येतें तेव्हां त्याच्या चित्ताच्या सर्व वृत्ती क्षीण होतात. ॥५१॥

ज्ञान्याचें एखाद्या बालकासारखें उच्छ्रंखल-तापट वागणें शोभून दिसतें पण कामनांनीं भरलेल्या माणसानें कांहीं हेतु बाळगून पाळलेली शांतता शोभादायक नसते. ॥५२॥

कल्पनारहित, बंधनरहित, मुक्तबुद्धीचा ज्ञानी कधीं प्रारब्धवशात्‌ ऐश्वर्ययुक्त भोगांत विलास करतो तर कधीं निर्जन गिरिगव्हरांत राहातो. ॥५३॥

विद्वान, देवता, तीर्थ, स्त्री, राजा, प्रिय व्यक्ति वगैरेंची पूजा होतांना पाहून ज्ञानी पुरुषाच्या हृदयांत कसलीही वासना निर्माण होत नाहीं. ॥५४॥

जीवन्मुक्ताची नोकरचाकर, स्त्री-पुत्र-कन्या, स्वगोत्राचे-जातीचे लोक, या सर्वांनीं हसून टवाळी व तिरस्कार केला तरी त्याचें चित्त क्षोभ पावत नाहीं. ॥५५॥

ज्ञानी पुरुष बाहेरुन संतुष्ट दिसला तरी संतुष्ट नसतो, तसेंच, बाहेरुन खिन्नसा वाटला तरी अंतरांत खिन्न नसतो. त्याची ती आश्चर्यकारक दशा फक्त त्या अवस्थेला पोहोंचलेल्या मुक्त पुरुषालाच समजूं शकते. ॥५६॥

संकल्परहित, विचारशून्य, दुःखरहित, शून्याकार, आकाररहित ज्ञानी पुरुषाला अमूक गोष्ट करायला हवी असें सांसारिक कर्तव्य उरत नाहीं-तें त्याला दिसत नाहीं. ॥५७॥

अज्ञानी शरिरानें कुठलीं कर्में न करतांही संकल्प-आशांनीं मन भरलेलें असल्यानें सतत व्यग्र असतो पण ज्ञानी शरीरानें सहजप्राप्त कर्में करीत असूनही संकल्प व आशारहित असल्यानें ’स्व’ स्थ असतो. ॥५८॥

आत्मसुखांत असलेला ज्ञानी जीवन्मुक्त उठणें, बसणें, येणें, जाणें, जेवणें, बोलणें आदि सर्व व्यवहार शांत चित्तानें सुखपूर्वक करतो. ॥५९॥

ज्ञानी मनुष्य व्यवहार करतांना संसारी माणसासारखा क्लेश पावत नाहीं. शांत महासरोवराप्रमाणें क्षोभरहित असल्यानें प्रसन्न असतो. ॥६०॥

वासना न सुटलेल्या मूढाचें कर्म टाकणें हें कर्म करण्याला-संसाराला उद्युक्त करतें तर सहजप्राप्त कर्में करणार्‍या ज्ञानी पुरुषानें कर्में केलीं तरी तीं निवृत्तीचीं फळें देणारीं होतात. ॥६१॥

संसारी मूढाचें वैराग्य घरदार सोडण्यांतच दिसून येतें पण अंतरांतील संसार तसाच राहातो. पण देहाबद्दलची आसक्ति सुटलेल्या ज्ञान्याला कशाबद्दल प्रेम नि कशाबद्दल वैराग्य येईल ? ॥६२॥

अज्ञानी माणसाची दृष्टि संसाराची आसक्ति व त्या संसारसाधनेंत येणारे अडथळे यामुळें सतत गढूळलेली राहून मन बैचेन असतें. पण सर्व संसाराचा हरिरुपानें अनुभव घेणार्‍या ज्ञानी माणसाला हरीचेंच दर्शन होत असल्यानें तो ’स्व’ रुपांत स्वस्थ असतो. ॥६३॥

जो ज्ञानी बालकाप्रमाणें कामनारहित होऊन कार्याला आरंभ करतो तो खरें म्हणजे कांहींच करीत नाहीं. तो अहंकाररुपी मलाच्या रहित असल्यानें त्याच्या ठिकाणीं कर्तृत्वभाव नसतो. ॥६४॥

तो आत्मज्ञानी पुरुष धन्य आहे, ज्याला सर्वत्र ब्रह्मरुपाचा अनुभव येतो. त्यामुळेंच पाहाणें, ऐकणें, स्पर्श करणें, वास घेणें, खाणें इत्यादि इंद्रियांनीं होणारीं कर्में तो करीत असला तरी तो त्याला ब्रह्मानुभवच ठरतो. ॥६५॥

जो ज्ञानी निरभ्र आकाशासारखा सर्वदा संकल्प-विकल्परहित आहे, त्याला संसार कुठला व स्वर्ग कुठला ? आत्मविद्‌ जीवन्मुक्ताच्या दृष्टीनें सर्वत्र एका आत्म्यानेंच परिपूर्ण विश्व व्यापलेलें असल्यानें-दुसरें कांहींच नाहीं—मग त्याला स्वर्ग-नरक आणि त्याला कारणीभूत असलेलें पाप-पुण्य कुठलें ? ॥६६॥

जो ज्ञानी पुरुष इहलोकांतील व परलोकांतील फलांच्या कामनेरहित आहे, जो संपूर्ण निष्काम आहे तोच पूर्णानंदस्वरुप आहे. ज्याची सहजसमाधि सर्वदाच चालू असते तो मुक्त पुरुष आपल्या अनवच्छिन्न समाधीनें–स्वरुपानें जगांत वावरतो. ॥६७॥

भोग व मोक्षाच्या इच्छेचा त्याग केलेला, कुठेंही, केव्हांही रागद्वेषाचा लवलेश नसलेल्या ज्ञानी महात्म्याचें महात्म्य अधिक काय सांगणार ? ॥६८॥

हें नामरुपात्मक-घटपटादि रुप-जें जगत् आहे तें सर्व कल्पनामात्र आहे. त्याचें अधिष्ठानरुप ब्रह्म हेंच सत्य आहे. ज्या शुद्ध बोधस्वरुप मुक्त पुरुषानें संपूर्ण कल्पनेचा त्याग केला आहे व जो केवळ शुद्धचैतन्य स्वरुपांतच राहात आहे, त्याला कुठलेंही कर्तव्य शिल्लक राहात नाहीं. ॥६९॥

हा सर्व संसार कल्पित व भ्रामक आहे, त्याला अस्तित्वच नाहीं व केवळ ब्रह्मच सत्य आहे असा ब्रह्मानुभव घेणार्‍या योग्याला सहज शांति मिळते. ॥७०॥

जो ज्ञानी शुद्धस्वरुप, स्वप्रकाश, चिद्रूप अशा ’स्व’ ला पाहातो, तो आणखी इतर कुठल्या दृश्य पदार्थाला पाहात नाही. मग त्याला कुठल्या विषयाबद्दल आसक्ति असेल, कुठला विधी करावा लागेल ? किंवा कशाबद्दल वैराग्य असेल किंवा कशाचा उपशम करावा लागेल ? ॥७१॥

जो चिद्रूप आत्म्यांत कार्यासहित माया पाहात नाहीं, त्याच्या दृष्टीला बंध कुठला ? मोक्ष कसला ? आणि हर्षविषाद

कसले ? ॥७२॥

आत्मज्ञान होईपर्यंतच मायाभ्रमरुप संसाराचें अस्तित्व असतें. त्यामुळें आत्मज्ञानी पुरुष ममतारहित, निरहंकार, कामनाशून्य अशा अवस्थेंत जगाला शोभायमान वाटतो. ॥७३॥

अविनाशी व खळबळ (राग-द्वेष-दुःख) रहित आत्म्याचें दर्शन घेणार्‍या मुनीला कसली विद्या, कुठलें शास्त्र, कुठलें जग, कशाचा देह आणि त्याबद्दलचा अहं-ममभाव असूं शकेल ? ॥७४॥

यदाकदाचित् अज्ञानी पुरुषानें चित्तनिरोधादि कर्मांचा त्याग केला तरीही मनोराज्यादि व वाणीचे प्रलाप तो करीत राहातो. ॥७५॥

मंद पुरुष आत्मवस्तूबद्दल ऐकूनही संसाराबद्दलची मूर्खपणाची आसक्ति सोडीत नाहीं आणी बाह्य गोष्टी न करण्याचें ठरवूनही त्याचें आंतल्या विषयलालसांचें चिंतन सुटत नाहीं. ॥७६॥

ज्ञानामुळें ज्याचीं सर्व कम व तीं करण्याची उर्मी गळून पडली आहे त्याला सहजप्राप्त नसलेलें कर्म करण्याची वा कांहीं बोलण्याचीही इच्छा होत नाहीं. ॥७७॥

ज्या धीरपुरुषाचे मोहादि सर्व विकार दूर झाले, त्याच्या दृष्टीला तम-अंधकार कुठला ? आणि अंधाराचा अभाव असल्यानें प्रकाश कुठला ? कारण हे दोन्ही सापेक्ष आहेत. अशा ज्ञानी पुरुषाला कालादिकांचें भय नसतें. न कुठें हानि न कुठें लाभ, न कशाबद्दल प्रेम असतें न द्वेष असतो, न कांहीं ग्रहण करणें न त्याग करणें असतें. ॥७८॥

अनिर्वचनीय व स्व-भावरहित योग्याला धैर्य कशाविरुद्ध, विवेक कशाबद्दल व निर्भयता कुणापासून ठेवण्याचें कारण नाहीं. कारण तो सदा एकरस ब्रह्म असतो. ॥७९॥

जीवन्मुक्त आत्मज्ञान्याच्या दृष्टीनें स्वर्गही नाहीं व नरकही नाहीं, तर सर्वंत्र एक आत्माच परिपूर्ण व्यापून आहे. आत्म्याव्यतिरिक्त ज्ञानाच्या दृष्टीला दुसरें कांहींच नाहीं. ॥८०॥

ज्ञान्याचें चित्त ब्रह्मामृतानें परिपूर्ण व शीतल असल्यानें त्याला कुठल्या लाभाकरितां प्रार्थना करावी लागत नाहीं किंवा हानि झाली तरी शोक करावा लागत नाहीं. ॥८१॥

कामनारहित ज्ञानी सज्जन शांत पुरुषाची स्तुति करीत नाहीं, किंवा दुष्टाची निंदा करीत नाहीं. आत्मतृप्त योगी सुख आणि दुःख समान झाल्यानें कुणाचेंच कुठलें कृत्य पाहात नाहीं. ॥८२॥

धीर जीवन्मुक्त पुरुष संसाराचा द्वेष करीत नाहीं किंवा संसार पाहातही नाहीं. कारण त्याला सर्वत्र ब्रह्मानुभव येत असतो. द्वैत नाहींसें झाल्यानें तो ब्रह्मरुप होतो, त्यामुळें तो स्वतःचें वेगळें आत्मरुपही पाहात नाहीं त्यामुळें तो हर्षविषादरहित होऊन जन्ममरणहित होतो. ॥८३॥

पुत्र-स्वस्त्रीबद्दल आसक्तिरहित आणि विषयाबद्दल कामनारहित व स्वतःच्या शरिराबद्दल चिंतारहित असलेला ज्ञानी शोभायमान असतो. ॥८४॥

मुक्त पुरुषाला प्रारब्धवशात् ज्या गोष्टी प्राप्त होतात, त्यांनींच तो संतुष्ट असतो; आणि प्रारब्धानुसार नाना प्रकारच्या देशांत, वनांत, नगरांत संतुष्ट राहून फिरतो. ॥८५॥

ज्या मुक्‍त पुरुषाला स्व-रुप हीच भूमि-विश्रांतिस्थान आहे त्याला कसलीच चिंता असत नाहीं, मग देह राहो अथवा

जावो ! ॥८६॥

जीवन्मुक्त निर्विकार होऊन संसारांत राहातो. तो स्वतःजवळ कांहीं ठेवीत नाहीं. तो विधिनिषेधाचा किंकर होत नाहीं. स्वच्छंद वागतो. निर्हेतुक भटकतो. सुखदुःखादि द्वंद्वें व संशयरहित होऊन कशांतच आसक्त नसतो. ॥८७॥

जो ममतारहित असून ज्याला माती व सोनें समान झालें आहे व ज्याच्या हृदयाच्या सर्व ग्रंथी तुटून जो संशयरहित आहे आणि ज्याच्या स्वभावांतील रज व तमोवृत्ती साफ धुवून निघाल्या आहेत, असा ज्ञानी दर्शनीय होतो. ॥८८॥

जो मुक्तात्मा सर्व विषयांबद्दल आसक्तिरहित आहे, ज्याच्या हृदयांत थोडीही वासना शिल्लक नाहीं, अशा संपूर्ण तृप्त ज्ञानी पुरुषाची तुलना कोणाबरोबर करणें शक्य आहे ? ॥८९॥

जीवन्मुक्त सर्वत्र फक्त ब्रह्मच अनुभवत असल्यानें पाहात असूनही संसार त्याला दिसत नाहीं. सांगत असूनही ब्रह्म अकथ्य असल्यानें सांगत नाहीं, जाणत असूनही तें अनुभवत असल्यानें जाणत नाहीं, ऐकत असतो तरी ब्रह्मच ऐकत असल्यानें सांसारिक गोष्टी त्याला ऐकूं येत नाहींत. निर्वासनिक ज्ञानी पुरुषाशिवाय असें कोण करुं शकेल ? ॥९०॥

उच्चनीचत्वाची भावना सर्वथा गळून गेलेला व कामनारहित असलेला ज्ञानी भिक्षु असो वा भूपति असो, सर्व अवस्थांत शोभूनच दिसतो. ॥९१॥

जो निष्कपट योगी आहे, कोमल स्वभावाचा आहे, आत्मनिष्ठ, पूर्णार्थी व स्वच्छंदपणें राहाणारा आहे, त्याला संकोच कसला ? वृत्तीचें येणें जाणें कुठलें नि कर्तृत्व कशाचें आणि अमूकच मार्ग व तत्त्व खरें आहे असा त्याचा आग्रह कसा असणार ? ॥९२॥

कसल्याही आशेशिवाय, आत्म्यांतच विश्रांतीनें तृप्त झालेल्या ज्ञानी पुरुषाला जो आनंदाचा अनुभव येतो तो शब्दांनीं कसा वर्णन करुन सांगणार ? ॥९३॥

ज्ञानी झोपेंतही साक्षी वृत्तीनें राहूं शकत असल्यानें त्याची झोप इतरांसारखी तमोमय नसते. तो त्याच जागृत साक्षीभावानें स्वप्नेंही पाहातो व जागृतींतले सारे व्यवहारही क्षणाक्षणांत जगत असल्यानें भूत व भविष्याचे विचार न करतां-साक्षीवृत्तीनें असल्यानें तृप्त वृत्तीनें चालतात. ॥९४॥

ज्ञानवान जीवन्मुक्त लोकांच्या दृष्टीनें चिंत्तायुक्त वाटला तरी चिंतारहित आहे; इन्द्रियांचे व्यवहार करीत असला तरी निरींद्रीय आहे, बुद्धियुक्त वाटला तरी बुद्धिरहित आहे, अहंकारयुक्त वाटला तरी अहंकाररहित आहे. कारण त्याची सर्वत्र आत्मदृष्टि आहे. जो आत्मानंदांत बुडून गेला आहे तो इतर कुठें गुंतत नसतो. ॥९५॥

ज्ञानी सुखीही नाहीं वा दुःखीही नाहीं, विरक्त नाहीं किंवा कोणाच्या संगांत नाहीं, मुमुक्षु नाहीं किंवा मुक्त नाहीं, त्याचा कांहीं विशेष नाहीं किंवा अविशेष नाहीं, कारण तो फक्त आत्मभावानेंच शिल्लक राहिला आहे. त्याच्या इतर सर्व गोष्टी गळून पडल्या आहेत. ॥९६॥

जगांत ज्ञानी मुक्त पुरुष धन्य आहे. कारण लोकदृष्टीनें एखादी गोष्ट संशयास्पद असली तरी तो संशयरहित असतो. कारण सर्वत्र ब्रह्मानुभव येत असल्यानें संशयाचें कारणच उरत नाहीं. लोकदृष्टीला तो समाधिअवस्थेंत आहे असें वाटलें तरी तो सहजावस्थेंत असतो. लोकदृष्टीनें तो जड वाटला तरी वास्तवांत तो आत्मदर्शनानें तृप्त असल्यानें, कांहीं करण्याची उर्मी शिल्लक नसते. लोकदृष्टीनें तो ज्ञानी-पंडित वाटला तरी त्याचे निघालेले बोल हे आत्मानुभूतीचे असल्यानें, त्यांत ग्रांथिक पांडित्य नसतें. ॥९७॥

ज्ञानी कर्मानुसार यथाप्राप्त गोष्टींबद्दल स्वस्थचित्त असतो, गतगोष्टींबद्दल व भविष्यांतील कार्याबद्दलही तो संतुष्ट असतो. तृष्णेच्या अभावामुळें केलेल्या कामांबद्दल त्याला प्रसन्नता वा उद्वेग नसल्यानें तो त्यांचें स्मरणही करीत नाहीं. ॥९८॥

कुणी स्तुति केल्यानें ज्ञानी प्रसन्न होत नाहीं किंवा कुणी निंदा केली म्हणून रागावत नाही. मरण आलें तरी व्याकुळ होत नाहीं किंवा जगल्याचा हर्ष करीत नाहीं. ॥९९॥

शांत बुद्धीचा ज्ञानी पुरुष माणसांनीं गजबजलेल्या स्थानाकडे अथवा अरण्याकडे धावत नाहीं तर तो जेथें ज्या परिस्थितींत असेल तेथेंच समभावानें राहात असतो. ॥१००॥

Translation – भाषांतर

 

 

अष्टावक्र गीता – अध्याय १९

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय १९

गुरुपदेशानें कृतार्थ झालेला जनकराजा आपला अनुभव श्रीगुरुंना धन्यतापूर्वक सांगत आहे.

जनक म्हणाला

शिष्य श्रीगुरुंच्या मुखानें तत्त्वज्ञानी पुरुषाच्या स्वाभाविक शांतीचें श्रवण करुन, स्वतःला कृतार्थ समजून, आतां श्रीगुरुंना आपली गुरुपदेशानें झालेली अवस्था वर्णन करीत आहे.

हे श्रीगुरो ! आपण परमकृपेनें आपल्या अमोघ वाणीनें माझ्या हृदयांतील नाना प्रकारचीं शल्यें, संकल्प व विकल्प दूर केल्यानें आतां मी कृतार्थ झालों आहें व आतां माझी स्थिति अशी झाली आहे. ॥१॥

स्वतःच्या महिम्यांत स्थित झाल्यानें मला आतां धर्म, काम, अर्थ, विवेक, द्वैत-अद्वैत हें कांहींच उरलें नाहीं. ॥२॥

आपल्या कृपेनें लाभलेल्या स्वमहिम्न्यांत सदैव स्थित झाल्यानें आतां मला भूतकाळ वा भविष्यकाळ किंवा वर्तमानकाळ, तसेंच अमूक एक देश असा राहिला नाहीं. ॥३॥

स्वमहिम्यांत स्थित झाल्यानें आतां मला आत्मा-अनात्मा, शुभ-अशुभ, चिन्ताअचिन्ता अशा कुठल्याच गोष्टी राहिल्या नाहीत. ॥४॥

आतां मला स्वप्न नाहीं वा सुषुप्ति नाहीं, जागृति नाहीं वा तुरीय अवस्था नाहीं, भयही उरलेलें नाहीं. आतां मी स्ववैभवांत आहे. ॥५॥

स्वमहिम्यांत निमग्न झालेल्या मला आतां दुरचें काय वा जवळचेम काय, बाहेरचें काय नि अंतरांतील काय ? स्थूल वा सूक्ष्म असें काय राहाणें शक्य आहे ? ॥६॥

’स्व’ रुपांत राहाणार्‍या मला मृत्यु कुठला नि जीवित कुठलें ? लोक आणि लौकिक कुठला किंवा लय अथवा समाधि कुठली ? ॥७॥

आत्म्यांत विलीन झालेल्या मला धर्म, अर्थ, काम, योगाबद्दलच्या गोष्टी अथवा विज्ञानकथा आतां पुरे झाल्या-त्यांची आवश्यकता नाहीं. ॥८॥

Translation – भाषांतर

 

अष्टावक्र गीता – अध्याय २०

अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.

अध्याय २०

जनक म्हणतो आहे कीं, संपूर्ण उपाधिरहित जें माझें निरंजनस्वरुप आहे त्यामध्यें पंचमहाभूतें, सूक्ष्म कार्य करणारीं इंद्रियें, मन, शरीर व शून्यावस्था इत्यादि कल्पित गोष्टी मनच नाहींसें झाल्यानें कशा असूं शकतील ? मीच त्यांचा साक्षी आहें. ॥१॥

हे गुरो ! मला शास्त्राशीं वा शास्त्रजन्य ज्ञानाशीं काय करायचें आहे ? आत्मविश्रांतीशीं, सर्व वासना गळून गेल्यानें वासनेशीं वा वासनाविरहितेशीं, तृप्ति किंवा तृष्णा, द्वंद्व यांच्याशीं काय करावयाचें आहे ? कारण मी शांतरस ब्रह्म आहें. ॥२॥

मला विद्या किंवा अविद्या कुठें ? अहंकार कुठला ? बाह्य वस्तु कुठली ? ज्ञान कसलें ? माझा कुणाशीं संबंध आहे ? संबंध दुसर्‍याशीं असतो. मला दुसरा कुणी नाहीं. बन्ध आणि मोक्ष मला नाहींत. माझ्या निर्विशेष स्वरुपाला धर्म नाहीं आणि निधर्मक माझ्या स्वरुपाला विद्येचाही धर्म नाहीं. ॥३॥

निर्विशेष, निराकार, निरवयव अशा माझ्या आत्म्याला प्रारब्धकर्म कुठलें ? जीवन्मुक्ति व विदेहमुक्ति कुठली ? ॥४॥

सदा स्वभावरहित अशा मला कर्तेपण कुठलें ? आणि भोक्तेपण कसलें ? निष्क्रियता वा स्फुरण, प्रत्यक्ष ज्ञान अथवा विषयाकार वृत्तीनें मिळणारें फळ हीं सारीं मला कशीं असणार ? ॥५॥

अद्वैत आत्मस्वरुपांत लोक कुठले ? मुमुक्षु कुठला ? योगी वा ज्ञानवान, बद्ध वा मुक्त कसा असेल ? केवळ अद्वैत आत्माच असेल. ॥६॥

अद्वैत अशा आत्मस्वरुपाला सृष्टिनिर्माण वा संहार, साधन आणि साध्य व साधक व सिद्धि इत्यादि गोष्टी कशा

असतील ? ॥७॥

सर्वदा निर्मलरुप मला प्रमाता, प्रमाण व प्रमेय आणि प्रमा, कमी वा अधिक अशा गोष्टी कुठल्या ? ॥८॥

सर्व क्रियारहित असें जें माझें आत्मरुप आहे त्याला विक्षेप वा एकाग्रता, कुठलें ज्ञान वा मूढता, कसला हर्ष अथवा खेद असणार ? ॥९॥

सर्वथा निर्मळ अशा आत्मस्वरुपाला कुठला व्यवहार वा परमार्थ, सुख वा दुःख असूं शकेल ? ॥१०॥

सर्वार्थानें विमल अशा आत्मस्वरुप मला कुठली माया वा संसार, प्रीति अथवा द्वेष, जीवभाव किंवा ब्रह्मभाव असणार ? ॥११॥

सर्वदा स्थिर, कूटस्थ आणि विभागरहित अशा मला प्रवृत्ति किंवा निवृत्ति, बंधन आणि मुक्ति या गोष्टी कुठल्या ? ॥१२॥

उपाधिरहित, कल्याणरुप आत्मस्वरुप अशा मला कसला उपदेश वा कसलें शास्त्र, कुठला शिष्य अथवा कुठला गुरु आणि कुठला मोक्ष असूं शकेल ? ॥१३॥

मला आहे अथवा नाहीं असें स्फुरण नाहीं, न अद्वैत न द्वैत आहे. फार सांगण्याचें प्रयोजन नाहीं. चैतन्यस्वरुप माझ्यांत कांहींच अहं स्फुरण नाहीं. ॥१४॥

Translation – भाषांतर

संपादक : धनंजय महाराज मोरे

9422938199 / 9823334438

 

 

 

अष्टावक्र

अष्टावक्र

अष्टावक्र अद्वैत वेदान्त के महत्वपूर्ण ग्रन्थ अष्टावक्र गीता के ऋषि हैं। अष्टावक्र गीता अद्वैत वेदान्त का महत्वपूर्ण ग्रन्थ है। ‘अष्टावक्र’ का अर्थ ‘आठ जगह से टेढा’ होता है। कहते हैं कि अष्तावक्र का शरीर आठ स्थानों से तेढा था।

परिचय

उद्दालक ऋषि के पुत्र का नाम श्‍वेतकेतु था। उद्दालक ऋषि के एक शिष्य का नाम कहोड़ था। कहोड़ को सम्पूर्ण वेदों का ज्ञान देने के पश्‍चात् उद्दालक ऋषि ने उसके साथ अपनी रूपवती एवं गुणवती कन्या सुजाता का विवाह कर दिया। कुछ दिनों के बाद सुजाता गर्भवती हो गई। एक दिन कहोड़ वेदपाठ कर रहे थे तो गर्भ के भीतर से बालक ने कहा कि पिताजी! आप वेद का गलत पाठ कर रहे हैं। यह सुनते ही कहोड़ क्रोधित होकर बोले कि तू गर्भ से ही मेरा अपमान कर रहा है इसलिये तू आठ स्थानों से वक्र (टेढ़ा) हो जायेगा।

हठात् एक दिन कहोड़ राजा जनक के दरबार में जा पहुँचे। वहाँ बंदी से शास्त्रार्थ में उनकी हार हो गई। हार हो जाने के फलस्वरूप उन्हें जल में डुबा दिया गया। इस घटना के बाद अष्टावक्र का जन्म हुआ। पिता के न होने के कारण वह अपने नाना उद्दालक को अपना पिता और अपने मामा श्‍वेतकेतु को अपना भाई समझता था। एक दिन जब वह उद्दालक की गोद में बैठा था तो श्‍वेतकेतु ने उसे अपने पिता की गोद से खींचते हुये कहा कि हट जा तू यहाँ से, यह तेरे पिता का गोद नहीं है। अष्टावक्र को यह बात अच्छी नहीं लगी और उन्होंने तत्काल अपनी माता के पास आकर अपने पिता के विषय में पूछताछ की। माता ने अष्टावक्र को सारी बातें सच-सच बता दीं।

अपनी माता की बातें सुनने के पश्‍चात् अष्टावक्र अपने मामा श्‍वेतकेतु के साथ बंदी से शास्त्रार्थ करने के लिये राजा जनक के यज्ञशाला में पहुँचे। वहाँ द्वारपालों ने उन्हें रोकते हुये कहा कि यज्ञशाला में बच्चों को जाने की आज्ञा नहीं है। इस पर अष्टावक्र बोले कि अरे द्वारपाल! केवल बाल सफेद हो जाने या अवस्था अधिक हो जाने से कोई बड़ा आदमी नहीं बन जाता। जिसे वेदों का ज्ञान हो और जो बुद्धि में तेज हो वही वास्तव में बड़ा होता है। इतना कहकर वे राजा जनक की सभा में जा पहुँचे और बंदी को शास्त्रार्थ के लिये ललकारा।

राजा जनक ने अष्टावक्र की परीक्षा लेने के लिये पूछा कि वह पुरुष कौन है जो तीस अवयव, बारह अंश, चौबीस पर्व और तीन सौ साठ अक्षरों वाली वस्तु का ज्ञानी है? राजा जनक के प्रश्‍न को सुनते ही अष्टावक्र बोले कि राजन्! चौबीस पक्षों वाला, छः ऋतुओं वाला, बारह महीनों वाला तथा तीन सौ साठ दिनों वाला संवत्सर आपकी रक्षा करे। अष्टावक्र का सही उत्तर सुनकर राजा जनक ने फिर प्रश्‍न किया कि वह कौन है जो सुप्तावस्था में भी अपनी आँख बन्द नहीं रखता? जन्म लेने के उपरान्त भी चलने में कौन असमर्थ रहता है? कौन हृदय विहीन है? और शीघ्रता से बढ़ने वाला कौन है? अष्टावक्र ने उत्तर दिया कि हे जनक! सुप्तावस्था में मछली अपनी आँखें बन्द नहीं रखती। जन्म लेने के उपरान्त भी अंडा चल नहीं सकता। पत्थर हृदयहीन होता है और वेग से बढ़ने वाली नदी होती है।

अष्टावक्र के उत्तरों को सुकर राजा जनक प्रसन्न हो गये और उन्हें बंदी के साथ शास्त्रार्थ की अनुमति प्रदान कर दी। बंदी ने अष्टावक्र से कहा कि एक सूर्य सारे संसार को प्रकाशित करता है, देवराज इन्द्र एक ही वीर हैं तथा यमराज भी एक है। अष्टावक्र बोले कि इन्द्र और अग्निदेव दो देवता हैं। नारद तथा पर्वत दो देवर्षि हैं, अश्‍वनीकुमार भी दो ही हैं। रथ के दो पहिये होते हैं और पति-पत्नी दो सहचर होते हैं। बंदी ने कहा कि संसार तीन प्रकार से जन्म धारण करता है। कर्मों का प्रतिपादन तीन वेद करते हैं। तीनों काल में यज्ञ होता हे तथा तीन लोक और तीन ज्योतियाँ हैं। अष्टावक्र बोले कि आश्रम चार हैं, वर्ण चार हैं, दिशायें चार हैं और ओंकार, आकार, उकार तथा मकार ये वाणी के प्रकार भी चार हैं। बंदी ने कहा कि यज्ञ पाँच प्रकार के होते हैं, यज्ञ की अग्नि पाँच हैं, ज्ञानेन्द्रियाँ पाँच हैं, पंच दिशाओं की अप्सरायें पाँच हैं, पवित्र नदियाँ पाँच हैं तथा पंक्‍ति छंद में पाँच पद होते हैं। अष्टावक्र बोले कि दक्षिणा में छः गौएँ देना उत्तम है, ऋतुएँ छः होती हैं, मन सहित इन्द्रयाँ छः हैं, कृतिकाएँ छः होती हैं और साधस्क भी छः ही होते हैं। बंदी ने कहा कि पालतू पशु सात उत्तम होते हैं और वन्य पशु भी सात ही, सात उत्तम छंद हैं, सप्तर्षि सात हैं और वीणा में तार भी सात ही होते हैं। अष्टावक्र बोले कि आठ वसु हैं तथा यज्ञ के स्तम्भक कोण भी आठ होते हैं। बंदी ने कहा कि पितृ यज्ञ में समिधा नौ छोड़ी जाती है, प्रकृति नौ प्रकार की होती है तथा वृहती छंद में अक्षर भी नौ ही होते हैं। अष्टावक्र बोले कि दिशाएँ दस हैं, तत्वज्ञ दस होते हैं, बच्चा दस माह में होता है और दहाई में भी दस ही होता है। बंदी ने कहा कि ग्यारह रुद्र हैं, यज्ञ में ग्यारह स्तम्भ होते हैं और पशुओं की ग्यारह इन्द्रियाँ होती हैं। अष्टावक्र बोले कि बारह आदित्य होते हैं बारह दिन का प्रकृति यज्ञ होता है, जगती छंद में बारह अक्षर होते हैं और वर्ष भी बारह मास का ही होता है। बंदी ने कहा कि त्रयोदशी उत्तम होती है, पृथ्वी पर तेरह द्वीप हैं।…… इतना कहते कहते बंदी श्‍लोक की अगली पंक्ति भूल गये और चुप हो गये। इस पर अष्टावक्र ने श्‍लोक को पूरा करते हुये कहा कि वेदों में तेरह अक्षर वाले छंद अति छंद कहलाते हैं और अग्नि, वायु तथा सूर्य तीनों तेरह दिन वाले यज्ञ में व्याप्त होते हैं।

इस प्रकार शास्त्रार्थ में बंदी की हार हो जाने पर अष्टावक्र ने कहा कि राजन्! यह हार गया है, अतएव इसे भी जल में डुबो दिया जाये। तब बंदी बोला कि हे महाराज! मैं वरुण का पुत्र हूँ और मैंने सारे हारे हुये ब्राह्मणों को अपने पिता के पास भेज दिया है। मैं अभी उन सबको आपके समक्ष उपस्थित करता हूँ। बंदी के इतना कहते ही बंदी से शास्त्रार्थ में हार जाने के बाद जल में डुबोये गये सार ब्राह्मण जनक की सभा में आ गये जिनमें अष्टावक्र के पिता कहोड़ भी थे।

अष्टावक्र ने अपने पिता के चरणस्पर्श किये। तब कहोड़ ने प्रसन्न होकर कहा कि पुत्र! तुम जाकर समंगा नदी में स्नान करो, उसके प्रभाव से तुम मेरे शाप से मुक्त हो जाओगे। तब अष्टावक्र ने इस स्थान में आकर समंगा नदी में स्नान किया और उसके सारे वक्र अंग सीधे हो गये।

संपादक : धनंजय महाराज मोरे

9422938199 / 9823334438

 

अधिक ग्रंथ आणि मोबईल सॉफ्टवेअर साठी

येथे क्लिक करा

 

आमची वेबसाईटवर जाण्यासाठी

येथे क्लिक करा

कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, समाज प्रबोधनकार, एंड्रॉयड डेव्हलपर, ईबुक मेकर,

Leave a Reply

*

5 − four =